Thursday, August 25, 2016

Er Rational musings #686

Er Rational musings #686



मला बडी गंमत वाटते.



~ मी सकाळी पहाटे उठताउठल्यावर हात जोडावे का?

~ मी शूचिर्भूत होऊन संध्या करावी का?

~ मी गायत्री मंत्राचा जप करावा का?

~ मी देवघरासमोर बसून पूजा करावी का?

~ मी रामनाम घेऊन घराबाहेर कामानिमित्ते पडावे का?

~ रस्त्यात दिसणाऱ्या, लागणाऱ्या देवळाकडे बघून, डोकं-कपाळ ते तोंड-छाती भर नमस्कारवंदन करावे का?

~ कामावरून घरी परतल्यावर संध्याकाळी घरात देवासमोर दिवा लावावा का?

~ रात्री जेवताना पुढ्यात वाढलेल्या अन्नाला नमस्कार करावा का?

~ रात्री झोपताना रामरक्षा म्हणावी का?



~ मी घरी सत्यनारायण वा सत्यविनायकाची पूजा सांगावी का?

~ मी घरी गणपती बसवावे का?

~ मी दसऱ्याला किती रूपयांचे तोरण दारी लावावं?



वगैरे.



कायकाहीही हरकत नसली पाहीजे व नसावी कुणाची. कोणासकाय त्रासअडचण? जोपर्यंत या 'मी' च रुपातर 'आपण' मध्ये, व 'घराच' रुपांतर 'बाहेर' मध्ये होत नाही, तोपर्यंत.



सणसणावळ, उपासतापास, रूढी, पूजाअर्चा, परंपरा, उत्सव, श्रद्धा, भाव, भक्ती, श्रृती, आरती, औक्षण, नमस्कार, पुराणपोथी वाचन, पठन, मनन, चिंतन, श्र्लोक, होमहवन, इत्यादि सर्व, आर, अँन्ड शूड बी इमेन्सली वैयक्तिक व्यक्तिगत.



परंतु-आणि जेव्हा हे सगळ एकटंदुकटं, वा एकत्र, जेव्हा सांघिक सार्वजनिक होतं, तेव्हा मात्र आक्षेप घ्यायला रास्त वाव आहे. आणि "लाँ आँफ द लँन्ड", (प्रिव्हेल्स!), हा अंतिम शब्द आहे, यावर दुमत नसावे.



हा जसा हेटाळण्याचा विषय नाहीये, तसाच तो फुका-हक्काचाही विषय नाहीये. यात 'आपण' आणि 'ते', 'आपल्याला नाही', तर 'त्यांना का'?, 'आम्ही' बंद करतो, 'त्यांच'ही बंद करा, नव्हे, सगळ्यांचच कायमचच सार्वजनिक बंद कराकी!! हा ही विषय नाहीये.



खरा विषय आहे, सामंजस्याचा. सजगतेचा. सतर्कतेचा. सार्वजनिक नितिमत्तेचा. सुरक्षेचा. व सार्वभौम आदर समभावाचा. आणि सगळ्यांच्या सहभागाचा! स्वीकारार्हतेचा!



सविनय कायदेभंग करून स्वातंत्र्य मिळवलय, स्वातंत्र्यसैनिकांनी. आपल्याला फुकट मिळालय; आता तो अक्षम्य गुन्हा आहे!



श्रेष्ठपरिपक्वसमृध्द भारत जोडो अभियान...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment