Friday, August 5, 2016

Er Rational musings #652

Er Rational musings #652



शुभास्ते सन्तु पन्थान...



मला या वेळेस प्रचंड उत्सुकतावजा होपस् आहेत. रिओ आँलिंम्पिक्स मधून आपण एक डझनभर पदकं घेऊन येण्याच्या!



आत्तापर्यंतच सर्वात मोठ पथक गेलय, व भाग घेतय; जवळपास 110 खेळाडू निरनिराळ्या खेळांमध्ये जगाशी स्पर्धा करतील.



अपेक्षावान खेळाडू :-



दिपीका कुमारी (तिरंदाजी), विकास गौडा (थाळी फेक), ललिता बाबर (3000 मी स्टीपलचेस), कविता राऊत व खेताराम (मँरेथाँन), सायना नेहवाल - पी व्ही सिंधू - किदंम्बी श्रीकांत - ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा (बँडमिंन्टन एकेरी, दूहेरी व टीम चँम्पियनशिप), दीपा कर्माकर (जिम्नँस्टिक्स), हाँकी टीम चँम्पियनशिप, गगन नारंग व अभिनव बिंद्रा (नेमबाजी), अचांथा शरथ कमाल (टेबल टेनिस), लिएंन्डर पेस - रोहन बोपन्ना - सानिया मिर्झा - प्रार्थना ठोंम्बरे (टेनिस, मेन्स व विमेन्स व मिक्स्ड डबल्स), नरसिंन्ग यादव - योगेश्वर दत्त - संन्दीप तोमर (कुस्ती).



याव्यतिरिक्त जे जे जो कोणी पदक मिळवेल, तो बोनस. पण माझ्या खऱ्या अपेक्षाआशा एकवटल्याहेत त्या वर उल्लेखलेल्या खेळाडूंवर!!



तयारी तर सगळ्यांनीच जोरदार केलीये. जीवतोड मेहनत करताहेतच. खेळप्रतिष्ठा पणाला लावून हे तरबेज जिगरबाज लढतील, वरचढ प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर देतील, आपल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करतील व यश संपादन करतील, याबद्दल अनेकानेक मन:पूर्वक शूभेच्छा.



इंडिया ss इंडिया...



गणपती बाप्पा मोरयाsss

---

Milind Kale, 4th August 2016

No comments:

Post a Comment