Monday, August 22, 2016

Er Rational musings #677

Er Rational musings #677



सूंठवडा तो सुंठवडा,

जमला तर जमला, नाहीतर तिख्खटला



साबूदाण्याची खिचडी, ती खिचडी,

जमली तर जमली, नाहीतर बोंबलली



साबूदाण्याचं थालिपीठ, ते थालिपीठ,

जमलं तर जमलं, नाहीतर करपलं



साबूदाण्याची खीर, ती खीर,

जमली तर जमली, नाहीतर खारटली



खोबऱ्याच्या वड्या, त्या वड्या,

जमल्या तर जमल्या, नाहीतर चिकटल्या



मोतीचुराचे लाडू, ते लाडू,

जमले तर जमले, नाहीतर बत्ता-फोडे झाले



पोह्याचा चिवडा, तो चिवडा,

जमला तर जमला, नाहीतर चिवटला



शंकरपाळी, ती शंकरपाळी,

जमली तर जमली, नाहीतर कड-कडली



कडबोळं, ते कडबोळं,

जमलं तर जमलं, नाहीतर टणकलं



चकल्या, त्या चकल्या,

जमल्या तर जमल्या, नाहीतर कडकल्या



ओल्या नारळाची करंजी, ती करंजी,

जमली तर जमली, नाहीतर चामटली



शेव, ती शेव,

जमली तर जमली, नाहीतर मऊच पडली



शेवयांची खीर, ती खीर,

जमली तर जमली, नाहीतर जायफळली



चक्का टांगून केलेलं श्रीखंड, ते श्रीखंड,

जमलं तर जमलं, नाहीतर आंबलं



उपवास असो वा दसरा - दिवाळी

फराळी पदार्थांची असे रेलचेल

आमच्या अहो, मायाबाई मात्र

होतच नाहीत कश्शा कशात फेल



जेनु काम तेनु थाए

बिजा करें सो गोता खाए



હું ગમે છે અને ખાય છે પ્રેમ

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२२ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment