Saturday, August 6, 2016

Er Rational musings #654

Er Rational musings #654



~ रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?

~ काय गार्डन मध्ये फिरतोय / फिरतीये का?



चडफडत (मनातल्या मनात, वा फारतर ओठातल्या गालात पुटपुटत) तीन शेलक्या शिव्या हासडायच्या, हे आता नित्याचेच. वाहनधारक - वाहनचालकांचे. मोस्टली आपापल्या सिटीतल्या सिटीत - आतल्या रस्त्यांवर गाड्या - मग ती दूचाकी असो वा चारचाकी, हाकताना!



हल्ली हे फारच वाढलय. बेदरकारपणा. चालणाऱ्यांचा, आय मीन! यात वृध्दआबाल, सू(!)शिक्षित नशिक्षित, थोरगरीब, पुरूष स्त्री, सग्गळे आले. पूर्वी व आताही, वयोवृध्द रस्ता क्राँस करताना आपल्या छाती समोरसरळ काटकोनात हात वा काठी पाँईंट करून, चक्क तिकडेइकडे ढूंकूनही न बघता सरळसमोर चालू पडायचे, गाडीवाहक व इतर बघून घेतील, या आविर्भावात; हे कितीही फनी वाटलंदिसलं तरी समजू शकतो आपण, यामागील भावना, पण आता..!?



निर्वकार चेहरा, बेफिकीर हावभाव, कानांत मूझिकबिझीक ऐकायला दोन गुंड (हँन्डस् फ्री!!), व गारेगार शून्यात नजर, आपल्याच भावतंद्रीविश्वात, आणि प्रचंड गूर्मी, ह्यातली एक वा अधिक मूद्रालोप, अशी ही यांची ओळख, मी केलीये व्याख्या!



शिवाय आता हे असले पादचारी, वाहनांसमोर "थांबा!!" असा हात दाखवून, कूर्मगतीने क्राँस करायला लागलेत. व्वा, छ्छान! गाडीसमोरून जाताना, जरा पटापट पाय उचलून गती वाढवावी की नाही? पण नाही! माठ.



रहदारी प्रचंड वाढलीये, मान्य. पदपथांवर आक्रमण, मान्य. अनधिकृत फेरीवाले, खाऊवाले, दूकान एक्स्टेंन्शन वाले, गर्दूल्ले, भिकारी, चहाटपरी वाले इ चा विळखा, मान्य. अनधिकृत पार्कींग, मान्य. रस्तेच खड्यात, शिल्लकच नाहीत, तर तर तर, सगळ मान्य! पण म्हणून ही बेफिकीरी, मस्तवाल वृत्ती, व माज, कसकाय समर्थनीय आहे? वाहनचालकांची काय चूक आहे बाबा, त्यांनी काय पाप केलय?



एक त्रस्त सूजाण व 1984 मधलं ड्रायव्हींग लायसन्स असलेला, now irritated वाहन स्वार...

---

Milind Kale, 6th August 2016

No comments:

Post a Comment