Thursday, July 28, 2016

Er Rational musings #639

Er Rational musings #639



"श्श्या..., च्या** *..., आ****..." मी.

एक दोघी जणी, "काय रे? काय झालं?"

मी, "काही नाही; जरा बरं वाटलं!!"



"काय चटणी आहे यार, बढी़या!" मी, परत.



सकाळी, काँमन डायनिंग एरीयातला हा संवाद. अँन्युअल फँमिली गेट टूगेदर. रात्री अंमळ उशीरच झालाहोता झोपायला. वर्ष भर साठलेल्या गप्पाटप्पा. सगळ्ळ पुरूष मंडळ अमृत प्राशनामुळे झोपाळलेले (अर्थातच अस्मादीक सोडून; कारण आम्ही नाही त्यातले - [आता!]). आमच्या अहो मायाबाई, आमचं समस्त भगिनी मंडळ व बच्चे कंपनी आँलरेडी विराजमान झाली होती, व बऱ्यापैकी प्लेटा (खाल्लेल्या) पूढ्यात दिसत होत्या. म्हणजे अल्मोस्ट ब्रेकफास्ट झालेला दिसत होता सगळ्यांचा.



नाश्त्याला बूफे मांडलेला. इडली, सांबार, चटणी, पोहे, शिरा, आँमलेट्स (सांगायची, मग ते आणतात गरमागर्रम), स्लाईस ब्रेड, बटाटे वडे, पाव, लिंबू, बटर, जाम, साखर, व पूढे चहा काँफीची स्टीलची पिंपं. सुरूवात म्हणून मी जस्ट इडली बरोबर चटणी घेतली, पहिला तिसरा घास गिळंकृत करताकरताच हात आपसूकच कौतुकचिन्हात वर गेला व वरील तीन शब्द फूटले. बसलेल्या सगळ्यांनी कसला लूक दिलाय, आई शप्पत, अजूनही आठवतो. पहिल्या दोन वाक्यांपेक्षा, तिसऱ्या वाक्यातल्या चटणीच्या उल्लेखागणिक, सर्वांनी आपसात नजरानजर केलीवती, हे सुध्दा अंमळ लेटच जाणवले.



च्यामारी, काहीतरी लफडा झालाय, मला वाटून गेलं. ते खरच होतं!



"अरे, चटणी कालची आहे, समजलं नाही का?" आमच्या अहो.

मी "बरं, मग? मस्तय ना?"

तरी माझं पालुपद चालूच, "हं, थोडी गार लागली खरं!"

अहो पिसाटल्याच. "अरे, आंबलीये ती. आक्ताच रिसाँर्ट च्या मालकाला बोलावून सगळ्यांनी झाप झाप झापलय!"



आयला; आपल्याला तर बुवा चव आवडली होती चटणीची. ह्हे असं होतं बघा. पोपट-पचका असेल तर तो माझ्यासाठी नसतोच. माझ्यादृष्टीने अन्न (कसेही) हे पूर्णब्रम्ह. शिळंपाक, अळणीबिळणी, कच्चबच्च...आपला काही संबंध नाही. न बोलता आनंदाने खायचं, बास्स. मी (कुठल्याही)खाद्यप्रकाराला चांगल(च) म्हणू शकतो; नावं तर ठेवूच शकत नाही.



आणि, कालपरवातेरवा केलेली, फ्रिज मध्ये ठेवलेली, नारळाची ओली चटणी काय लागते राव, मजा येतो...

---

Milind Kale, 28th July 2016

No comments:

Post a Comment