Monday, July 25, 2016

Er Rational musings #634

Er Rational musings #634



शाळेत असताना (36 वर्षांपूर्वी) वर्गात (वर्गाच्या आत) सामूहिक कौतुक करण्याची व आनंद व्यक्त करण्याची मान्यताप्राप्त पध्दत होती. ती म्हणजे सर्वांनी दोन्ही हात वर करून पंजे हलवायचे. म्हणजे, वा वा, म्हणजे बहुत बढ़िया बहोत खूब खूप छान वगैरे. पीटीत (शारीरिक शिक्षणात) निरनिराळ्या टाळ्या शिकवल्या होत्या, निरनिराळ्या तालातल्या. उदाहरणार्थ एक दो तीन, एक दो तीन, एकssदोssतीन. (आठवतय का??)



शाळेच्या बाहेर मात्र मनसोक्त टाळ्या वाजवता यायच्या. अगदी गणपतीच्या आरती मधल्या सारख्या. 'हात'भरून कौतूक.



आत्ता हायब्रीड पध्दताहे.



दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचे. तिथे हात जोडायचे, वरून नमस्कार केल्यासदृश. मग तिथे डोक्यावर टाळ्या वाजवायच्या.



एकत्रित आवाज कमी येतो, अर्थातच. गरज नाहीये तशी. पण दिसतं छान. एकत्र लय पण चांगली वाटते, लांबून पण रहि्दमीक लय वाटते. नमस्कार म्हणजे अभिवादन, हे ही आहेच की.



अँक्च्यूअली, टाळ्यांचा कडकडाट नाही झाला तरी चलतया. असण्यापेक्षा "दिसण्याला" जास्त महत्व असतया, हल्ली...

---

Milinnd Kale, 25th July 2016

No comments:

Post a Comment