Thursday, August 4, 2016

Er Rational musings #650

Er Rational musings #650



ऐश्वर्य, पैसा, संपत्ती, वैभव, यांना नावं ठेवण्याची काही लोकांना सवयआवड असते. तशी फँंशनच झाली आहे.



जगायला पैसा लागतोच ना?



~ "पैसे छापणं"...

हा वाकप्रचार (सुविचार) तसा नवीन आहे. यात कमावणं, खाणं, बनवणं, मिळवणं, हे सर्व समाविष्ट आहे. अँक्च्यूअली बख्खळ संपत्ती हा याचा सरळसोट अर्थ आहे. मिंन्टींग मनी (टांकसाळ) चा हा खरा अर्थ.



~ पैसे झाडावर लागत नाहीत...

हा मात्र तसा जूनाच वाकप्रचार  पैशांच झाड.



~ Money is the root of all evil...

असं वारंवार सागितल जातं. बऱ्याचअंशी खरय.



~ चार पैसे काय कमवायला लागला...

पैसा माणसाची नियत बदलतो. म्हणतात. अहो, माणूसच बदलतो ना?!



~ पैसा म्हणजे सर्वस्व आहे का...

नक्कीच नाही; कोणी दावा ही करत नाही.



~ सुख पैशाने नाही विकत घेता येत, अशी म्हणण्याची फँशन आहे. अरे पण, आता तर सगळ्याच बऱ्याच गोष्टी पैशाने नाही का विकत घेता येतात? इंन्क्ल्यूडिंग मानवी अवयव? आणि हेच तर सुख आहे ना? किंबहुना ही भावनाच महत्वाची नाही का?



~ फार आवडती उद्घोषणा (!); काय करायचाय एव्हढा पैसा, मेल्यानंतर काय वर घेऊन जाणार आहे का? अरे, धीस इज टू मच. इटस् प्लेन अँन्ड सिंम्पल.



मेल्यानंतर बेटर हाफ, बाळंमुलं, असतातच ना? इन्व्हेस्टमेंन्ट, बँन्क बँलन्स, स्थावर मालमत्ता, दागिनेदाग, इत्यादि अनंत 'भौतिक' गोष्टी रहातातच ना? पूढच्या वारसदारांना? आणि त्यांच सूख म्हणजेज आपलच नाहीका?



उगाच च पैशाला नावं ठेवायची. आपापली बुध्दी, ज्ञान, कष्ट, हुशारी, अक्कलशक्ती, चातुर्य आदी गुणांच कन्व्हर्जन इनटू मेहनताना, मोबदला, रास्त किंमत...पैसा!



...इनसोफार अँज द मनी इज अर्नड् लेजीटिमेटली, लीगली व अबोव्हबोर्ड, नथींग राँन्ग. इटस् अ बार्टर, अ ट्रेड, वेल्थ.



Health, Wealth, Happiness and Success...आपण विश करतोच की. Wealth शिवाय Health, Happiness व Success नाही का? असं अजिबात नाहीये. प्रचंड उदाहरणं आहेत, पैशाशिवायही "अचीव्ह" केल्याची. सगळ सापेक्ष व पराकोटीचं व्यक्तिगत आहे हे. सरधोपटपणे सगळ्यांना धोपटणं काही बरोबर नाही.



आणि फुका नाकं मुरडण्यात तर काहीच हशील नाही...

---

Milind Kale, 4th August 2016

No comments:

Post a Comment