Er rational musing #688
जनित्र म्हणजे जनरेटर हे ठाऊक असेल बहुतेककाही जणांना. पण, माझ्या साठी नेमणूक पत्रात नमूद केलेलं भलत्याच फॉरेन भाषेत होतं, तेव्हा @१९८४ मध्ये. प्रवर्तन व परिरक्षण विभागात, असा उल्लेख. धड विशी पण नव्हती पार केलेली तेव्हा! त्यात भर म्हणून हे लँटिन व ग्रीक भाषेतल लिखाण! असो.
या प्रवर्तन व परिरक्षण विभागात, रोहित्र देखभालीचं काम आम्ही करायचो. संग्राही केंद्रात! पर्यवेक्षक व तारतंत्री बरोबर असायचे. नंतर जोडणी विभागात बदली झाली. मग उपकेंद्रातील भारवाहक जोडण्या हाताशी आल्या. कालांतराने मार्गप्रकाश विभागात आलो. इथे पथदिवे नशीबी आले. उर्जासंधारण, नियोजन, वीजग्राहक, उभारणी, उच्चदाब, भूमीगत वाहिनी, प्रकल्प, ते दक्षता, ते अगदी कार्यशाळा, असा मार्गप्रवास करत, अनुभवात भर घालत, ल आणि ट मध्ये जॉईन झालो, जवळपास १२ एक वर्षांनी!
पुन्हा एकदा, असोsss
मराठीमनहंडीसम्राट ह़दयात घुसले, असंल बोजड वाटतय का?
लाईनीवरती येतो!
तर, या ल आणि ट नंतर, दोनही रिलायेबल बंधूंकडे शेप्रेटली काम केलं, व आता, पाचेक वर्षांत, मी माझा - महाराष्ट्र माझा!
*'अँन्ड द रेस्ट इज हिस्टरी' !!!* नाऊ.
तळटिप: 'रेस्ट' म्हणजे 'आराम' या अर्थी वापरले आहे; फूका कडू गैरसमज नसावा.
परत आता एक नवव्हेंचर...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२६ ऑगस्ट २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment