Er Rational musings #680
चारचाकी चा इंन्श्यूरंन्स म्हणजे काहीतरी झोल आहे नक्कीच. एकतर, रिन्यूअल डेट जवळ आली की कुठनं सगळ्यांना समजत, देव जाणे. मग टोळभैरवांची वावटळ धाड तुटून पडते. फोनावर फोन. बर, हे सगळे एकमेकापेक्षा स्वस्त प्रिमियम कँलक्यूलेट करायला सदैव तत्पर असतात.
"उसने कितना दिया है सर, हम उससेभी कम में करवां देंगे" हे सांगणारे फोन्स. मग गाडीची आयडीव्ही कमी करून, रिवर्क (!) करून, फ्रेश कोटेशन मेलवर हज्जर!
दा़ल में कुछ काला ज़रूर हैं।
इंन्श्यूरंन्स मध्ये, गाडीचे काही काम करायचा प्रसंग आला, तर, आणखीनच मोठा झोल असावा.
म्हणजे बघा, आपण ठरावीक पेपर बिपर भरून द्यायचे, अँक्सीडेंन्ट कुठे कधी, ड्रायव्हर कोण, असले डिटेल्स भरायचे, व काही डाँक्यूमेंन्टस् च्या झेराँक्स देवून घरी जायच. पूढचं सग्गळ पडद्याआड, तुमच्या नकळत मँनेज होतं. खरा खर्च किती, इंन्श्यूरंन्स कंपनी कडनं किती हे सगळच संशयास्पद. बरं, याउप्पर आपल्या कडनंही काही रक्कम, रितसर रिसीट बिसीट देवून, वसूल केली जाते. तसा कमी भूर्दंड म्हणून आपण खूश. वेहीकल इंन्स्पेक्शन, ते रिपेअर्स, ते डिलीव्हरी, परफेक्ट चेन आहे. तरीही शंकेची पाल चुकचूकतेच. आणि "नो क्लेम बोनस" जातो, ते अँडिशनल!
कुछ तो गडबड हैं दया...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२३ आँगस्ट २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment