Er Rational musings #661
~ हे बघ xxx, सरळ घरी यायचं हं. कोणी काहीही सांगूदे. हरकत नाही; सगळ ऐकून घ्यायचं, व म्हणायचं पहिल्या प्रथम मला बाबाशी, आईशी वा दादाशी ताईशी बोलायचय, फोन लावून द्या.
समजा कोणी ओळखीचा माणूस, नेहमीचे वायरमन काका, वा सुतार काका, वा वाँचमन काका वा झाडूपोछा वाल्या मावशी, वा ओळखीची आणिक कोणी(ही) व्यक्ति आली तुला घ्यायला भेटायला परस्पर, व काहीही सांगू लागली, तरी, प्रत्यक्ष आमच्या पैकी कोणाशीही, बोलल्याशिवाय, विश्वास ठेवायचा नाही. अगदी काहीही सांगूदे; की तुझ्या आईने बोलावलय तिकडे, ती पूढे गेलीये; वा, तुझ्या बाबांना एक्सीडेंट झालाय, हाँस्पीटलला ताबडतोब जाऊया; वा असलतसलं काहीही. अगदीच रस्त्यात कोणी गाठलं, जबरदस्ती केली, तर, जोरजोरात बोंबाबोंब ठोकायची. पोलिस काका दिसला तर उत्तमच.
वगैरे वगैरे वगैरे.
~ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको हं yyy. समुद्रात तर बिलकूल जायचं नाही, कुठल्याही परिस्थितित. काय जे स्विमिंग करायचय ते स्विमिंग पूलात करा. ड्रिंक्स घेवून गाडी चालवायची नाही. दूसऱ्या कोणा प्यायलेल्या मित्राला पण चालवू द्यायची नाही. एव्हढीशीच प्यायलोय; जवळच तर जायचय; पोलिस नसतात त्या रस्त्यावर; काही होत नाही; असल्या तत्सम कुठल्याही सबबी चालणार नाहीत. मुली बरोबर असतील, तर, न पिता सुध्दा, रात्री बारा नंतर, बाहेर पडायच नाही, फिरायबिरायला.
वगैरे वगैरे वगैरे.
बरोब्बर ओळखलत.
पहिली सूचनावजा आज्ञा, आपापल्या शाळकरी 'xxx' नामक मुला/मुली साठी. एकटे दुकटे घरी जातायेता.
दूसरा, आज्ञा वजा डोस, हा आपापल्या 21 वर्षावरील 'yyy' नावांच्या मुलाकरता. कुठे पिकनिक ट्रिपला जाताना.
#आपल्याक (!) काळजी...
---
Milind Kale, 10th August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment