Wednesday, August 17, 2016

Er Rational musings #668

Er Rational musings #668



अवांतरउवाच भाग २



~ मंगळवारी नखं कापावी म्हणतात. खूप *पैशे* मिळतात.



~ शनिवारी केसं कापू नये म्हणतात. खूप *पाप* लागतं.



~ बऱ्याचश्या *कला* (!) नामशेष झाल्यात:



१ प्रेमचिठ्ठी वगैरे पाठवणं

२ डोळा मारणं, व नेत्रपल्लवी इशारे पण!

३ शिट्टी मारणं, शीळ घालणं; (दोहोंत फरक आहे भावा)

४ ट्टाँक ट्टाँक आवाज करणं, जीभ आत टाळूला लाऊन

५ पूचपूच वा प्स प्स आवाज करणं, ओठांचा चंबू करून



~ अँक्टीव्हा, स्कूटी, मास्ट्रो च्या जमान्यात, टू व्हीलर्स स्कूटर्स ना स्टेपनी असायची, हेच मुळी कोणाला माहीत नाहीये. पंक्चर झालेला पुढचा वा पाठचा टायर फटक्यात बदलता यायचा. आता फक्त, *फिल ईट, शट ईट, फर्गेट ईट चा जमाना*.



~ दूचाकी ना आरसा असणं इज कंपलसरी, बाय लाँ. काही ठरावीक हाय एन्ड बाईक्स चे दोन आरसे बरेचदा एकमेकांकडे बघत नमस्कार करत असतात; *शोबाजी* ची कम्माल आहे!

---

मिलिंद काळे, १७ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment