Tuesday, August 16, 2016

Er Rational musings #666

Er Rational musings #666



एखादा दिवस हल्ली पूर्ण बाहेर काढायचा असला, कामानिमित्त, की जरा तयारी करावी लागते, जाणीवपूर्वक.



आजी असताना, तिच्याकडून "पेरूचा पापा" शिकलोहोतो. घरातनं बाहेर पडताना ती विचारायची, मग मीच स्वत:लाच विचारायचो. की "पेरूचा पापा" घेतला का?



पे - पेन, रू - रूमाल, चा - चावी, पा - पाकीट, पा - पास (रेल्वेचा). हा पेरूचा पापा घेवून "मी येतो", (जातो, असं म्हणायचं नाही, इति आजी; 'येतो' म्हणलं की परत येण्यासाठी च जातोय, असं ती म्हणायची!), असं म्हणून घराबाहेर पाऊल टाकायच. हा शिरस्ता, नियम, शिकवण;

या 'पेरूच्या पापा' ला मी गेल्या दहा तेरा वर्षांत कस्टमाईज केलय; अँड केलय त्यात.



आता माझं स्वगत असतय, की "पेरूचा पापा मोछ", घेतला का बरोबर?! (मो - मोबाईल, छ - छत्री)



परंतु गेल्या दोनचारेक वर्षभरातच, म्हणजे ओव्हरस्मार्ट फोन ने माझा ताबा घेतल्या पास्नं, नवनवीन डिव्हायसेस, गँजेटस् व अँक्सेसरीज, बरोबर असणं अनिवार्य झालय. त्यामुळे तो सगळा तामझाम न विसरता नेणं म्हणजे एक दिव्यच आहे.



चारचाकी ने दिवसभर काम करत थांबत फिरायचं असेल तर, कार मोबाईल चार्जर, आँक्स (आँक्झिलिअरी) काँर्ड, जून्या हिंदी गाण्यांची पेन ड्राईव्ह, हँन्डस् फ्री, [आता एका चारचाकीत आँडियो सिस्टीमला मल्टीपल फोन्स कनेक्ट करता येतातते, त्यामुळे तशी हँन्डस् फ्री वा वायरलेस ब्लू टूथ ची (हा ब्ल्यू टूथ एव्हढा विचित्रघाण दिसतो झुरळ कानावर बसल्यासारखं दिसतं!) गरजमात्र दूसरी चारचाकी नेली तर लागतय हे सगळ]



शिवाय, बरच कायकाय लागत बरोबर; मोबाईल बँटरी डाऊन झाली, तर लागणारा पाँवर पँक; पेन ड्राईव्ह मोबाईल ला लावता येईल अशी छोटी काँर्ड; व ड्यूअल पेन ड्राईव्ह, म्हणजे छोट्टीशी पेन ड्राईव्ह, एक बाजू डायरेक्ट मोबाईल च्या स्लाँट मध्ये जाऊ शकते, व दूसरी बाजू म्हणजे नाँर्मल पीसी व लंंपटाँपच्या पेन ड्राईव्ह स्लाँट मध्ये जाते. तो. प्लस डाँन्गल फोटाँन मँक्स हवाच. वरतून नाँर्मल मोबाईल चार्जर असावाच लागतो बरोबर.



बापरे, कित्ती ही तयारी. पण खरच सांगतो, प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता भासते व लागते सुध्दा प्रसंगीवेळी. आणिक महत्वाचे म्हणजे, जनरली कुठेकाही अडत नाही.



पेरूच्या पापा (व मोछ) प्रमाणे, ह्या फुटकळ चीजा अँब्रेव्हिएट करता येत नाही, ह्याच दु:ख आहे.



"पेरूचा पापा" "मोछ" "अँsssक्षी" (अँक्सेसरीज!!!)...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१६ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment