Tuesday, August 2, 2016

Er Rational musings #648

Er rational musings #648



पुलं नी अनेक प्रकारचा साहित्यठेवाच आपल्या हातावर सोपवलाय. व्यक्ती आणि वल्ली हे त्यातलच एक अजरामर पुष्प.



नारायण, हरितात्या, नानू परीट, सखाराम गटणे, नंदा प्रधान, जनार्दन (जनू), नारो शिंगणापूरकर (बोलट), भय्या नागपूरकर, नाथा कामत, दोन्ही वस्ताद (टिल्यावस्ताद व ज्योतिबावस्ताद), गजा खोत, अण्णा वडगावकर, परोपकारी गंपू, चितळे मास्तर, लखू रिसबूड, बापू काणे, ते चौकोनी कुटुंब (माधवराव, मालतीबाई, मधू व मंजिरी), तो (एक दृश्य अदृश्य समष्टी!), हंड्रेड परसेंट पेस्तनकाका, बबडू, अंतू बर्वा.



या व्यक्तरेखा म्हणजे सार आहे, भांडार आहे, सम टोटल आहे, विषम वजाबाकी आहे, श्वर नश्वर सृष्टी आहे, इरसाल नमुने आहेत, नोंदी निरीक्षणं स्वभाव वैशिष्ट्य आहेत, भाष्य आहे, चिमटे नर्म विनोद आहेत, ठसठशीत पणा आहे, कोपरखळ्या आहेत, आणि संवाद पण आहे.



पुलं च्या वल्या ह्या थोड्या चांगुलपणाकडे झुकलेल्या आहेत. चमत्कारिक, बालिश, प्रत्येकात वाईट च बघणाऱ्या, तिरसट च वागणाऱ्या, तुसड्या, अहंदर्पी, तोंडावर छान पण अनुउपस्थित माणसांबद्दल कायमच उणे बोलणाऱ्या, मला (च) सग्गळ समजत मला सग्गळ कळत, अशा सर्वद़्यानी व्यक्ती, पुलं ना भेटल्या नसतील का?! अशा विद्वान माणसांबद्दल त्यांनी काय चाबूक लिहीलं असतं ना? परंतु त्यांच्या स्वभावातच 'ते' नव्हतं म्हणाना!



मला तर वाटतं की त्यांनी सत्कारच केला असता!



'या' अतिहुशार, अतीशहाण्या महाभागांचा नव्हे, तर या नतद्रष्टांबरोबर संसार 'करणाऱ्या' यांच्या अर्धांगिनींचा...

---

Milind Kale, 3rd August 2016

No comments:

Post a Comment