Er Rational musings #670
~ दही हंडी आली. अमक्या तमक्या(च) उंची पर्यंत परवानगी. वयाचे बंधन. विमा, सुरक्षा इत्यादि जोडीला. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ गणपती बाप्पा आले. सार्वजनिक गणपतींची संख्या कमी करा. मूर्ती च्या उंचीवर, माती वर, विसर्जनावर आक्षेप, रिस्ट्रिक्शन्स्. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ नवरात्र आली. लाऊड स्पिकर चा वापर या त्या वेळेतच, दोनच दिवस अेक्स्टेंशन. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ दसरा आला. आपट्याची पाने तोडू नका. निसर्ग संपत्ती चा ऱ्हास. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ दिवाळी आली. फटाके फोडू नका. प्रदूषण होतं. दिव्यांनी उजळून टाका. (वीजे ची नासाडी!? चालेल? पण मग वीज निर्मिती साठी अल्टीमेटली कोळसा वा पाणी वा वायू च वापरणार ना!) मान्य, एकदमच बरोब्बर!
~ होळी आली. धुळवड रंगपंचमी आली. कोरडी होळी खेळा. पाणी वाचवा. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ नाग पंचमी आली. नागांचे प्रदर्शन नको. बंदी. मान्य, एकदमच बरोब्बर!
~ बैल गाडी शर्यत नको. (रेस कोर्स मधे घोड्यांच्या शर्यती वर पैसे उडवा ना - सट्टा लावा ना) मान्य, एकदमच बरोब्बर!
~ आणिक कुठला सण राह्यलाय का मेंशन करायला? सग्गळ सग्गळ मान्य, एकदमच बरोब्बर!
आता अजून कुठले पुरावे द्यायचे हिंदूंच्या अपरंपार सहिष्णूतेचे.
इतर धर्मांच्या धार्मिक सण, रितीरिवाज, रूढी, परंपरा, उत्सव, यावर नभाष्य केलेले बरे.
खटाखट निर्णयफैसला; व्वा. तत्परतेचे स्वागत व आदर!!
आता जर्रा प्रलंबित खटल्यांकडे वळूया.
२ च उदाहरणं पूरेशी असावीत.
~ बेळगाव
~ राममंदिर
जय होsss...
---
मिलिंद काळे, १८ आँगस्ट २०१६
Please share, if you agree.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment