Er Rational musings #690
हल्लीच मी लिहीलेल्या एका पोस्टीत म्हणलोवतो, पर्सनल गोष्टी इ आपापल्या घरी च ठीकाय. ना कोणाला अडचणत्रास. पण जेव्हा यासम गोष्टी मी, घराबाहेर करायच्या ठरवलं, व केल्या, तर त्या सार्वजनिक होतात, त्यांना सर्व नियमनिती कायदेबियदे लागू होतात. आणि हे खरं आहे, बाहेर पाऊल टाकलं की कोणावर एनक्रोचमेंट नको. मूल्यांच्या आयतात राहणं क्रमप्राप्त व अपरिहार्य.
व्हाँट्सअप्पा शी याच साधर्म्य आढळतं. म्हणजे तूम्ही 'वन टू वन' व्हाँट्सअप चँट करणं वेगळं, व काँमन ग्रूप वरच वागणं वर्तणूक व्यवहार वेगळा! ग्रूपवरचा वावर हा 'सार्वजनिक' या सदरात मोडतो, असे मला वाटते. स्वाभाविकच, पर्सनल चँट व ग्रूप चँट यांत चांगलीच तफावत असायला हवी. लाँजिकली; व प्रँक्टिकली, ती अंमलात आणायला हवी.
फेसबूक हे माध्यम, आपल्याला वैयक्तिक का सार्वजनिक, हा चाँईस देतं. हा आँप्शन कघीही बदलता सुध्दा येतो, अँट द क्लिक आँफ अ माऊस. फेसबूक वरील तूमची स्वत:ची वाँल म्हणजे तुमचं आपल स्वत:च घर समजा ना. ह्याचा उंबरठा ओलांडायचा का नाही; कधी ओलांडायचा; दारातनं काय, कोणाला, किती कितपत, केव्हा, कसं, आत घ्यायचं, ह्याचा सर्वस्वी निर्णय कंट्रोल आपल्या हाती असतो.
व्हाँट्सअँप व फेसबूक, दोनही सुविधा या, "कनेक्टींग पीपल", व 'कर लो दूनिया मुठठी में', अशाच आहेत. परंतु व्हाँट्सअप्पा वर जरा जास्तच काळजी घ्यायला पाहीजेलाय, हे मला जाणवत, व मन:पूर्वक पटत. वास्तविक पहाता, काही महिन्यांपूर्वी, मी थोडी भीतभीतच मतपरवानगी जाणलीहोती, की फ्रेंन्डस्, 'मूझींगू' का ग्रूप वर, का फक्त फबवर मूझींगू? अशी विचारणा करून रीतसर; बऱ्याच जणांनी निर्मळ मनाने म्हणा, भीडेखातर म्हणा, वा मित्राला (म्हणजे मला) नाही कसं म्हणायचं, या भावनेतून संमत्ती दर्शवली होती. ग्रूपवर मूझींगायला!
काळजी घ्या; नाहीतर आपण जर्रा वहावलोच. बोट जेव्हा अलाऊ करतात, सांगतात पकडायला, तेव्हा फारतर पंजा पकडावा, एकवेळ चालेल, पण हात च एकदम पकडू नये. हे साफ विसरू नका. (...घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे...असच काहीसं होईलय).
असो.
तद्नुसार भरदिवस सुविचार, विनोद, व्हिडियोज, तसबिरी, व समस्त चर्चा, यांचे वाचन विवेचन विश्लेषण व वाहवा, बंद न करता, ग्रूपमधला पोस्त-वावर तसा संयमी संतुलित सहेतूक असायला हवा.
विस्तृत निवेदन ममहितार्थ जारी...
---
मिेलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२६ आँगस्ट २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment