Er Rational musings #646
प्रिन्सेस स्ट्रीट, अब्दुल रहमान स्ट्रीट, नागदेवी स्ट्रीट, लोहार चाळ, एडवर्ड सिनेमा, गोकुळदास तेजपालदास हाँस्पीटल, पिकेट रोड, ते एकली (१ ली) भटवाडी (पहिली ला आम्ही एकली म्हणायचो), व्हाया चंदनवाडी चिराबाझार, ठाकुरद्वार झावबा वाडी, धुतपापेश्वर, गाय वाडी (एकदा बीईएसटी बस मधनं इथे उतरताना मी पुढच्या उतरणाऱ्यांना उद्देशून म्हणालोवतो की अहो गायवाडी वाले बैल, उतरा - हल्लके हास्याचे फवारे उडले होते, कंन्डक्टर सहित!), ते एक्स्टेंन्डेड परिसर आँपेरा हाऊस पर्यंत, व हरकिसनदास हाँस्पीटल पर्यंत, व फडके गणपती मंदीर - सी पी टँन्क पर्यंत ते मेट्रोपासनच वर्तुळ, हा सग्गळा एरीया, म्हणजे अद्भूत रसायन.
माँमेडियन्स, मराठी कोंन्कणी, पारशी, मारवाडी, मराठी कायस्थ प्रभू, गुजराती, मराठी पाठारे प्रभू, राजस्थानी, मराठी भटं, बोहरी मुसलमान, ख्रिश्चन, वगैरे निरनिराळ्या धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे अस्सल मुंबईकर एकवटलेली, घट्ट सरमिसळलेली वस्ती. प्रत्येकाचे व्यवसाय, धंदे, प्रार्थनास्थळं, रहात्या जागा, शाळा, इत्यादिं बरोबर माझा वीक पाँईंट मौजूद. हाँटेलं, रेस्तराँ, खानावळी, टपऱ्या, खाऊ गल्ल्या, अहाहाहा.
गुलशनेइराण असो, वा क्षुधा शांती (मागच्याच महिन्यात मालक बदलला, नाव बदललं, आता ॐ शांती झालं, बाकी, झुणका आमटी पोळ्या (!) आहे तसंच श्श्या...), व्हाँईस आँफ एशिया असो, वा ललित, वा प्रिस्सीला, वा ताराबागेतला भेळवाला, वा दरयश बेकरी, वा.... या असंख्य चवींनी व रसास्वादाने माझी जीभ (ते जठर!) तृप्त झालीये, अजूनही होते (वेळ मिळेल तेव्हा)
हा केवळ सहा नऊ स्क्वेअर किलोमीटर चा टापू, पण अठरापगड जातीधर्मांचा ब्लेंन्डेस्ट, टाँपेस्ट, बेस्टेस्ट, व टेस्टेस्ट पण!
आज दूपारीच झुणक्याची राईस प्लेट हापसून आलोय. अर्थातच दोन्ही मोबाईल स्विच आँफ करून, शर्टाच्या बाह्या दुमडून, मौनव्रतात, गोविंद म्हणत...
---
Milind Kale, 2nd August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment