Tuesday, August 2, 2016

Er Rational musings #647

Er rational musings #647



व्वॉव, काय छान साडी कँरी करते ना ती?!



हे ऐकल्या बरोबर मान फिरवली मी! मनात म्हणलं की हे म्हणजे जगातल एक आश्चर्यच म्हणावं लागेल. साडीला कँरी करायचं, म्हणजे उचलायच? वेटलिफ्टर आहे की काय? कँरी करते म्हणे! थोडा लेटच प्रकाश पडला; अर्थ असा, की ग्रेसफूल का कायते, सुंदरसुरेखसुडौल वगैरे दिसणं, शोभणं वगैरे वगैरे. असो. "कँरी करणं!"



लुगडं, पातळ, व चोळी, पोलकं.



अँक्च्यूअली, साडी घालून (सॉरी, नेसून) झाल्यावर, आरशासमोर सरळ समोर नव्हे, तर आडवं (साईडवेज्) उभे राहून, निऱ्या बिऱ्या ठीकठाक करतासरता, बायका जे पाय दुमडत असतात, दोन्ही गुडघ्यांपर्यंत वाकवत बिकवत, साडीचा घोळ नेटकत(!), पदर जो चाचपत असतात, (हा पदर पण असा परफेक्टली गुडघ्यांपर्यंत आला पाहीजे बर का! किंवा हातावर उपरणं घेतल्याबरहुकूम पेशवाई थाटात ठेवला की काठ (!) अस्सला मस्स्त दिसला पाहीजे कीनी!!), ते; आणि ब्लाऊज खालील उघडी पाठ झाकण्याचा पदराच टोक खेचून खेचत अडकवत जो केविलवाणा व असफल प्रयत्न करतात, ते; या सगळ्याची सम टोटल प्रचंड म्हणजे प्रचंडच "ग्रेसफूल" असते यार! हे खरखरं कँरी करणं!!



मँचींग ब्लाऊज हे एक निराळच प्रकरण आहे! एकदम कॉन्ट्रास्ट वा साडीच्या काठाच्या रंगाचा वा साडीवरच्या प्रिंट च्या डिझाईनरंगाचा, व अगदीच काय नाय सापडलं तर सफेद वा काळ्या रंगाचा (जसं काळी पँन्ट कोणत्याही शर्टासोबतीने असते तसा) ब्लाऊज, वगैरे वगैरे, ही एक झलक!



कँरी!



१९७० च्या सुमारास 'Carry On' सिनेमांची सिरीज आली होती; त्यातलच एक, विथ रिस्पेक्ट टू 'कँरी ऑन लव्हींग' सारखं



"कँरी ऑन साडी!"...

---

Milind Kale,2nd August 2016

No comments:

Post a Comment