Tuesday, July 19, 2016

Er Rational musings #627

Er Rational musings #627



चकवा



भल्याभल्या ट्रेकर्सची मति गुंग, दांडी गूल करणारा, बुध्दी भ्रष्ट करणारा अजब प्रकार म्हणजे "चकवा". एकदा नव्हे, अनेकवेळा, दऱ्याडोंगरात फिरणाऱ्यांनी याचा क-नुभव घेतला आहे, घेताहेत. फसवी फसगत!



आणि एकदाका चकवा लागला असं ध्यानात आलं, की, का कू न करता आहे तिथेच थांबायचं, मग भले ती रात्र का असेना; सकाळी अगदीच समोरच मार्ग दिसतो! इति, आमचा गिरीमित्र वाटाड्या बँचमेट.



कम्माले ना?



परवाच आमच्या डाँक्टर मित्राने चकव्याचा सायंटिफीक अर्थ सांगितला.



Lost in Time, Space n Surroundings!



हा असावा:



~ थिजवा चकवा

वेळ, व आसपासच्या जागेत हरवणं!



याचबरोबरीने असावेत (मोबाईल च्या मराठी की-पँड मधील, सलग अक्षरे, लाईन)



बोलावा, हळवा, गारवा, जळवा, डिचवा, पळवा, रडवा, कितवा, तिडवा, चोरावा, टिकवा, मानावा, नसावा, वळवा, सांगावा, षष्ठावा, आणि, येडxवा...चकवा!!



मग आहेतच की:



~ फसवा चकवा:

काही गोष्टी खूप आधी ठरलेल्या असताना, सहज शक्य असताना, बाहीकाही थातुरमातुर कारणं शोधून, काढून, मारलेला धोबीपछाड.



~ ओणवा चकवा:

हात धूवून पाठी लागल्यामुळे मसका लावून पिछवाडेसे कलटी मारण्याची कला.



~ गारवा चकवा:

टू गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर.



किंवा,



~ लकवा चकवा:

अचानक अंगात संचारणारा कृत्रिम वात.



सो मच सो...

---

Milinnd Kale, 19th July 2016

No comments:

Post a Comment