Friday, August 26, 2016

Er Rational musings #687

Er Rational musings #687



चांगले बोलणाऱ्याला चांगले लिहीता येतेच, असे नाही.

चांगले लिहीणाऱ्याला चांगले बोलता येतेच, असे (ही) नाही.

पण, चांगले लिहीता येणारी माणसं, मनाने चांगली असतातच; आणि, चांगले बोलणारी माणसं, मनाने चांगली असतातच, असे नाही!!



घट्ट (फर्म) शेक हँन्ड करणारी, शेकहँन्ड करताना, किंचितसा पंजा प्रेस करणारी माणसं, निर्मळओपन असतात.

अर्धाच पंजा हातात मिळवणारी, तळवेबोटं टेकवल्यासारखं करणारी माणसं, थोडी रिझर्वड, कसल्या पाशात अडकायला नको, अशी असतात.



चालताना, दोन्ही पायांचे अंगठे इनवर्ड असणारी, झपझप पावलं टाकणारी माणसं, तशी फोकसड् असतात. दोन्ही पायांचे अंगठे बाहेरच्या दिशेला असतील, व शांत निवांत शिशिर सरला - अशी संथनिवांत पावले टाकणारी माणसं हँप्पी गो लकी, थोडी निष्काळजी असतात.



ताठसरळ उभी असलेली माणसं, एनर्जेटिक असतात. एका पायावर, मग दूसऱ्या पायावर, मग परत पहिल्या पायावर, आलटून पालटून वजन ट्रान्सफर करणारे लोक्स थोडे चंचलविभोर असतात.



स्वत:च्या सही मध्ये वरती डाँट (टिंब) असेल तर हे लोक्स जास्तकरून भावनिक (हृदय मोअर इंपाँर्टंट दँन डोकं) असतात. तर, सहीच्या खाली टिंब देणारी माणसं व्यावहारिक (डोकं जास्त महत्वपूर्ण, दँन हृदय) असतात. आणि जेव्हढे डाँटस् जास्त असतील सहीमध्ये, वर, वा खाली, तेव्हढी याची तीव्रता वाढलेली दिसते.



तत्समअजून खूप इंडिकेशन्स ट्रेडमार्क कल ओळखता येतात तसे. आणि सत्यासत्यतेचा स्ट्राईकरेट मोअर दँन ८०% तरी असेल, या देहबोलीचा.



जजमेंटल पारख टेक्नीकस्...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment