Er Rational musings #658
मुलुंड मध्ये दोन तीन स्पाँट आहेत, वाहतूक पोलिसांचे फेवरीट! याइथे कधीमाधी पोलिसपहारा असतो. हेल्मेटविना कोण दूचाकी सवार आला, की यांना बहुतेक लग्न न होत असलेल्या मुलीसाठी जावई मिळाला, की कसा होईल ना, सेम तस्साच आनंद होतो. यांच्या अंगात स्फूल्लींग शिरतं, व अस्सली झडप घालतात, जशी डिस्कव्हरी चँनेल मधला हिंस्त्र पशू, मुक्या सावजावर. मग रितसर 100 (हो, अजूनपावेतो शंभरच, पाचशे व्हायला वेळ आहे!) रूपयांची, (शंभर म्हणजे कौरव), पावती फाडल्यावर सूटका. (ह्ये पोलिसमामा, हायवेला नाय बघीतले म्या कधी दूचाक्याच्या पाठी; तिथं ट्रकटेंम्पोकार वर "लक्ष्य" ठेवाव लागत भौ!!)
आर्यनची शाळा माझ्या घराजवळच. त्या इनमिन तीन मिनिटांच्या प्रवासासाठी आपण हेल्मेट चढवतो बाबा; उगी दहावास च्या स्पीड मंदी अपघात झाला तर? कायदापण आहेच की! आम्ही सुजाण कायदेपालक सार्वभौम नागरिक आहो. आत्ता एव्हढ्या सक्काळी हमखास दोन तरी दूचाक्या दृष्टीस पडतातच ओ, विना हेल्मेट वाले लेक्स असतात त्यावर. पण ते असतात पोलिस! आता त्यांना कसकाय बोलणार म्या बापुडा. गपगुमान समजाव की ते असणार गस्तीवर; व गस्तीवर असताना त्यांना त्रासबिस होत असावा, ना?! बरं आणि फुका सरकारी कामात हस्तक्षेप वगैरे कलमं लागायची. आपण तर लईच भित्रे बघा. असो.
कायदे लई कडक असत्याती. व सगळ्यास्नी शेम.
मिनरल पाणी बाँटल वाला, सोस्योकोला वाला दूकानदार दोन तीन रूपडे जास्त आकारतो म्हणता, एमआरपी पेक्षा?
अहो ठंड करायचे पैसे लावतो तो; उगाच आपलं काहीतरी बोलायचं!
मुंबई पूणे एक्सप्रेस वे वर माल, साँरी माँल, फूड माँल, हाईत. तिथले रेट बघून चक्कर यायचीच बाकी असते.
अहो, कायदेशीर टेंन्डर बिंडर काढून जागा अँलाँट केल्याती. वडापावची, पावभाजीची, भूर्जीमटणाची, चहाटपरीची गाडी लावायला लागले तिथं, तर कसं चालायचं? उगाच आपलं काहीबाही बरळायचं!
मी साधामाणूस. कार चालू केली, की सीट बेल्ट करकचून घेतो. कायदा आहेच, आपल्या सेफ्टी साठी उपयुक्त. लालपिवळी टँक्सी, व इतर हलक्या वाहनांना, तसेच अवजड वाहनचालकांसाठी हा नियम नाहीये.
हे वाहनचालक आपापलं बघून घेतील, नव्हे बघतातच रे बाबा. उगाचच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला!
चालत्या उपनगरी रेल्वे गाडीच्या फूटबोर्ड वर उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. (किड्यामुंगीला आत शिरायला, घुसायला पण जागा नसते, हे सत्य आहे) कायदा म्हणजे कायदा, म्हणजे नियम!
आता बो(ब)ला!
वजनकाट्याला खाली जास्त वजन लोहचुंबकाने चिकटवतात, असं म्हणतात. एका बाजूचं (वस्तू तोलण्याची बाजू) पारडं थोडं स नगण्य लांब असतं, असं म्हणतात. ज्यायोगे रास्त वजनाची वस्तू मिळत नाही, फसगत होते, असं म्हणतात.
कँलिब्रेशन का कायते असकाही नसत ओ. उगाचच नको त्या (कु)शंका.
चारचाकी शिकाऊ वाहनापाठी तीस (30) फूट अंतर सोडा, असा नियम आहे; अशा वेळी कोणी हा नियम पाळला, तर, ट्रँफीक ची काय अवस्था होईल; असले खुळचट प्रश्न न विचारलेले बरे.
भर मार्केट मध्ये, अनधिकृत भाजी विकणारे, इतर फेरीवाले, अन्न शिजवायला वगैरे बंदी आहे की नाही. मग आमची कार्यतत्पर म्युनिसिपालटी अतिक्रमण विरोधी गाड्या बिड्या उभ्या करते भर गुन्हा ठिकाणी! सगळं चिडीचाप बंद, सामान उचलाउचली इत्यादि नियमानुसार कारवाही. पन ह्योसमदं दिवसा (च) का? संध्याकाळी का नाही, प्रत्यक्ष मेन टाईमाला? सेकंड शिफ्ट ठेवा की उलटीपालटी वालो. पण नाही, सगळं सोयी(!)नुसार. बरं, अहो, फकस्त समदे कोपरे मोकळे करा - ठेवा ओ, टर्निंग्ज, जंक्शन वगैरे; दूवा मिळेल ओ.
कसल्या अव्वाच्यासव्वा अपेक्षामागण्या? रोटीरोजी वर पाय, टाच? निषेध.
अशले अनेक किस्सेप्रसंग घटनादृष्ये आहेत, दाखवता येतील. आपले बर्रेचषे कायदे ब्रिटीशकालीन पूलांप्रमाणे आहेत. [ब्रिटीशांचे पत्र यायची वाट बघावी लागणार बहुतेक, की ह्ये पूल (नियम) आऊटडेटेड झालेती]; रिव्हू करा, नवीन करा, काळानुरूप बदलसुसंगत करा!
जवळपास एकशे पंचवीस वर्षांपूर्वी, 1890 सालीच, म्हणजे ब्रिटीशकालातच, बरं का; हरि नारायण आपटे म्हणाले होते,
पण लक्षात कोण घेतो...
---
Milind Kale, 9th August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment