Friday, August 26, 2016

Er Rational musings #689

Er Rational musings #689



आयटी क्षेत्राबद्दल मी संपूर्णपणे अनभिज्ञ आहे. हे आयटी वाले नक्की काय काम करतात, हा प्रश्न तर कायमच मला छळत असतो. हसतखेळतमजेत असतात आयटी वाली मुलीमुलं. शिवाय खूप संख्येने असतात हे लोक्स. जगातला सर्वात मोठा बँक आँफीस आयटी स्टाफ पण इथेच असावा. दिव्वसभर चकाट्या पिटतात, फिरतात हाँटेलिंग करतात, सेल्फीज काढतात, स्टेटस अपडेट करत असतात, व संध्याकाळनंतर उत्तररात्री पर्यंत भ्रमणध्वनी कानात घुसवून, लँपटँप वर 'लगीन', साँरी 'लाँग इन', करूनशान, 'लव्ह चँटींग', स्साँर्री, 'लाईव्ह चँटींग', हे पठ्ठे अखंड कार्यरत असतात. सरत्याकलत्या रात्रभर; (कारण, तिथे! दिवस असतो ना?) म्हणजे, असा माझा समज आहे ओ.



साँफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग, सँप, बासिस, प्रोग्रामिंग, प्रोसेसींग, डेटा वेअर हाऊसींग, क्लाऊड कंम्प्युटिंग, क्लाऊड स्टोरेज, सब्जेक्ट मँटर एक्सपर्ट्स, गेमिंग, साँफ्टवेअर इंजिनियर्स, साँफ्टवेअर डिझायनर्स, साँफ्टवेअर आर्किटेक्ट्स, ईआरपी, सर्व्हर्स, बँकअप, अशा अनंत आयटी संज्ञांच तसही मला वावडं आहे. जरा मी पायभर लांबच राहतो, असल्या रूटर, नो - राऊटर पास्न.



भलेलठ्ठ पगार, सोयी सुविधा, एव्हरेज एम्प्लाँयी एज तीशीत, मुछमुंढे, तळवाभर मोबाईल असलेले व त्यावर वेळ मिळेल तेव्हा सारखे दोन्ही बोटांच्या अंगठ्यांनी टायपिंग चाललेले (पूर्वी कन्व्हेन्शनल स्टेनो टाईप रायटींग स्पीड बघायचे नोकरी देताना (४० / १०० वगैरे), रविवारचे जरा निवांत असणारे अशी यांची ओळख आहे. प्लस हे नो आँल, सर्वज्ञात आणि जरा अति(च) शहाणे, असतात, असे काही लोकांना वाटते. का? तर म्हणे, अशाच आविर्भावात ते वावरत असतात, व आपल्यासारख्या बिगर आयटी वाल्यांसमोर कसलं बेअरींग घेतात! ते म्हणजे अर्धनारीनटेश्वर अवतार असतात, अर्धी स्त्री - अर्धा पुरूष; वा, नवरंग मधली संध्या 'अरे जा रे हट नटखटsss', असं गाणं म्हणणारी, एका बाजूला पुरूष, व पाठच्या बाजूला स्त्री, बनलेली लोकं असतात, असा ही काही लोकांचा समज आहे. (का? तर म्हणे, यांचा एक पाय इथे, तर दूसरा अमेरीकेत; शरीराने इकडे, तर मनाने तिकडे; एक डोळानाक कान वगैरे इकडे, तर दूसरा डोळाकान व नाक, तिकडे च.)



आणि तरीही, आयटी हे सोप्प फिल्ड नव्हे. एकतर कायम यांना अपडेट रहाव लागत. दिवसामहिन्यांत झपाट्याने होणारे बदल कुर्निसात करून आत्मसात करत, अपडेटाव लागत स्वत:ला. कीप अब्रेस्ट विथ द टेक्नालॉजीकल अँडव्हान्समेंटस्. आणि, या टेक्नालॉजीच्या वाहत्या गंगेत, मासे पकडणं किती कठीण असेलना?!



यांचं महत्व पटतं, पदोपदी, साध्या साघ्या गोष्टींमघ्ये  जेव्हा आपला पीसी बंद पडतो, वा, सिस्टीम स्लो होते तेव्हा. सगळी कामच ठप्प होऊ शकतात. (अर्थातच, काँल केलं आयटी वाल्याला  की तो हमखास इलेक्ट्रिकल वाल्याला दोष देतात. अर्थींग प्राँपर नाहीये. जास्त व्होल्टेज दाखवतय न्यूट्रल व अर्थींग मध्ये. वगैरे नेहमीची बौध्दिक मारामारी होतेच दोघांत!) पण, चार ना सहा शक्यता वर्तवल्यावर काही वेळानी त्याला खरा टेक्निकल इश्शू गवसतो.



एक जादूची किल्ली मात्र आहे ९०० % काम होतं. ती म्हणजे, सिस्टीम रीबूट! काही लोचा लफडं झालं की, वा तसेही मी माझा लँपटँप रिस्टार्ट करत असतो मधनंअधनं.



स्साला, काही अपवादात्मक, म्हणजे "तीन वरदान माग", ह्या टाईपच्या वरा प्रमाणे, काही घटना / प्रसंग असे री-बूट करायला परमेश्वराने दिले तर?



मला एक रीबूट पुष्कळ आहे...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२६ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment