Monday, August 22, 2016

Er Rational musings #676

Er Rational musings #676



"Let's agree to disagree!"



ह्या वाक्यावर मात्र आमच एकमत झालं. फेसबूकी भाषेत बोलायचं तर आम्ही दोघेही 'सहमत' झालो, १०० टक्के सहमत...!



बरेचदा काय होतं, की, मतभिन्नता असू शकते खूपदा, पण वितंडवाद न घालता, समोरच्याच्या भूमिकेचा आदर राखून, एका ठरावीक पाँईंट नंतर, सामोपचाराने हातमिळवणी करायला हरकत नसावी. हे सभ्यपणाचे, पोक्तपणाचे व समजूतदारपणाचे लक्षण आहे.



तसाही फार मुत्सद्दीपणा सुध्दा जाम डोक्यात जातो. 'तुझे बरोबर आहे, पण....' या पणानंतर आपल स्वत:चच घोडं पूढे दामटणारे लोक्स पुष्कळ आहेत. (खर तर, जर माझं बरोबर असेल, म्हणजे असं जर समोरची व्यक्ति मान्य करतीये, तर, हा पण मध्ये कसाकाय येऊ शकतो, हे मला पडलेले एक कोडे आहे). शिवाय हा म्हणजे विरोधाकरिता विरोधच झाला ना? पण फुक्कट चर्वीचर्वण. वेळ जाणार. वेस्टेज आँफ टाईम, काँस्ट अँन्ड एफर्टस्!!



त्यापेक्षा हा जगन्मान्य मध्यममार्ग.



तो त्याच्या वाटेने, मी माझ्या वाटेने. त्याच्या दृष्टीने तो च बरोबर, माझ्या दृष्टीने मी च बरोबर. चला, हवा येऊ द्या.



टाटा, सी यू, बाय बाय...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२२ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment