Er Rational musings #645
"Write something on the board"
एका मिडल मँनेजमेंटच्या पदासाठी इंटरव्ह्यूज चालू होते. जर्रा बऱ्यापैकी सिनियर, पण, लोअर मँनेजमेंटची लोकं, रूमच्या बाहेर, एका काचेच्या मिटींग रूम मध्ये बसली होती. चहा/काँफी, बिस्कीटे सर्व्हिस चालूच होती. एकेकजण इंटरव्ह्यू रूम मध्ये जायचा, सात नऊ मिनिटांनी बाहेर.
आतमध्ये एक काँन्फरन्स लंबगोलाकार टेबल, सभोवती खूर्च्या, एक व्हाईट बोर्ड, मार्कर पेन, मिनरल पाण्याच्या छोट्या बाटल्या इत्यादि हजर जागच्याजागी, पण मुलाखतकार एकच.
आल्याआल्या हास्तांदोलन, ग्रिटींग्ज, एक्सचेंज आँफ प्लेजंट्रीज इत्यादि. मग कँन्डिडेट स्थानापन्न झाल्यावर, पहिले जुजबी नाव गाव पत्ता वगैरे. मग पुढची रिक्वेस्ट वजा आज्ञा "Write something on the board"!
एकापाठोपाठ एकजणं काहीतरी लिहायचे फळ्यावर, मार्कर नी. काहीबाही, म्हणजे अगदी हँलो, हाऊ आर यू, ते गूड माँर्निंग सर, ते अगदी काहीही.
एकानेच लिहीलं: "SOMETHING"
हम्मम्मम्म. तो (च) सिलेक्ट झाला, असलं फिल्मी काही झालं नाही, पण त्याला वेटेज मात्र मिळालं, थोडसं ऊजवेपण.
सिलेक्शन अर्थातच सर्व अंगांनी प्रावीण्य व अँप्रोच, व इतर बरेच स्किल सेटस् बघून होतं, इथेही झालं असेल.
"Write something on the board" अशी सूचना जेव्हा बाँस करतो, तेव्हा 'समथिंग' म्हणजे काहीही व्हेग नव्हे, हे कळलेच पाहीजे, असा याचा अर्थ! (मिडल मँनेजमेंटच्या लोक्स ना)
मला वाटते, की, विधाता जेव्हा आपल्याला असा ढकलतो या होरायझनलेस इंटरव्ह्यू रूम मध्ये, तेव्हा "त्या"ला अभिप्रेत असलेलं 'समथिंग' आपण रेखाटतो, का कायपण रँन्डमली उपद्व्याप करतो? सिलेक्शन अवघड आहे!
विधीलिखित...
---
Milind Kale, 1st August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment