Er Rational musings #681
डाँ नरेंन्द्र दाभोलकर सरांबद्दल आदर बाळगून, एक भित्री कविता ....‼️
जगा व जगू द्या...
मुर्त्यांना पुजता पूजता
माणूसकीला जपतो मी❗️
काल्पनिक देवांना मानता मानता
फुले, शाहू, आंबेडकरांना आचरणात आणतो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
पोथ्या, पुराणे वाचता वाचता
गोब्राह्मणप्रतिपालक राजांना लवून मुजरा करतो मी❗️
दगडासमोर झुकता झुकता
जिजाऊ, सावित्री, रमाईलाच शोधतो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
घामाचे पैसे दानपेटीत टाकून,
डोळसपणे सढळ सकल मदत करतो मी❗️
तहानलेल्यांना पाणी,
भूकेलेल्यांना अन्न देऊन,
देवस्थान निमित्ते समाजहित साधतो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई म्हणून जगता जगता,
सर्वधर्मसमभाव सहिष्णूततो मी❗️
धर्मातील पाखंडांना न जपता,
संघम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
कर्तुत्ववान माणसापेक्षा,
दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗️
मंत्र, होमहवन, कर्मकांड, पूजाअर्चा करता करता,
बुध्दम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,
थेट माझ्या ध्येयाजवळ पोहोचतो मी❗️
श्रध्दा वा अंधश्रद्धा? वैज्ञानिक पातळे पारखून,
धम्मम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
छाती ठोकून सांगतोय,
सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२३ आँगस्ट २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment