Friday, August 12, 2016

Er Rational musings #664

Er Rational musings #664



मला वाटतं की आपण बरेच लोक्स 'काल'मध्ये व 'उद्या'मध्ये सतत पालटूनआलटून जगत असतो. ('आज' पेक्षा). तीचतीच गोष्ट उगाळायला, चर्वीचर्वण करायला आपल्याला जास्त भावतं, व आपण ते एन्जाँय पण करत असतो. तसेच, भविष्याचा सतत विचार करत आपण बरेचदा चिंताग्रस्त मूद्रेने वावरत असतो. नवल याचं, की आपण हे ही, नकळत का हुईना, एन्जाँय करत असतो. परंतु, आपल्याला 'आज'मध्ये जास्त जगायला पाहीजे असेही सारखं वाटतं मला.



कल आज और कल की धडकन, चलती जा़ये घडीं sss

टिकटिक टिकटिक टिगीडीगी डिकटीक sss



पृथ्वीराज, राज व रणधीर कपूर, सिनेमा: "कल आज और कल."

या 'कलकल' ला 'आज' पेक्षा अति महत्व. असे न होता, याच चित्रपटातल्या बबीता (रणधीर कपूरची सिनेमातली हिरॉईनप्रेयसी व रिअल लाईफ मधली प्रेयसीपत्नी) वर आपण जास्त 'लक्ष' (अर्थाअर्थी नव्हे!) केंद्रित करायला पाहीजे!! बबीता म्हणजे व्यक्तरेखा वा नटी म्हणून नाही, तर ती पिक्चर मधल्या 'आज' ची संकल्पना आहे, प्रतीक आहे, म्हणून!



या कलकलीचे, (कल और कल, काल व उद्या) सोशल सिक्युरिटी, पाश्चात्य देशांइतकी पाँवरफुल नसणे, हे एक महत्वाचे कारण असावे. प्रत्येक सजीवनिर्जिव गोष्टींची, त्यामुळेच की काय, कायम काळजी करण्याचं वा अवास्तव स्वप्नं बघण्याच व्यसनच जडलय म्हणा ना, आपल्याला!



याला अनेक जूनी व्हिंटेज, काँन्ट्रँडिक्टरी विधानं पूरक आहेत, व हातभार लावताहेत; ती एव्हढी बिंबली गेलीयेत आपल्या सब काँन्शस मनात, की काही बोलायची सोय नाही. मग आपसूक आपली वर्तणूक, दूहेरी दुभंगलेली सर्रास राजरोसपणे दिसून येते.



~ समय से पहले, और भाग्य से अधिक  कुछ नहीं मिलता।

हे म्हणजे फर्स्ट व फोरमोस्ट! कहर.

कारण आपण पामर; "हा" समय नक्की केव्हा? हे गौडबंगालच. गुपित. ते कोण सांगत नाही. म्हणजे "जे" मिळेल, "ते" व "तेव्हढच," व "तेव्हाच" "तसच" मिळणार होतं, मिळतं, ही एक मनाची भाबडी समजूत. पळवाट.



~ आले देवाजीच्या मना.



~ जे विधिलिखित आहे तेच होणार.

असच जर असेल, तर, काहीही हालचाल न करता स्तब्ध बसावे की नाही? पण नाही, कारण

~ प्रयत्न करत राहणे, फळाची अपेक्षा करू नये.

म्हणजेच किती क्षूद्रता असावी मानवाची!



मग, या 'कालच व उद्याच' रहाण्या शिवाय नापर्याय असतो. भूतवेळेला कवटाळून, व आशाळभूत असहाय्यतेने भविष्याची आच लाऊन, 'आज'च अगतिकतेने आचरण, असही आपल्या अंतर्मनात प्रोग्राम केलं गेलय. ऑटो ग्रूमींग केलय आपल्याला. ब्रेन वॉशिंगच म्हणा ना!



असो; मुद्दा साधा सरळ सिंपल आहे.



कल करेसो आज, आज करेसो अब।

अर्थातच, आज, आत्ता, ताबडतोब.



कारण, ज़िंदगी ना मिले दोबारा; सो एन्जॉय एव्हरी टिटबीट...

---

Milind Kale, 13th August 2016

No comments:

Post a Comment