Er Rational musings #673
हाय फँट!
मोठ्या मुलाची हाक. मी थोडा कावराबावरा झालो. चमकून त्याच्या कडे बघीतलं; होय, तो मलाच हाक मारत होता. मनात म्हणलं, मी कुठे फँट आहे बाबा. मी तसा सडपातळ व उंच.पण ते तेव्हढ्यावरच राहिलं, काही कारणास्तव.
दूसऱ्या दिवशी हा पठ्या आमच्या अहोंना, म्हणजे मायाबाईंना, हाक मारतोय, हाय माँट!
च्यामारीटोपीगंडेरी, असली हजेरी घेतलीये त्याची, की काय चावटपणा आहे, हाय फँटमाँट म्हणे.
आमचेच सुपुत्र ते; उत्तरले, दात काढून...
~ हाय फँट म्हणजे hi fat, हाय फादर...
~ हाय माँट म्हणजे hi mot, हाय मदर...
म्हणे, जसे
~ हाय ब्रो म्हणजे hi bro, हाय ब्रदर...
~ हाय सिस म्हणजे hi sis, हाय सिस्टर...
!! कसली ही भाषा; कप्पाळ...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
१९ आँगस्ट २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment