Monday, August 15, 2016

Er Rational musings #665

Er Rational musings #665



फेरीवाला, म्हणजे फिरता फिरता माल वस्तू विकणारा. ओरडत त्याच्याकडील सामानाची जाहीरात करत करत, फिरस्ता व्यापारी!



वरील अर्थ, आँक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी मधे दिलाय.



आता आपली हाँकर कम्युनिटी वा फेरीवाले; याबाबतीत काय हकिकत आहे.



फेरीवाले म्हणजे मार्केट रोड वर, वा इतर वर्दळीच्या रस्त्यांवर, फूटपाथवर, रहदारीच्या रस्त्याच्या मधे, गटाराच्या बाजूला, कचराकुंडी च्या पुढे, एम एस ई बी च्या लाल रंगाच्या फिडर बाँक्सला वा एमटिएनएल च्या करड्या रंगाच्या टेलिफोन टँग ब्लाँकला खेटून, बीईएसटी च्या बसस्टाँप चा आसरा घेवून, दूकानांच्या, रिक्शा टँक्सी स्टँड च्या आगे पीछे दायने बाहे उपर नीचे, कुठेही, कसेही, बसून वा हातगाडी लावून वा खोपटं बांधून 'धंदा' करणारे लोकं!



दिवस संपता क्षणी, त्याच जागी, आपापल्या मालाच्या पेट्या पेटारे तिथ्थेच बांधून ठेवले जातात. रात्री फेरफटका मारला की दूतर्फा रस्त्यावर, फूटपाथांवर, या फेरीवाल्यांच्या हक्काच्या मालकीच्या (!) प्राँपर्ट्या दिसतात. दिवस उजाडताच, तिथ्थेच धंदा व्यवसाय सुरू!



झक् मारत गेली ती आँक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी व *"भटका विमुक्त व्यावसायिक"* हे फेरीवाल्याचं मिनिंग.



त्यातनं ते आपले 'फेरीवाला क्षेत्र' वगैरे मार्कड एरियाज म्हणजे मोठा जोक आहे. कुठलाही रस्ता घ्या, तो मोठा केला वा अतिक्रमण मूक्त केला वा नो पार्किंग वगैरे बोर्ड लागले, की समजावं, तेरा सोळा दिवसात, खाऊगाड्या लागणार तिथे.



किमानपक्षी प्रत्येक रस्त्यावर जंक्शन, मग ते छोटमोठ कुठलही, आलं, की त्याच्या चारही बाजूला किमान पंधरा फूट मोकळे केले तरी वाहतूक समस्या सुटू शकायला हातभार लागेल. आत्ता बरेच ठिकाणी, हे कोपरे न कोपरे व्यापलेत, वर्तमानपत्रांचे स्टाँल, दूधाचे स्टाँल, चांभार, शहाळंवाले, वडाभजीपाव वाले, केळीविके, गायचारावाले, चहावाले, सिगारेटपानवाले, भाजीवाले, हारफूलेवाले, असे असंख्य छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांनी. बळकावलेत!



म्युनिसिपालटी, पोलिस खातं, रस्ते 'मालक', आणि निरनिराळ्या संघटना/संघ/संस्थांची 'रितसर' 'परवानगी' घेऊन व व्यवसाय'शुल्क' भरून, अक्षरशः समांतर अर्थव्यवस्था निर्माण करून हे 'धंदे' होत नसावेतच असे नाही.



शोधा म्हणजे सापडेल; उत्तरऊतारा ओ...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

16th August 2016

No comments:

Post a Comment