Wednesday, July 27, 2016

Er Rational musings #637

Er Rational musings #637



"आम्ही मुलुंड वेस्ट वरून येतो इथे ईस्टला. वो पकोडे व पानी पुरी इधरचीच खावीशी वाटते," आमच्या अहो, मायाबाईंचा अस्खलित मराठीत संवाद चाललाय पानीपूरीवाल्या भैय्या च्या मुलाशी. "वो ऐसाहैंना, वेस्टमध्ये बहोत ठिकाणी चायनीज पकोडे दिखता हैं, पण खानेको वाटत नाहीं.."



तो भैय्या आमचा नेहमीचाच; आता पंचवीसेक वर्षे याच्या गाडीवर खात असल्याने, मायाबाईंना पेश्यल ट्रिटमेंट असते इथे; त्या भैय्याचा मुलगा हा. बाजूलाच चायनीज ची गाडी लावतो; मंचूरियन, भेळ व सूप. लाजवाब लज्जतदार लयच भारी.



मुंबईतल्या गृहिंणींच्या भाजी फळे व तत्सम समस्त रस्त्यांवरील जिनसा घेण्याच्या जागा ठरलेल्या असाव्यात. माझ्या "त्या" भैय्याकडून कोथिंबीर घेते, "त्या" भैय्याकडची भाजी पालेभाजी आणली, असले आमच्या अहोंकडून कायम ऐकायला मिळते. आता, ह्यांची ही असली भैय्यांची दूकानं भरपूरेत. एक वैशिष्ठ्य म्हणजे आमच्या अहो, मायाबाई प्रत्येकाशी शुध्द मराठीत बोलतात. मी कधीमधी बरोबर असलो बाईकवर, की यांचे जवाबसवाल ऐकोनि मनकान भरून येतं, तृप्त होतं. त्या भैय्यांनाही अहोमँडमच्या बोलण्याची सवय असते, हे वर! मराठी हिंदी जुगलबंदी.



मनसेचा वारसा अहो तंतोतंत चालवताहेत, हे बरिक खरे...

---

Milind Kale, 28th July 2015

No comments:

Post a Comment