Tuesday, August 30, 2016

Er Rational musings #692

Er Rational musings #692



शाळेत असताना, आम्हाला एक खेळ वजा स्पर्धा असायची. स्मरणशक्ति तपासण्यासाठीचा एक मार्ग!



म्हणजे असायचे काय, तर, एका रिकाम्या वर्गात पंचवीसेक छोट्या मोठ्या वस्तू मांडून ठेवलेल्या असायच्या. पाण्याची बाटली, ते कंगवा, ते ब्लेड, एखाद फळ, सूई दोरा, ब्रश, शटल काँक, पेन्सिल, ते रूमाल, ते खोडरबर, ते असल काहीही. एका टेबलावर हे सगळ मांडलेल असायचे, व आम्हाला एकेका १० एक जणांच्या बँचेसमधून या खोलीत न्यायचे, अर्ध मिनिट पण नसेल, मग बाहेरचा रस्ता. त्या १७/१९ सेकंदांत योग्य निरीक्षण करून, वस्तू लक्षात ठेवायच्या व आपल्या वर्गात बसून, त्या लिहून बाईंकडे पेपर सोपवायचा, तपासायला!



जास्तीत जास्त वस्तू लक्षात ठेवून लिहीलेल्याला बक्षीस.



सोप्पी साधी स्मरणशक्ति, व सूक्ष्म निरीक्षणशक्ती तपासण्यासाठी स्पर्धा वजा खेळ. सिंपल व इफेक्टीव्ह.



इंजिनियरिंग काँलेजलाईफ मध्ये, खऱ्याखुऱ्या खेळांबरोबर निरनिराळे नादछंद जोपासले गेले. कक्षा रूंदावल्या(!). कारपेंन्ट्री, फिटर व स्मिदी इत्यादि ठिकाणी ढगळा बाँयलर सूट घालून दोन चार तास काहीतरी तासण्यात, घासण्यात व बडवण्यात (अनुक्रमे) जायचे, स्साँल्लीड आवडायचे त्या वर्कशॉप अँक्टिव्हिटीज्. त्याच्या जोडीने आल्या इंडस्ट्रीयल व्हिजीटस्. प्रँक्टिकली वर्कशॉप बघायला. हा ही एकप्रकारे सिंपल पण इफेक्टीव्ह असा खेळच म्हणा ना. कारण, सेमच. एका फँक्टरीत मांडलेल्या(!) मशीनरीज, व प्राँडक्शन लाईनीतल्या इतर अँक्सेसरीज, यांचे अर्धाएक दिवस निरीक्षण, व त्यांची समग्र साग्रसंगीत माहिती तिथल्या निष्णात सर्वेसर्वा कडनं, म्हणजे त्या मशीनच्या बापाकडून - कामगाराकडून. दूसऱ्या दिवशी काँलेज मधे व्हिजीट रिपोर्ट सबमिशन!



दोन व्हिजीटस् चांगल्याच स्मरणात आहेत.



एक म्हणजे भांडूप ची जीकेडब्ल्यू. इथे आम्ही गेलो असताना, दोन कुशल कामगारांमधला संवाद, माझ्या कानी पडलेला.



"अरे, नीट बघून ठेव, ह्या पोरांमधनच कोणीतरी येईल साहेब बनून!!"



दूसरी संस्मरणीय इंडस्ट्रीयल व्हिजीट, पवईच्या लार्सन अँन्ड टूब्रो मधली.



कारण, कालांतराने, मी लार्सन अँन्ड टूब्रोच जाँईन केली...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

३० आँगस्ट २०१६

Er Rational musings #691

Er Rational musings #691



"काजू बदाम, चोको, मलई पिस्ता,

टूटी फ्रूटी, बटर स्काँच, अंजीर बदाम...



"अटक मटक चवळी चटक,

चवळी लागली गोड गोड,

जीभेला आलाय फोड फोड,

फोड काही फूटे ना...



"ख़यालों में, ख़यालोंमें



"ये गोरे गालाँ तन्दाना

ये रेशमी बालाँ तन्दाना

ये सोला सालाँ तन्दाना

हाय तेरे ख़यालाँ तन्दाना

हम तेरे तेरे तेरे चाहने...



"वासुदेवाची ऐका वानी, जगात न्हाई राम रे

दाम करी काम येड्या दाम करी काम रे...



Back2work...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

३० आँगस्ट २०१६

Saturday, August 27, 2016

Er Rational musings #690

Er Rational musings #690



हल्लीच मी लिहीलेल्या एका पोस्टीत म्हणलोवतो, पर्सनल गोष्टी इ आपापल्या घरी च ठीकाय. ना कोणाला अडचणत्रास. पण जेव्हा यासम गोष्टी मी, घराबाहेर करायच्या ठरवलं, व केल्या, तर त्या सार्वजनिक होतात, त्यांना सर्व नियमनिती कायदेबियदे लागू होतात. आणि हे खरं आहे, बाहेर पाऊल टाकलं की कोणावर एनक्रोचमेंट नको. मूल्यांच्या आयतात राहणं क्रमप्राप्त व अपरिहार्य.



व्हाँट्सअप्पा शी याच साधर्म्य आढळतं. म्हणजे तूम्ही 'वन टू वन' व्हाँट्सअप चँट करणं वेगळं, व काँमन ग्रूप वरच वागणं वर्तणूक व्यवहार वेगळा! ग्रूपवरचा वावर हा 'सार्वजनिक' या सदरात मोडतो, असे मला वाटते. स्वाभाविकच, पर्सनल चँट व ग्रूप चँट यांत चांगलीच तफावत असायला हवी. लाँजिकली; व प्रँक्टिकली, ती अंमलात आणायला हवी.



फेसबूक हे माध्यम, आपल्याला वैयक्तिक का सार्वजनिक, हा चाँईस देतं. हा आँप्शन कघीही बदलता सुध्दा येतो, अँट द क्लिक आँफ अ माऊस. फेसबूक वरील तूमची स्वत:ची वाँल म्हणजे तुमचं आपल स्वत:च घर समजा ना. ह्याचा उंबरठा ओलांडायचा का नाही; कधी ओलांडायचा; दारातनं काय, कोणाला, किती कितपत, केव्हा, कसं, आत घ्यायचं, ह्याचा सर्वस्वी निर्णय कंट्रोल आपल्या हाती असतो.



व्हाँट्सअँप व फेसबूक, दोनही सुविधा या, "कनेक्टींग पीपल", व 'कर लो दूनिया मुठठी में', अशाच आहेत. परंतु व्हाँट्सअप्पा वर जरा जास्तच काळजी घ्यायला पाहीजेलाय, हे मला जाणवत, व मन:पूर्वक पटत. वास्तविक पहाता, काही महिन्यांपूर्वी, मी थोडी भीतभीतच मतपरवानगी जाणलीहोती, की फ्रेंन्डस्, 'मूझींगू' का ग्रूप वर, का फक्त फबवर मूझींगू? अशी विचारणा करून रीतसर; बऱ्याच जणांनी निर्मळ मनाने म्हणा, भीडेखातर म्हणा, वा मित्राला (म्हणजे मला) नाही कसं म्हणायचं, या भावनेतून संमत्ती दर्शवली होती. ग्रूपवर मूझींगायला!



काळजी घ्या; नाहीतर आपण जर्रा वहावलोच. बोट जेव्हा अलाऊ करतात, सांगतात पकडायला, तेव्हा फारतर पंजा पकडावा, एकवेळ चालेल, पण हात च एकदम पकडू नये. हे साफ विसरू नका. (...घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे...असच काहीसं होईलय).



असो.



तद्नुसार भरदिवस सुविचार, विनोद, व्हिडियोज, तसबिरी, व समस्त चर्चा, यांचे वाचन विवेचन विश्लेषण व वाहवा, बंद न करता, ग्रूपमधला पोस्त-वावर तसा संयमी संतुलित सहेतूक असायला हवा.



विस्तृत निवेदन ममहितार्थ जारी...

---

मिेलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२६ आँगस्ट २०१६

Friday, August 26, 2016

Er Rational musings #689

Er Rational musings #689



आयटी क्षेत्राबद्दल मी संपूर्णपणे अनभिज्ञ आहे. हे आयटी वाले नक्की काय काम करतात, हा प्रश्न तर कायमच मला छळत असतो. हसतखेळतमजेत असतात आयटी वाली मुलीमुलं. शिवाय खूप संख्येने असतात हे लोक्स. जगातला सर्वात मोठा बँक आँफीस आयटी स्टाफ पण इथेच असावा. दिव्वसभर चकाट्या पिटतात, फिरतात हाँटेलिंग करतात, सेल्फीज काढतात, स्टेटस अपडेट करत असतात, व संध्याकाळनंतर उत्तररात्री पर्यंत भ्रमणध्वनी कानात घुसवून, लँपटँप वर 'लगीन', साँरी 'लाँग इन', करूनशान, 'लव्ह चँटींग', स्साँर्री, 'लाईव्ह चँटींग', हे पठ्ठे अखंड कार्यरत असतात. सरत्याकलत्या रात्रभर; (कारण, तिथे! दिवस असतो ना?) म्हणजे, असा माझा समज आहे ओ.



साँफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग, सँप, बासिस, प्रोग्रामिंग, प्रोसेसींग, डेटा वेअर हाऊसींग, क्लाऊड कंम्प्युटिंग, क्लाऊड स्टोरेज, सब्जेक्ट मँटर एक्सपर्ट्स, गेमिंग, साँफ्टवेअर इंजिनियर्स, साँफ्टवेअर डिझायनर्स, साँफ्टवेअर आर्किटेक्ट्स, ईआरपी, सर्व्हर्स, बँकअप, अशा अनंत आयटी संज्ञांच तसही मला वावडं आहे. जरा मी पायभर लांबच राहतो, असल्या रूटर, नो - राऊटर पास्न.



भलेलठ्ठ पगार, सोयी सुविधा, एव्हरेज एम्प्लाँयी एज तीशीत, मुछमुंढे, तळवाभर मोबाईल असलेले व त्यावर वेळ मिळेल तेव्हा सारखे दोन्ही बोटांच्या अंगठ्यांनी टायपिंग चाललेले (पूर्वी कन्व्हेन्शनल स्टेनो टाईप रायटींग स्पीड बघायचे नोकरी देताना (४० / १०० वगैरे), रविवारचे जरा निवांत असणारे अशी यांची ओळख आहे. प्लस हे नो आँल, सर्वज्ञात आणि जरा अति(च) शहाणे, असतात, असे काही लोकांना वाटते. का? तर म्हणे, अशाच आविर्भावात ते वावरत असतात, व आपल्यासारख्या बिगर आयटी वाल्यांसमोर कसलं बेअरींग घेतात! ते म्हणजे अर्धनारीनटेश्वर अवतार असतात, अर्धी स्त्री - अर्धा पुरूष; वा, नवरंग मधली संध्या 'अरे जा रे हट नटखटsss', असं गाणं म्हणणारी, एका बाजूला पुरूष, व पाठच्या बाजूला स्त्री, बनलेली लोकं असतात, असा ही काही लोकांचा समज आहे. (का? तर म्हणे, यांचा एक पाय इथे, तर दूसरा अमेरीकेत; शरीराने इकडे, तर मनाने तिकडे; एक डोळानाक कान वगैरे इकडे, तर दूसरा डोळाकान व नाक, तिकडे च.)



आणि तरीही, आयटी हे सोप्प फिल्ड नव्हे. एकतर कायम यांना अपडेट रहाव लागत. दिवसामहिन्यांत झपाट्याने होणारे बदल कुर्निसात करून आत्मसात करत, अपडेटाव लागत स्वत:ला. कीप अब्रेस्ट विथ द टेक्नालॉजीकल अँडव्हान्समेंटस्. आणि, या टेक्नालॉजीच्या वाहत्या गंगेत, मासे पकडणं किती कठीण असेलना?!



यांचं महत्व पटतं, पदोपदी, साध्या साघ्या गोष्टींमघ्ये  जेव्हा आपला पीसी बंद पडतो, वा, सिस्टीम स्लो होते तेव्हा. सगळी कामच ठप्प होऊ शकतात. (अर्थातच, काँल केलं आयटी वाल्याला  की तो हमखास इलेक्ट्रिकल वाल्याला दोष देतात. अर्थींग प्राँपर नाहीये. जास्त व्होल्टेज दाखवतय न्यूट्रल व अर्थींग मध्ये. वगैरे नेहमीची बौध्दिक मारामारी होतेच दोघांत!) पण, चार ना सहा शक्यता वर्तवल्यावर काही वेळानी त्याला खरा टेक्निकल इश्शू गवसतो.



एक जादूची किल्ली मात्र आहे ९०० % काम होतं. ती म्हणजे, सिस्टीम रीबूट! काही लोचा लफडं झालं की, वा तसेही मी माझा लँपटँप रिस्टार्ट करत असतो मधनंअधनं.



स्साला, काही अपवादात्मक, म्हणजे "तीन वरदान माग", ह्या टाईपच्या वरा प्रमाणे, काही घटना / प्रसंग असे री-बूट करायला परमेश्वराने दिले तर?



मला एक रीबूट पुष्कळ आहे...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२६ आँगस्ट २०१६

Er Rational musings #688

Er rational musing #688



जनित्र म्हणजे जनरेटर हे ठाऊक असेल बहुतेककाही जणांना. पण, माझ्या साठी नेमणूक पत्रात नमूद केलेलं भलत्याच फॉरेन भाषेत होतं, तेव्हा @१९८४ मध्ये. प्रवर्तन व परिरक्षण विभागात, असा उल्लेख. धड विशी पण नव्हती पार केलेली तेव्हा! त्यात भर म्हणून हे लँटिन व ग्रीक भाषेतल लिखाण! असो.



या प्रवर्तन व परिरक्षण विभागात, रोहित्र देखभालीचं काम आम्ही करायचो. संग्राही केंद्रात! पर्यवेक्षक व तारतंत्री बरोबर असायचे. नंतर जोडणी विभागात बदली झाली. मग उपकेंद्रातील भारवाहक जोडण्या हाताशी आल्या. कालांतराने मार्गप्रकाश विभागात आलो. इथे पथदिवे नशीबी आले. उर्जासंधारण, नियोजन, वीजग्राहक, उभारणी, उच्चदाब, भूमीगत वाहिनी, प्रकल्प, ते दक्षता, ते अगदी कार्यशाळा, असा मार्गप्रवास करत, अनुभवात भर घालत, ल आणि ट मध्ये जॉईन झालो, जवळपास १२ एक वर्षांनी!



पुन्हा एकदा, असोsss



मराठीमनहंडीसम्राट ह़दयात घुसले, असंल बोजड वाटतय का?



लाईनीवरती येतो!



तर, या ल आणि ट नंतर, दोनही रिलायेबल बंधूंकडे शेप्रेटली काम केलं, व आता, पाचेक वर्षांत, मी माझा - महाराष्ट्र माझा!



*'अँन्ड द रेस्ट इज हिस्टरी' !!!* नाऊ.



तळटिप: 'रेस्ट' म्हणजे 'आराम' या अर्थी वापरले आहे; फूका कडू गैरसमज नसावा.



परत आता एक नवव्हेंचर...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२६ ऑगस्ट २०१६

Er Rational musings #687

Er Rational musings #687



चांगले बोलणाऱ्याला चांगले लिहीता येतेच, असे नाही.

चांगले लिहीणाऱ्याला चांगले बोलता येतेच, असे (ही) नाही.

पण, चांगले लिहीता येणारी माणसं, मनाने चांगली असतातच; आणि, चांगले बोलणारी माणसं, मनाने चांगली असतातच, असे नाही!!



घट्ट (फर्म) शेक हँन्ड करणारी, शेकहँन्ड करताना, किंचितसा पंजा प्रेस करणारी माणसं, निर्मळओपन असतात.

अर्धाच पंजा हातात मिळवणारी, तळवेबोटं टेकवल्यासारखं करणारी माणसं, थोडी रिझर्वड, कसल्या पाशात अडकायला नको, अशी असतात.



चालताना, दोन्ही पायांचे अंगठे इनवर्ड असणारी, झपझप पावलं टाकणारी माणसं, तशी फोकसड् असतात. दोन्ही पायांचे अंगठे बाहेरच्या दिशेला असतील, व शांत निवांत शिशिर सरला - अशी संथनिवांत पावले टाकणारी माणसं हँप्पी गो लकी, थोडी निष्काळजी असतात.



ताठसरळ उभी असलेली माणसं, एनर्जेटिक असतात. एका पायावर, मग दूसऱ्या पायावर, मग परत पहिल्या पायावर, आलटून पालटून वजन ट्रान्सफर करणारे लोक्स थोडे चंचलविभोर असतात.



स्वत:च्या सही मध्ये वरती डाँट (टिंब) असेल तर हे लोक्स जास्तकरून भावनिक (हृदय मोअर इंपाँर्टंट दँन डोकं) असतात. तर, सहीच्या खाली टिंब देणारी माणसं व्यावहारिक (डोकं जास्त महत्वपूर्ण, दँन हृदय) असतात. आणि जेव्हढे डाँटस् जास्त असतील सहीमध्ये, वर, वा खाली, तेव्हढी याची तीव्रता वाढलेली दिसते.



तत्समअजून खूप इंडिकेशन्स ट्रेडमार्क कल ओळखता येतात तसे. आणि सत्यासत्यतेचा स्ट्राईकरेट मोअर दँन ८०% तरी असेल, या देहबोलीचा.



जजमेंटल पारख टेक्नीकस्...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

Thursday, August 25, 2016

Er Rational musings #687

Er Rational musings #687



चांगले बोलणाऱ्याला चांगले लिहीता येतेच, असे नाही.

चांगले लिहीणाऱ्याला चांगले बोलता येतेच, असे (ही) नाही.

पण, चांगले लिहीता येणारी माणसं, मनाने चांगली असतातच; आणि, चांगले बोलणारी माणसं, मनाने चांगली असतातच, असे नाही!!



घट्ट (फर्म) शेक हँन्ड करणारी, शेकहँन्ड करताना, किंचितसा पंजा प्रेस करणारी माणसं, निर्मळओपन असतात.

अर्धाच पंजा हातात मिळवणारी, तळवेबोटं टेकवल्यासारखं करणारी माणसं, थोडी रिझर्वड, कसल्या पाशात अडकायला नको, अशी असतात.



चालताना, दोन्ही पायांचे अंगठे इनवर्ड असणारी, झपझप पावलं टाकणारी माणसं, तशी फोकसड् असतात. दोन्ही पायांचे अंगठे बाहेरच्या दिशेला असतील, व शांत निवांत शिशिर सरला - अशी संथनिवांत पावले टाकणारी माणसं हँप्पी गो लकी, थोडी निष्काळजी असतात.



ताठसरळ उभी असलेली माणसं, एनर्जेटिक असतात. एका पायावर, मग दूसऱ्या पायावर, मग परत पहिल्या पायावर, आलटून पालटून वजन ट्रान्सफर करणारे लोक्स थोडे चंचलविभोर असतात.



स्वत:च्या सही मध्ये वरती डाँट (टिंब) असेल तर हे लोक्स जास्तकरून भावनिक (हृदय मोअर इंपाँर्टंट दँन डोकं) असतात. तर, सहीच्या खाली टिंब देणारी माणसं व्यावहारिक (डोकं जास्त महत्वपूर्ण, दँन हृदय) असतात. आणि जेव्हढे डाँटस् जास्त असतील सहीमध्ये, वर, वा खाली, तेव्हढी याची तीव्रता वाढलेली दिसते.



तत्समअजून खूप इंडिकेशन्स ट्रेडमार्क कल ओळखता येतात तसे. आणि सत्यासत्यतेचा स्ट्राईकरेट मोअर दँन ८०% तरी असेल, या देहबोलीचा.



जजमेंटल पारख टेक्नीकस्...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

Er Rational musings #686

Er Rational musings #686



मला बडी गंमत वाटते.



~ मी सकाळी पहाटे उठताउठल्यावर हात जोडावे का?

~ मी शूचिर्भूत होऊन संध्या करावी का?

~ मी गायत्री मंत्राचा जप करावा का?

~ मी देवघरासमोर बसून पूजा करावी का?

~ मी रामनाम घेऊन घराबाहेर कामानिमित्ते पडावे का?

~ रस्त्यात दिसणाऱ्या, लागणाऱ्या देवळाकडे बघून, डोकं-कपाळ ते तोंड-छाती भर नमस्कारवंदन करावे का?

~ कामावरून घरी परतल्यावर संध्याकाळी घरात देवासमोर दिवा लावावा का?

~ रात्री जेवताना पुढ्यात वाढलेल्या अन्नाला नमस्कार करावा का?

~ रात्री झोपताना रामरक्षा म्हणावी का?



~ मी घरी सत्यनारायण वा सत्यविनायकाची पूजा सांगावी का?

~ मी घरी गणपती बसवावे का?

~ मी दसऱ्याला किती रूपयांचे तोरण दारी लावावं?



वगैरे.



कायकाहीही हरकत नसली पाहीजे व नसावी कुणाची. कोणासकाय त्रासअडचण? जोपर्यंत या 'मी' च रुपातर 'आपण' मध्ये, व 'घराच' रुपांतर 'बाहेर' मध्ये होत नाही, तोपर्यंत.



सणसणावळ, उपासतापास, रूढी, पूजाअर्चा, परंपरा, उत्सव, श्रद्धा, भाव, भक्ती, श्रृती, आरती, औक्षण, नमस्कार, पुराणपोथी वाचन, पठन, मनन, चिंतन, श्र्लोक, होमहवन, इत्यादि सर्व, आर, अँन्ड शूड बी इमेन्सली वैयक्तिक व्यक्तिगत.



परंतु-आणि जेव्हा हे सगळ एकटंदुकटं, वा एकत्र, जेव्हा सांघिक सार्वजनिक होतं, तेव्हा मात्र आक्षेप घ्यायला रास्त वाव आहे. आणि "लाँ आँफ द लँन्ड", (प्रिव्हेल्स!), हा अंतिम शब्द आहे, यावर दुमत नसावे.



हा जसा हेटाळण्याचा विषय नाहीये, तसाच तो फुका-हक्काचाही विषय नाहीये. यात 'आपण' आणि 'ते', 'आपल्याला नाही', तर 'त्यांना का'?, 'आम्ही' बंद करतो, 'त्यांच'ही बंद करा, नव्हे, सगळ्यांचच कायमचच सार्वजनिक बंद कराकी!! हा ही विषय नाहीये.



खरा विषय आहे, सामंजस्याचा. सजगतेचा. सतर्कतेचा. सार्वजनिक नितिमत्तेचा. सुरक्षेचा. व सार्वभौम आदर समभावाचा. आणि सगळ्यांच्या सहभागाचा! स्वीकारार्हतेचा!



सविनय कायदेभंग करून स्वातंत्र्य मिळवलय, स्वातंत्र्यसैनिकांनी. आपल्याला फुकट मिळालय; आता तो अक्षम्य गुन्हा आहे!



श्रेष्ठपरिपक्वसमृध्द भारत जोडो अभियान...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

Er Rational musings #686

Er Rational musings #686



मला बडी गंमत वाटते.



~ मी सकाळी पहाटे उठताउठल्यावर हात जोडावे का?

~ मी शूचिर्भूत होऊन संध्या करावी का?

~ मी गायत्री मंत्राचा जप करावा का?

~ मी देवघरासमोर बसून पूजा करावी का?

~ मी रामनाम घेऊन घराबाहेर कामानिमित्ते पडावे का?

~ रस्त्यात दिसणाऱ्या, लागणाऱ्या देवळाकडे बघून, डोकं-कपाळ ते तोंड-छाती भर नमस्कारवंदन करावे का?

~ कामावरून घरी परतल्यावर संध्याकाळी घरात देवासमोर दिवा लावावा का?

~ रात्री जेवताना पुढ्यात वाढलेल्या अन्नाला नमस्कार करावा का?

~ रात्री झोपताना रामरक्षा म्हणावी का?



~ मी घरी सत्यनारायण वा सत्यविनायकाची पूजा सांगावी का?

~ मी घरी गणपती बसवावे का?

~ मी दसऱ्याला किती रूपयांचे तोरण दारी लावावं?



वगैरे.



कायकाहीही हरकत नसली पाहीजे व नसावी कुणाची. कोणासकाय त्रासअडचण? जोपर्यंत या 'मी' च रुपातर 'आपण' मध्ये, व 'घराच' रुपांतर 'बाहेर' मध्ये होत नाही, तोपर्यंत.



सणसणावळ, उपासतापास, रूढी, पूजाअर्चा, परंपरा, उत्सव, श्रद्धा, भाव, भक्ती, श्रृती, आरती, औक्षण, नमस्कार, पुराणपोथी वाचन, पठन, मनन, चिंतन, श्र्लोक, होमहवन, इत्यादि सर्व, आर, अँन्ड शूड बी इमेन्सली वैयक्तिक व्यक्तिगत.



परंतु-आणि जेव्हा हे सगळ एकटंदुकटं, वा एकत्र, जेव्हा सांघिक सार्वजनिक होतं, तेव्हा मात्र आक्षेप घ्यायला रास्त वाव आहे. आणि "लाँ आँफ द लँन्ड", (प्रिव्हेल्स!), हा अंतिम शब्द आहे, यावर दुमत नसावे.



हा जसा हेटाळण्याचा विषय नाहीये, तसाच तो फुका-हक्काचाही विषय नाहीये. यात 'आपण' आणि 'ते', 'आपल्याला नाही', तर 'त्यांना का'?, 'आम्ही' बंद करतो, 'त्यांच'ही बंद करा, नव्हे, सगळ्यांचच कायमचच सार्वजनिक बंद कराकी!! हा ही विषय नाहीये.



खरा विषय आहे, सामंजस्याचा. सजगतेचा. सतर्कतेचा. सार्वजनिक नितिमत्तेचा. सुरक्षेचा. व सार्वभौम आदर समभावाचा. आणि सगळ्यांच्या सहभागाचा! स्वीकारार्हतेचा!



सविनय कायदेभंग करून स्वातंत्र्य मिळवलय, स्वातंत्र्यसैनिकांनी. आपल्याला फुकट मिळालय; आता तो अक्षम्य गुन्हा आहे!



श्रेष्ठपरिपक्वसमृध्द भारत जोडो अभियान...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२५ आँगस्ट २०१६

Wednesday, August 24, 2016

Er Rational musings #684

Er Rational musings #684



मला कायमच, मिटींग म्हणलं की वजनदार काहीतरी ऐकलयस् वाटतं. म्हणजे साहेब मिटींग मध्ये आहेत, म्हणजे भलतेच कामात आहेत, असे काहीबाही वाटत ना? काही वर्षांपूर्वी तर महत्वाच डिस्कशन चालू आहे, वगैरे असच काहीसं असायचं.



याला तडा दिला, तो सुरवातीला एसएमएस सुविधा योजिलेल्यांनी. म्हणजे, काँल आला, फोन वाजला, व कोणी कट केला, की आँप्शन असायचा, आँटोमँटीक मेसेज जाण्याचा. 'इन अ मिटींग', हा त्यातलाच एक.

मग आता व्हाँट्सअप ने, दूसरा धक्का, 'इन अ मिटींग' हे स्टेटस ठेवण्याची अरेंजमेंट करून.

म्हणजे, मिटींग चा भारदस्तपणाच गेलाच की राव.



आता दोन माणसं नुसती चर्चा करायला वा वायफळ गप्पा मारायला, वा नुसते भेटले, तरी झ्झाली मिटींग सुरू, म्हणजे म्हणण्यापुर्त ओ.



पण तरीही,



मी कोणा माझ्या ओळखीच्या प्रथितयश व्यक्तिसोबत बसलो असताना, त्याला कोणाचा फोन आला, व त्याने घेतला, व तो जर उत्तरला, की तो मिटींग मध्ये आहे, व त्याने समोरच्या काँल करणाऱ्याला नंतर फोन करायला सागितलं, तर काय सांगू!



छाती गर्वाने पूढे येते. ऊर भरभरून येतो. कंठ दाटून येतो. शब्दच फूटत नाहीत. आणि खूप छान बरं वाटतं.



मी लहान माणूस आहे. छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मिळतो, तो घेतो.



सामान्य माफकता...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२४ आँगस्ट २०१६

Er Rational musings #683

Er Rational musings #683



मी ब्रिज (पत्यांचा खेळ) शिकलो साधारणत: 1981 मध्ये. टेबल टेनिस बरोबरीने आवडणारा आणखीनेक गेम. पूढल्या वर्षापासून तसा "ब्रिजमाण" झालो, ते 1992 पर्यंत. या काळात, कुठे घरगुती लग्नमुंजबिंज कार्य असलं की आमची चांदी. तेव्हा चक्क साग्रसंगीत लग्न समारंभ चालायचे. म्हणजे आदल्या रात्री सिमांतपूजन, ते दूसऱ्या दिवशी सकाळचं लग्न, मग जेवणावळी पंगती (हातदेखलं व हातखाल्लं संगीतखूर्ची पाणी शोधी कसरतबूफे नव्हे). दूपारी हाँलवर ब्रिजचे डाव रंगायचे. संध्याकाळच्या रिसेप्शन पर्यंत. वेळ मिळेल तेव्हा, खूर्च्या टाकून, वा मांडा ठोकून.



मग दहाएक वर्ष ओपन ब्रिज टूर्नामेंटस् खेळलो. कुठेकुठे जाऊन. मस्तमनसोक्त. ब्रिजची एक मजा, एक विशेष आहे. ते म्हणजे, प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा, प्रत्येक डावानंतरची चर्चा ही साँल्लिड रंगते. "तू ती स्पेडची उतारी करायला पाहीजे होतीस पास्न, ते चार नोट्रंम्प बिड करायते होतेस, ते कायनीकसल'. मज्जा यायची या विश्लेषणात, आपल्याच पार्टनरशी अल्मोस्ट मारामारीच्या भांडण्याच्या सूरांत. हमरीतुमरीच. नंतर ब्रिज सूटलं, आता आँफ अँन्ड आँन, क्वचित.



फेसबूक चा वापर मी 2012 ला सुरू केला असेल. पण खरा आहारी गेलो फबच्या, नादावलो, ते गेल्या दीडएक वर्षात. आता व्यसनचटक लागलीये. थोर युगपुरूष, जगन्मान्य क्रांतिकारक मार्कजी झकरबर्ग यांची कृपादृष्टी!!



दोन पाच जबरदस्त फेसबूक ग्रँन्डमास्टर्स माझ्या मित्र यादीत आहेत. या व्यक्तींना मी प्रत्यक्ष ना कधी भेटलोय, ना त्यांच्याशी कधी बोललोय. त्यांचा जनफबसंपर्क दांडगा आहे. यांना, त्यांच्या मित्रसमुदायाकडनं आलेल्या पोस्टी, यांन्नी "लाईक" केल्या, वा काँमेंटल्या, तर, मला, माझ्या वाँल वर नोटिफिकेशन येतं आपसूक. मग मलादेखील 'त्या' पोस्टस्, त्यावर इतरांच्या झालेल्या काँमेंटस्, लाईक्स वगैरे वाचता येतात.



या माझ्या फबमित्रांची एक काँट'री (coterie) आहे, अ क्लोज्ड लूप. सगळे रिस्पाँन्सोत्सूक अँलर्ट असतात, व सगळेच छान लिहितात. चांगल्या वाचनाचा माझा स्वार्थ साधला जातो. कुठचेकोण लोक्स. आँफ बोद जेंन्डर. कनेक्टींग (अननोन)पिपल, ना?  थँन्क यू फ्रेन्डस्! अँन्ड फ्रेंन्डस् आँफ दीज फ्रेंन्डस्. थँक्स मार्कसर!!



ब्रिज खेळाशी साम्य आहे फेसबुकचं. बहुतेक वेळा, माझ्या मित्रमंडळींच्या मेन पोस्टस् पेक्षा, त्यावरच्या काँमेंटस्, लाईक्स व स्माईलीज् वगैरे जास्त एंन्टरटेनिंग असताते. आहे की नाही गंम्मतमज्जा. नुसती धमालधुरळा उडतो बरेचदा. माझ्या डोक्याला खाद्य, व माझ्या हातांना शिवशिव.



A 'mazing' आभासी वर्ल्ड वाईड वेब डाँट फेसबूक डाँट काँम...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२४ आँगस्ट २०१६

Tuesday, August 23, 2016

Er Rational musings #682

Er Rational musings #682



मिहीर च्या पाठी बाईक वर बसायला भिती वाटायला लागलीये. तशाही, काय या हल्लीच्या मोटार सायकली, साँरी, बाईक्स! सीट म्हणजे एकतर पत्र्याचा डबा असतो, वर पाsssतळ सीटसदृश लेयर. बरं, ह्हे उंच पाठून. म्हणजे कसबसं चढून बसलं, की पार्श्वभाग उर्फ ढूंगण ह्हे वरती. ह्या पोरीबीरी आर्राम्मात मज्जेत बसलेल्या असतात, बाईकस्वाराच्या पाठीवर घसरून आदळून चिकटून. स्साला आमच्यासारख्यांचे काय? बर, हात पकडायला पण दांडीबिंडी काही नाही. कसली ती अडचण, व पाठी पडण्याची भिती कायम मनात, तोल बिल जाऊन.

आमच्या हिरो होंडा सीडी 100 बर्या होत्या. वा बजाज सूपर. वा येझ्दी. वा अँपी १००.  वा राजदूत! पण आता जाणवतय, माझे बाबा माझ्या पाठी अस्सेच अवघडून बसायचे.

आता मी तसा बसतो.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



मिहीर च्या बाजूला चारचाकीत बसायला भिती वाटायला लागलीये. म्हणजे रिफ्लेक्स अँक्शननी पाय वारंवार (नसलेल्या) ब्रेकवर दाबला जातोय, अधनंमधनं. (ट्रेनिंग वेहिकलला ड्रायव्हर च्या बाजूला बसलेल्या कडे पण ब्रेक असतो ना, तस्सा!!) खरतर, असे होण्याचे काहीच कारण नाही.

मिहीर उत्तम प्रकारे, व सेफ, व कंन्ट्रोल मध्ये दूचाकी व चारचाकी चालवतो. व ते ही प्रचंड आत्मिक आवडीने. शिवाय, साक्षात अस्मादीकांनी ओके परफेक्ट असे सर्टीफाय केलेले आहे. म्हणजे तसा प्रश्न नाहीये.

पण होतय काय, उगाचच वाटतं की अर्र सांभाळून, अर्र ब्रेक मार, अर्र टेकेल बिकेल; वास्तविक प्रत्येकाच टेक्नीक, कंन्ट्रोल, जजमेंट, निराळं असतं.

तरीही.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



वय वाढलय लेका घाबरटा...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२३ आँगस्ट २०१६

Er Rational musings #682

Er Rational musings #682



मिहीर च्या पाठी बाईक वर बसायला भिती वाटायला लागलीये. तशाही, काय या हल्लीच्या मोटार सायकली, साँरी, बाईक्स! सीट म्हणजे एकतर पत्र्याचा डबा असतो, वर पाsssतळ सीटसदृश लेयर. बरं, ह्हे उंच पाठून. म्हणजे कसबसं चढून बसलं, की पार्श्वभाग उर्फ ढूंगण ह्हे वरती. ह्या पोरीबीरी आर्राम्मात मज्जेत बसलेल्या असतात, बाईकस्वाराच्या पाठीवर घसरून आदळून चिकटून. स्साला आमच्यासारख्यांचे काय? बर, हात पकडायला पण दांडीबिंडी काही नाही. कसली ती अडचण, व पाठी पडण्याची भिती कायम मनात, तोल बिल जाऊन.

आमच्या हिरो होंडा सीडी 100 बर्या होत्या. वा बजाज सूपर. वा येझ्दी. वा अँपी १००.  वा राजदूत! पण आता जाणवतय, माझे बाबा माझ्या पाठी अस्सेच अवघडून बसायचे.

आता मी तसा बसतो.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



मिहीर च्या बाजूला चारचाकीत बसायला भिती वाटायला लागलीये. म्हणजे रिफ्लेक्स अँक्शननी पाय वारंवार (नसलेल्या) ब्रेकवर दाबला जातोय, अधनंमधनं. (ट्रेनिंग वेहिकलला ड्रायव्हर च्या बाजूला बसलेल्या कडे पण ब्रेक असतो ना, तस्सा!!) खरतर, असे होण्याचे काहीच कारण नाही.

मिहीर उत्तम प्रकारे, व सेफ, व कंन्ट्रोल मध्ये दूचाकी व चारचाकी चालवतो. व ते ही प्रचंड आत्मिक आवडीने. शिवाय, साक्षात अस्मादीकांनी ओके परफेक्ट असे सर्टीफाय केलेले आहे. म्हणजे तसा प्रश्न नाहीये.

पण होतय काय, उगाचच वाटतं की अर्र सांभाळून, अर्र ब्रेक मार, अर्र टेकेल बिकेल; वास्तविक प्रत्येकाच टेक्नीक, कंन्ट्रोल, जजमेंट, निराळं असतं.

तरीही.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



वय वाढलय लेका घाबरटा...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२३ आँगस्ट २०१६

Er Rational musings #681

Er Rational musings #681



डाँ नरेंन्द्र दाभोलकर सरांबद्दल आदर बाळगून, एक भित्री कविता ....‼️



जगा व जगू द्या...



मुर्त्यांना पुजता पूजता

माणूसकीला जपतो मी❗️

काल्पनिक देवांना मानता मानता

फुले, शाहू, आंबेडकरांना आचरणात आणतो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



पोथ्या, पुराणे वाचता वाचता

गोब्राह्मणप्रतिपालक राजांना लवून मुजरा करतो मी❗️

दगडासमोर झुकता झुकता

जिजाऊ, सावित्री, रमाईलाच शोधतो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



घामाचे पैसे दानपेटीत टाकून,

डोळसपणे सढळ सकल मदत करतो मी❗️

तहानलेल्यांना पाणी,

भूकेलेल्यांना अन्न देऊन,

देवस्थान निमित्ते समाजहित साधतो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई म्हणून जगता जगता,

सर्वधर्मसमभाव सहिष्णूततो मी❗️

धर्मातील पाखंडांना न जपता,

संघम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



कर्तुत्ववान माणसापेक्षा,

दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗️

मंत्र, होमहवन, कर्मकांड, पूजाअर्चा करता करता,

बुध्दम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,

थेट माझ्या ध्येयाजवळ पोहोचतो मी❗️

श्रध्दा वा अंधश्रद्धा? वैज्ञानिक पातळे पारखून,

धम्मम् शरणम् गच्छामितो, तो मी❗️

छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️



छाती ठोकून सांगतोय,

सत्य स्वीकारणारा आस्तिक आहे मी❗️

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२३ आँगस्ट २०१६

Er Rational musings #680

Er Rational musings #680



चारचाकी चा इंन्श्यूरंन्स म्हणजे काहीतरी झोल आहे नक्कीच. एकतर, रिन्यूअल डेट जवळ आली की कुठनं सगळ्यांना समजत, देव जाणे. मग टोळभैरवांची वावटळ धाड तुटून पडते. फोनावर फोन. बर, हे सगळे एकमेकापेक्षा स्वस्त प्रिमियम कँलक्यूलेट करायला सदैव तत्पर असतात.

"उसने कितना दिया है सर, हम उससेभी कम में करवां देंगे" हे सांगणारे फोन्स. मग गाडीची आयडीव्ही कमी करून, रिवर्क (!) करून, फ्रेश कोटेशन मेलवर हज्जर!



दा़ल में कुछ काला ज़रूर हैं।



इंन्श्यूरंन्स मध्ये, गाडीचे काही काम करायचा प्रसंग आला, तर, आणखीनच मोठा झोल असावा.



म्हणजे बघा, आपण ठरावीक पेपर बिपर भरून द्यायचे, अँक्सीडेंन्ट कुठे कधी, ड्रायव्हर कोण, असले डिटेल्स भरायचे, व काही डाँक्यूमेंन्टस् च्या झेराँक्स देवून घरी जायच. पूढचं सग्गळ पडद्याआड, तुमच्या नकळत मँनेज होतं. खरा खर्च किती, इंन्श्यूरंन्स कंपनी कडनं किती हे सगळच संशयास्पद. बरं, याउप्पर आपल्या कडनंही काही रक्कम, रितसर रिसीट बिसीट देवून, वसूल केली जाते. तसा कमी भूर्दंड म्हणून आपण खूश. वेहीकल इंन्स्पेक्शन, ते रिपेअर्स, ते डिलीव्हरी, परफेक्ट चेन आहे. तरीही शंकेची पाल चुकचूकतेच. आणि "नो क्लेम बोनस" जातो, ते अँडिशनल!



कुछ तो गडबड हैं दया...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२३ आँगस्ट २०१६

Monday, August 22, 2016

Er Rational musings #678

Er Rational musings #678



महाराष्ट्र पोलिस सायबर सेलचे महासंचालक श्री ब्रिजेश सिंह साहेबांची काल एका वाहिनीवर मुलाखत बघीतली. अत्यंत उद्बोधक.



चर्चेदरम्यान एका प्रश्नाचा वारंवार उल्लेख होत होता. तो म्हणजे आपल्या सर्वांच्या हाताहातातला, हा (ओव्हर)स्मार्ट फोन व त्या अनुषंगानं होत असलेली निरनिराळ्या अँपस् ची बौछार. त्यातनं धोक्यात आलेली सायबर सिक्यूरिटी. जणू हा सेलफोन आपल्याला डोईजड झालाय, यासम चर्चेचा रोख, व रोष.



हे खरं आहे, की, ही बहुतेक अँपस् 'फ्री' असतात. अतिशय उपयोगी. व, कित्तीतरी प्रकारची अँपस् विकसित झालीयेत.



पूण्यातल्या एका पब मध्ये गेलं की, एक कस्टमाईज्ड अँप देतात. त्याद्वारे आपण दारू आँर्डर करायची असते. आपल्या मोबाईल वरनं, तिथल्यातिथे असताना सुध्दा! त्यातनं लाईव्ह आँक्शन बिडींग असतं दारूच्या ब्रँन्ड साठी, मेनूमधल्या प्रत्येक प्रकारच्या पेगच्या किमतीसाठी. ज्या दारूला मागणी जास्त, अँट दँट पाँईंट आँफ टाईम, ती दारू महाग असते! रेट वरखाली होत असतात!! असो. (हे उदाहरण, ह्या अँप्स चा शिरकाव कुठल्या स्तरापर्यंत गेलाय, व त्यातली कल्पकता, दाखवण्यासाठीच फक्त).



मूळ कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपली व्यक्तिगत माहिती दिल्याशिवाय बहुतेक अँप्स डाऊनलोड होत नाहीत. व या (नंबर, ई-मेल, जीपीएस लोकेशन इ.) डेटाच पुढे काय होतं, काय होऊ शकतं, कोणाच्या हातात हा डेटा पोहोचू शकतो, व या डेटाद्वारे (इच्छा व गरज पडल्यास) कायकाय करता येतं, याची निव्वळ कल्पनाच छातीत धडकी भरवणारी आहे, ना?



मी तज्ञ नाही या क्षेत्रातला, जाणकारांनी प्रकाश टाकावा, ही विनंती.



परंतु, काही काळजी घेतली व काही गोष्टी केल्या, तर कसे?



1. वेगळा एक सेलफोन, व अँडिशनली एक नंबर घेऊन, व्हाँट्सअँप व अँप्स वगैरे उद्योग त्याद्वारेच करायचे. वेगळं व अँडिशनल नवीन ई-मेल अकाऊंट उघडून, त्याचेच डिटेल्स द्यायचे, कोणी (म्हणजे कुठल्या अँप ने!) विचारणा केली, की हे डिटेल्स फिल अप करायचे. हा नंबर, व हे मेल अकाऊंट, या असल्या सगळ्या सटरफटर गोष्टींसाठी वापरायचे. (इंन्क्ल्यूडिंग अँलन साँली, टायटन, इत्यादि शाँपिंगची दूकानेबिकाने - यांनाही हाच डेटा द्यायचा.)



2. आपला नेहमीचा नंबर व नेहमीचे ई-मेल अकाऊंट हे नेट बँन्कींग ला वापरायचे. व ते डिटेल्स द्यायचे नाहीत उठसुट.



या, किंवा याव्यतिरिक्त अजून काही सेफटी व सिक्युरिटी मेजर्स घेता येतील का, घ्यायची गरज आहे का, वगैरे संबंधी विस्तृत माहीती जर पोलिस सायबर सेल ने, वा एक्स्पर्टस् नी दिली, तर सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल, यांत शंका नाही. दिली तर उत्तमच.



नाहीतरी, तसेही आपण जगतोयच मुळी भगवान भरोसे...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२२ आँगस्ट २०१६



(www.milindkale.com)

(www.milindmkale.blogspot.in)

----------------------------------------------------

Er Rational musings #677

Er Rational musings #677



सूंठवडा तो सुंठवडा,

जमला तर जमला, नाहीतर तिख्खटला



साबूदाण्याची खिचडी, ती खिचडी,

जमली तर जमली, नाहीतर बोंबलली



साबूदाण्याचं थालिपीठ, ते थालिपीठ,

जमलं तर जमलं, नाहीतर करपलं



साबूदाण्याची खीर, ती खीर,

जमली तर जमली, नाहीतर खारटली



खोबऱ्याच्या वड्या, त्या वड्या,

जमल्या तर जमल्या, नाहीतर चिकटल्या



मोतीचुराचे लाडू, ते लाडू,

जमले तर जमले, नाहीतर बत्ता-फोडे झाले



पोह्याचा चिवडा, तो चिवडा,

जमला तर जमला, नाहीतर चिवटला



शंकरपाळी, ती शंकरपाळी,

जमली तर जमली, नाहीतर कड-कडली



कडबोळं, ते कडबोळं,

जमलं तर जमलं, नाहीतर टणकलं



चकल्या, त्या चकल्या,

जमल्या तर जमल्या, नाहीतर कडकल्या



ओल्या नारळाची करंजी, ती करंजी,

जमली तर जमली, नाहीतर चामटली



शेव, ती शेव,

जमली तर जमली, नाहीतर मऊच पडली



शेवयांची खीर, ती खीर,

जमली तर जमली, नाहीतर जायफळली



चक्का टांगून केलेलं श्रीखंड, ते श्रीखंड,

जमलं तर जमलं, नाहीतर आंबलं



उपवास असो वा दसरा - दिवाळी

फराळी पदार्थांची असे रेलचेल

आमच्या अहो, मायाबाई मात्र

होतच नाहीत कश्शा कशात फेल



जेनु काम तेनु थाए

बिजा करें सो गोता खाए



હું ગમે છે અને ખાય છે પ્રેમ

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२२ आँगस्ट २०१६

Er Rational musings #676

Er Rational musings #676



"Let's agree to disagree!"



ह्या वाक्यावर मात्र आमच एकमत झालं. फेसबूकी भाषेत बोलायचं तर आम्ही दोघेही 'सहमत' झालो, १०० टक्के सहमत...!



बरेचदा काय होतं, की, मतभिन्नता असू शकते खूपदा, पण वितंडवाद न घालता, समोरच्याच्या भूमिकेचा आदर राखून, एका ठरावीक पाँईंट नंतर, सामोपचाराने हातमिळवणी करायला हरकत नसावी. हे सभ्यपणाचे, पोक्तपणाचे व समजूतदारपणाचे लक्षण आहे.



तसाही फार मुत्सद्दीपणा सुध्दा जाम डोक्यात जातो. 'तुझे बरोबर आहे, पण....' या पणानंतर आपल स्वत:चच घोडं पूढे दामटणारे लोक्स पुष्कळ आहेत. (खर तर, जर माझं बरोबर असेल, म्हणजे असं जर समोरची व्यक्ति मान्य करतीये, तर, हा पण मध्ये कसाकाय येऊ शकतो, हे मला पडलेले एक कोडे आहे). शिवाय हा म्हणजे विरोधाकरिता विरोधच झाला ना? पण फुक्कट चर्वीचर्वण. वेळ जाणार. वेस्टेज आँफ टाईम, काँस्ट अँन्ड एफर्टस्!!



त्यापेक्षा हा जगन्मान्य मध्यममार्ग.



तो त्याच्या वाटेने, मी माझ्या वाटेने. त्याच्या दृष्टीने तो च बरोबर, माझ्या दृष्टीने मी च बरोबर. चला, हवा येऊ द्या.



टाटा, सी यू, बाय बाय...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२२ आँगस्ट २०१६

Sunday, August 21, 2016

Er Rational musings #675

Er Rational musings #675



Quest for a medal...



Part II



~ Winning is not everything, they say. Winning or losing is a part of the game, they say. Participation is important, they say.



(But, is it?!); Well, we shall leave it like that. (at this juncture!)



As an avid sports enthusiast, I have to make certain suggestions.



We need to tackle myriads of problems faced by us Indians, of not excelling in sports, other than Cricket. At the highest competitive level.



Firstly, let's segregate various games in 3 differentiating groups.



1. Individual game. And requiring nil, or at the most, very less in number, and cheap, sportsgear or accessories or special/specific facilities, and/or specific coaching at the beginning, per se.



Examples

Athletics events like various running races, Weight lifting, and Swimming.



2. Individual game. But requiring costly sportsgear or accessories or special/specific facilities, and/or specific coaching.



Examples

Track n field events like shot put, Javeline throw, Discuss throw, Pole vault etc; Swimming (diving), Wrestling, Boxing, Golf, Archery, Fencing, Cycling, Gymnastics, Shooting etc.



3. Team games like Badminton, Table Tennis, Volleyball, Basketball, Soccer, Hockey, Handball etc.



Secondly, we need to involve Corporate Sector into sports promotion, in a big way. Start mandatory CSR (Corporate Sports Responsibility) on the likes of existing CSR (Corporate Social Responsibility)



Thirdly, we shall have to involve elected public representatives like local Municipal Corporators, Members of Legislative Assembly, and Members of Parliament.



And lastly, we need to ensure proper backing, assistance, and support from various Sports Federations, Associations, Academies, Educational Institutions, and State & Central Government.

---               (to be continued)



मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२१ आँगस्ट २०१६

Saturday, August 20, 2016

Er Rational musings #674

Er Rational musings #674



महान संत एकनाथ महाराज व शाहीर साबळे, यांची क्षमा मागून...



सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर

आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार



अग, ग..... व्हाँट्सअप्पा वाजला

देवा रे देवा..... व्हाँट्सअप्पा वाजला

आता काय मी करू..... व्हाँट्सअप्पा वाजला



अरे व्हाँट्सअप्पा वाजला, रे व्हाँट्सअप्पा वाजला, रे व्हाँट्सअप्पा वाजला, हो

महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?



कान आतुर व्हाँट्सअप्पा वाजला

तम सुविचार नजरेसी पडला

त्याने माझा दिवस चालिला



मेंबर मंडळी अति भावूक

मज फोटो धाडिला तिनं

सर्वांगी भावना जाण, त्या मंडळींची



या व्हाँट्सअप्पाला स्वीकारा, दमोगुण मागे सारा



दमोगुण म्हणजे काय ?



भागूनदमून मतिगुंग झाली असेल तर,

पोस्ट हासून थकवा ताण कमी करा.



सत्त्वगुण लावा अंगारा, अन्‌ व्हाँट्सअप्पा मंडळी विनोदती फाँरवर्डा



फावली करमणूक येऊन

अवघा मारिला दमोगुण

किंचित स्माईली भूणभूण, शांत केली जनार्दने

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२१ आँगस्ट २०१६

Friday, August 19, 2016

Er Rational musings #671

Er rational musing #671



छ्छे, हद झाली. १ किंवा ५ किंवा १० दिवस नुसता गोंधळ आता. रस्त्या रस्त्या वर मंडप, आक्रमण, जागा अडवणं, व सगळ्यांना त्रास. कर्णकर्कश्श संगीतगाणी, नाचबाजा, अति धुडगुस. दिव्यांची आतषबाजी, वीजेचा मोठ्या प्रमाणात वापर. झगमगते कपडे, उंची साड्या, महाग ड्रेस, पैशाचा मुक्त हस्ते चुराडा. श्रीमंतीचे भोंगळ हिडीस किळसवाणे प्रदर्शन. आणि प्रयोजक तरी कसले? गुटखा ची वगैरे जाहिरातबाजी. नियम, कायदे धाब्यावर! जनजीवन ठप्प विस्कळीत.



सही फर्माया, जना़ब! दही हंडी गोपाळकाला वा गणपती, कसलं तंतोतंत लागू पडतं ना हे वर्णन!



अहो, पण हेच बहुतथोडं प्रमाणात *कोलकात्यात दूर्गा पूजेला* पण लागू पडतं ना? किंवा, *नवरात्रेत अख्या गुजरात* मध्ये! कोलकात्यात व गुजरात फक्त उदाहरणार्थ फक्त बर का! तसंही ,प्रत्येक राज्यात तिथल्या सणवारप्रसंग निमित्ताने हीच वस्तुस्थिती आहे.



'त्या' राज्यात, कधीकोणी कोर्टात गेल्याचं ऐकिवात, बघण्यात नाही! हे सुधारक इथेच. महाराष्ट्रीय सणांवर 'संक्रांत' आलीये हेच खर! सगळ्या फूरवोगाम्यांनी मर्राठी रूढी परंपरा सण सुधारायचा विडा उचललाय, चंगच बांधलाय. चांगलय की. जूनं ते सोनं पण नवं ते हवं, ना!?



हिच सतर्कता, जरा बाजूआजूला बधून, दाखवावी दर्शवावी, जाणवावी, ही विनंती.



आम्ही तयार आहेत;



~ स्टूलावर बसुन २१ वर्षाच्या तरूणाकडून हंडी फोडाया.

~ वीतभर उंचीची इको फ्रेंन्डली गणपती मूर्तीची पूजा करायला, व तिचे बादलीत विसर्जन करायला.

~ आणिक अशीच लोकाभिमूक सामंजस्याची भूमिका घ्यायला; प्रत्येक सणा बाबतीत. जागरूक ही आहो.



~ तस बघीतल, तर अपघात होतील म्हणून जिम्नँस्टिक्स मध्ये भाग घ्यायला नको, ना एक्स्प्रेसवे ने प्रवास करायला. ना माऊंटेनियरिंग. फारकशाला लांब जा, अहो ट्रेन ने प्रवास पण नको - अठरा वर्षाखालील मुलांना तर नकोच नको, नाही का?!



पण, असो.



"टाळी एका हाताने वाजत नाही", असं म्हणणं साफ चूकीचेे आहे. आम्ही आपले एकटेच टाळ्या वाजवतोय.



मी मर्राठी सोडून बाकी सगळेच शिमगा करताहेत, त्याच दु:ख मात्र उराशी आहेच...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१८ ऑगस्ट २०१६

Er Rational musings #672

Er Rational musings #672



Part I



A Quest for an elusive medal



For many games of individualistic nature, be it athletics like hammer throw/shot put/javeline throw/track n field events or swimming or weight lifting or shooting or archery, or even rowing etc, there are World records, Olympic records, (or Commonwealth/Games records etc), or National records or Individual best, which really matter. There are set qualifying standards, which need to be surpassed, for entry into Olympics. For rest of the team games like Badminton, Table Tennis, Volleyball, Basketball, Soccer n alike, it's anybody's game, but with a rider. There is a qualifying criteria for all such games; for example, in case of Hockey, a winning country in Champions League Hockey Tournament, gets automatic qualification for next Olympic games. Hence, it's pretty clear about who can participate in Olympics.



It would be very pertinent and obvious question to come to anybody's mind, is that, if such timing/records etc are known, why can't Indian players vie for it themselves, on their own?



Some World records, for illustration:



1) Athletics 100 mtr run, world record time is 9.58 seconds.

2) Swimming 100 mtr freestyle world record time is 46.91 seconds.

3) Weight lifgting 105+ category, Snatch world record is 216 Kg.



So, the point is, can anyone with such goal in sight, not practice and practice and practice and focus and focus and focus, to achieve this? In local Maidan (do 100mtr sprint in 9.58 sec), local swimming pool (swim 100mtr in freestyle within 46.91 seconds), or local Gym (lift snatch the weight of your weight category), maybe? Achieve it, participate in local district zonal, national tournaments and display this, winning consistently. And prove it again and again



Yes, off course, it can be done; it's difficult but not impossible. (Limba Ram, greatest archer from tribal Rajasthan, is a perfect example. He equalled the world record in 1992, on his own, and also represented India, in 3 Olympics).



Possible? Simple? Just like that? Isn't it? Really, is it?



~ Olympics jargon understood?!

~ Olympics jigsaw puzzle solved?!

~ Olympics jinx broken?!



Easter said than done...

---               (to be continued)

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१९ आँगस्ट २०१६

Er Rational musings #673

Er Rational musings #673



हाय फँट!



मोठ्या मुलाची हाक. मी थोडा कावराबावरा झालो. चमकून त्याच्या कडे बघीतलं; होय, तो मलाच हाक मारत होता. मनात म्हणलं, मी कुठे फँट आहे बाबा. मी तसा सडपातळ व उंच.पण ते तेव्हढ्यावरच राहिलं, काही कारणास्तव.



दूसऱ्या दिवशी हा पठ्या आमच्या अहोंना, म्हणजे मायाबाईंना, हाक मारतोय, हाय माँट!

च्यामारीटोपीगंडेरी, असली हजेरी घेतलीये त्याची, की काय चावटपणा आहे, हाय फँटमाँट म्हणे.



आमचेच सुपुत्र ते; उत्तरले, दात काढून...



~ हाय फँट म्हणजे hi fat, हाय फादर...

~ हाय माँट म्हणजे hi mot, हाय मदर...



म्हणे, जसे

~ हाय ब्रो म्हणजे hi bro, हाय ब्रदर...

~ हाय सिस म्हणजे hi sis, हाय सिस्टर...



!! कसली ही भाषा; कप्पाळ...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१९ आँगस्ट २०१६

Wednesday, August 17, 2016

Er Rational musings #670

Er Rational musings #670



~ दही हंडी आली. अमक्या तमक्या(च) उंची पर्यंत परवानगी. वयाचे बंधन. विमा, सुरक्षा इत्यादि जोडीला. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ गणपती बाप्पा आले. सार्वजनिक गणपतींची संख्या कमी करा. मूर्ती च्या उंचीवर, माती वर, विसर्जनावर आक्षेप, रिस्ट्रिक्शन्स्. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ नवरात्र आली. लाऊड स्पिकर चा वापर या त्या वेळेतच, दोनच दिवस अेक्स्टेंशन. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ दसरा आला. आपट्याची पाने तोडू नका. निसर्ग संपत्ती चा ऱ्हास. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ दिवाळी आली. फटाके फोडू नका. प्रदूषण होतं. दिव्यांनी उजळून टाका. (वीजे ची नासाडी!? चालेल? पण मग वीज निर्मिती साठी अल्टीमेटली कोळसा वा पाणी वा वायू च वापरणार ना!) मान्य, एकदमच बरोब्बर!



~ होळी आली. धुळवड रंगपंचमी आली. कोरडी होळी खेळा. पाणी वाचवा. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ नाग पंचमी आली. नागांचे प्रदर्शन नको. बंदी. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ बैल गाडी शर्यत नको. (रेस कोर्स मधे घोड्यांच्या शर्यती वर पैसे उडवा ना - सट्टा लावा ना) मान्य, एकदमच बरोब्बर!



~ आणिक कुठला सण राह्यलाय का मेंशन करायला? सग्गळ सग्गळ मान्य, एकदमच बरोब्बर!



आता अजून कुठले पुरावे द्यायचे हिंदूंच्या अपरंपार सहिष्णूतेचे.



इतर धर्मांच्या धार्मिक सण, रितीरिवाज, रूढी, परंपरा, उत्सव, यावर नभाष्य केलेले बरे.



खटाखट निर्णयफैसला; व्वा. तत्परतेचे स्वागत व आदर!!



आता जर्रा प्रलंबित खटल्यांकडे वळूया.



२ च उदाहरणं पूरेशी असावीत.

~ बेळगाव

~ राममंदिर



जय होsss...

---

मिलिंद काळे, १८ आँगस्ट २०१६



Please share, if you agree.

Er Rational musings #669

Er Rational musings #669



आठवीनववीदहावी ट्यूशन धाडीले।

SSC, CBSE, ICSE प्रावीण्य मिळाले।।१।।



Science विश्वे पदार्पण केले।

HSE, CET मार्गे मार्क मात्र स्कोरीले।।२।।



१, २, ३, ४ लिस्टे नाव काँलेजले।

इंजिनियरिंग चा गमभन घोकीले।।३।।



TOEFL, GRE तय्यारी योजिले।

कोलंबस गावे युनिव्हर्सिटी भेटीले।।४।।



व्हाया लंडन प्रस्थानगमन जाहले।

अमरिका भू पावता कृतकृत्य झाले।।५।।



MS होता सरता अर्थार्जन गुंफीले।

चीप लेबर मायग्रेट ग्रीनकार्डे होईले।।६।।



'साठा उत्तराची कहाणी' सुफळ संपूर्ण



'THE END' नव्हे, 'THE BEGINNING' अवतरले...

---

मिंलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१७ आँगस्ट २०१६

Er Rational musings #668

Er Rational musings #668



अवांतरउवाच भाग २



~ मंगळवारी नखं कापावी म्हणतात. खूप *पैशे* मिळतात.



~ शनिवारी केसं कापू नये म्हणतात. खूप *पाप* लागतं.



~ बऱ्याचश्या *कला* (!) नामशेष झाल्यात:



१ प्रेमचिठ्ठी वगैरे पाठवणं

२ डोळा मारणं, व नेत्रपल्लवी इशारे पण!

३ शिट्टी मारणं, शीळ घालणं; (दोहोंत फरक आहे भावा)

४ ट्टाँक ट्टाँक आवाज करणं, जीभ आत टाळूला लाऊन

५ पूचपूच वा प्स प्स आवाज करणं, ओठांचा चंबू करून



~ अँक्टीव्हा, स्कूटी, मास्ट्रो च्या जमान्यात, टू व्हीलर्स स्कूटर्स ना स्टेपनी असायची, हेच मुळी कोणाला माहीत नाहीये. पंक्चर झालेला पुढचा वा पाठचा टायर फटक्यात बदलता यायचा. आता फक्त, *फिल ईट, शट ईट, फर्गेट ईट चा जमाना*.



~ दूचाकी ना आरसा असणं इज कंपलसरी, बाय लाँ. काही ठरावीक हाय एन्ड बाईक्स चे दोन आरसे बरेचदा एकमेकांकडे बघत नमस्कार करत असतात; *शोबाजी* ची कम्माल आहे!

---

मिलिंद काळे, १७ आँगस्ट २०१६

Er Rational musings #667

Er Rational musings #667



अवांतरउवाच



~ वाढदिवस शूभेच्छा म्हणून *हँव अ ब्लास्ट* असं का बर म्हणत असावेत?

उघडउघड दहशतवादी चिथावणीखोर आत्मघातकी सल्ला??!! हा हा हा हा.

आणि, मेनी मेनी हँप्पी रिटर्नस् आँफ द डे या पेक्षा , सध्या many *more* happy returns ची चलती आहे. किंवा *हँप्पीवाला बर्थडे*!



~ Suppose, I am writing an email to someone. I am REQUIRED to start the letter or mail, with (for example) either Dear ~Milind~ (first name only) or Dear ~Mr Kale~ (prefix of Mr; last name) and NOT either Dear Mr Milind (first name) or Dear ~Kale~ (last name). Why??!! Unwritten Good Linguistic Practices (GLP), on the lines of Good Technical Practices (GTP) aka Guaranteed Technical Parameters (GTP)??!!



~ "तो मोठ्याचा आहे", असे गौरवोद्गार अस्मादिकांच्या तोंडून वदले, की जरा चाचपडावं. कारणकी असं समजावं, की तो पूरीभेळवाला, तो पाववडावाला, तो भाजीपाववाला, वा तो कोणीही खाऊपदार्थ विकणारा, वा ते कुठलंही दूकान असो, अतिच स्वच्छ बिच्छ असणार. जरा टकाटक. पंजावर प्लँस्टीक चढवलेले लोक्स, धूपबिप लावलेला, आणि (उदाहरणार्थ, भेळेत डाळिंब्याचे दाणे बिणे घालून सर्व्ह करणारा), चकाचक माणूस, व टकाटक गाडी - दूकान.

उदाहरणार्थ, आईस भेळबिळ मिळणारं, मलई गोळाबिळा मिळणारं तत्सम ठिकाण. किंमत "य" (म्हणजे उगीचच खूप) रूपये.

आपला तो कळकटमळकटतेलकट भैय्याच बरा बाबा! (उदाहरणार्थ, पाणीपूरीच्या माठात, हात मनगट बोटं बुचकाळून सर्व्ह करणारा!)

---

मिलिंद काळे, १७ आँगस्ट २०१६

Tuesday, August 16, 2016

Er Rational musings #667

Er Rational musings #667



अवांतरउवाच



~ वाढदिवस शूभेच्छा म्हणून *हँव अ ब्लास्ट* असं का बर म्हणत असावेत?

उघडउघड दहशतवादी चिथावणीखोर आत्मघातकी सल्ला??!! हा हा हा हा.

आणि, मेनी मेनी हँप्पी रिटर्नस् आँफ द डे या पेक्षा , सध्या many *more* happy returns ची चलती आहे. किंवा *हँप्पीवाला बर्थडे*!



~ Suppose, I am writing an email to someone. I am REQUIRED to start the letter or mail, with (for example) either Dear ~Milind~ (first name only) or Dear ~Mr Kale~ (prefix of Mr; last name) and NOT either Dear Mr Milind (first name) or Dear ~Kale~ (last name). Why??!! Unwritten Good Linguistic Practices (GLP), on the lines of Good Technical Practices (GTP) aka Guaranteed Technical Parameters (GTP)??!!



~ "तो मोठ्याचा आहे", असे गौरवोद्गार अस्मादिकांच्या तोंडून वदले, की जरा चाचपडावं. कारणकी असं समजावं, की तो पूरीभेळवाला, तो पाववडावाला, तो भाजीपाववाला, वा तो कोणीही खाऊपदार्थ विकणारा, वा ते कुठलंही दूकान असो, अतिच स्वच्छ बिच्छ असणार. जरा टकाटक. पंजावर प्लँस्टीक चढवलेले लोक्स, धूपबिप लावलेला, आणि (उदाहरणार्थ, भेळेत डाळिंब्याचे दाणे बिणे घालून सर्व्ह करणारा), चकाचक माणूस, व टकाटक गाडी - दूकान.

उदाहरणार्थ, आईस भेळबिळ मिळणारं, मलई गोळाबिळा मिळणारं तत्सम ठिकाण. किंमत "य" (म्हणजे उगीचच खूप) रूपये.

आपला तो कळकटमळकटतेलकट भैय्याच बरा बाबा! (उदाहरणार्थ, पाणीपूरीच्या माठात, हात मनगट बोटं बुचकाळून सर्व्ह करणारा!)

---

मिलिंद काळे, १७ आँगस्ट २०१६

Er Rational musings #666

Er Rational musings #666



एखादा दिवस हल्ली पूर्ण बाहेर काढायचा असला, कामानिमित्त, की जरा तयारी करावी लागते, जाणीवपूर्वक.



आजी असताना, तिच्याकडून "पेरूचा पापा" शिकलोहोतो. घरातनं बाहेर पडताना ती विचारायची, मग मीच स्वत:लाच विचारायचो. की "पेरूचा पापा" घेतला का?



पे - पेन, रू - रूमाल, चा - चावी, पा - पाकीट, पा - पास (रेल्वेचा). हा पेरूचा पापा घेवून "मी येतो", (जातो, असं म्हणायचं नाही, इति आजी; 'येतो' म्हणलं की परत येण्यासाठी च जातोय, असं ती म्हणायची!), असं म्हणून घराबाहेर पाऊल टाकायच. हा शिरस्ता, नियम, शिकवण;

या 'पेरूच्या पापा' ला मी गेल्या दहा तेरा वर्षांत कस्टमाईज केलय; अँड केलय त्यात.



आता माझं स्वगत असतय, की "पेरूचा पापा मोछ", घेतला का बरोबर?! (मो - मोबाईल, छ - छत्री)



परंतु गेल्या दोनचारेक वर्षभरातच, म्हणजे ओव्हरस्मार्ट फोन ने माझा ताबा घेतल्या पास्नं, नवनवीन डिव्हायसेस, गँजेटस् व अँक्सेसरीज, बरोबर असणं अनिवार्य झालय. त्यामुळे तो सगळा तामझाम न विसरता नेणं म्हणजे एक दिव्यच आहे.



चारचाकी ने दिवसभर काम करत थांबत फिरायचं असेल तर, कार मोबाईल चार्जर, आँक्स (आँक्झिलिअरी) काँर्ड, जून्या हिंदी गाण्यांची पेन ड्राईव्ह, हँन्डस् फ्री, [आता एका चारचाकीत आँडियो सिस्टीमला मल्टीपल फोन्स कनेक्ट करता येतातते, त्यामुळे तशी हँन्डस् फ्री वा वायरलेस ब्लू टूथ ची (हा ब्ल्यू टूथ एव्हढा विचित्रघाण दिसतो झुरळ कानावर बसल्यासारखं दिसतं!) गरजमात्र दूसरी चारचाकी नेली तर लागतय हे सगळ]



शिवाय, बरच कायकाय लागत बरोबर; मोबाईल बँटरी डाऊन झाली, तर लागणारा पाँवर पँक; पेन ड्राईव्ह मोबाईल ला लावता येईल अशी छोटी काँर्ड; व ड्यूअल पेन ड्राईव्ह, म्हणजे छोट्टीशी पेन ड्राईव्ह, एक बाजू डायरेक्ट मोबाईल च्या स्लाँट मध्ये जाऊ शकते, व दूसरी बाजू म्हणजे नाँर्मल पीसी व लंंपटाँपच्या पेन ड्राईव्ह स्लाँट मध्ये जाते. तो. प्लस डाँन्गल फोटाँन मँक्स हवाच. वरतून नाँर्मल मोबाईल चार्जर असावाच लागतो बरोबर.



बापरे, कित्ती ही तयारी. पण खरच सांगतो, प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता भासते व लागते सुध्दा प्रसंगीवेळी. आणिक महत्वाचे म्हणजे, जनरली कुठेकाही अडत नाही.



पेरूच्या पापा (व मोछ) प्रमाणे, ह्या फुटकळ चीजा अँब्रेव्हिएट करता येत नाही, ह्याच दु:ख आहे.



"पेरूचा पापा" "मोछ" "अँsssक्षी" (अँक्सेसरीज!!!)...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

१६ आँगस्ट २०१६

Monday, August 15, 2016

Er Rational musings #665

Er Rational musings #665



फेरीवाला, म्हणजे फिरता फिरता माल वस्तू विकणारा. ओरडत त्याच्याकडील सामानाची जाहीरात करत करत, फिरस्ता व्यापारी!



वरील अर्थ, आँक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी मधे दिलाय.



आता आपली हाँकर कम्युनिटी वा फेरीवाले; याबाबतीत काय हकिकत आहे.



फेरीवाले म्हणजे मार्केट रोड वर, वा इतर वर्दळीच्या रस्त्यांवर, फूटपाथवर, रहदारीच्या रस्त्याच्या मधे, गटाराच्या बाजूला, कचराकुंडी च्या पुढे, एम एस ई बी च्या लाल रंगाच्या फिडर बाँक्सला वा एमटिएनएल च्या करड्या रंगाच्या टेलिफोन टँग ब्लाँकला खेटून, बीईएसटी च्या बसस्टाँप चा आसरा घेवून, दूकानांच्या, रिक्शा टँक्सी स्टँड च्या आगे पीछे दायने बाहे उपर नीचे, कुठेही, कसेही, बसून वा हातगाडी लावून वा खोपटं बांधून 'धंदा' करणारे लोकं!



दिवस संपता क्षणी, त्याच जागी, आपापल्या मालाच्या पेट्या पेटारे तिथ्थेच बांधून ठेवले जातात. रात्री फेरफटका मारला की दूतर्फा रस्त्यावर, फूटपाथांवर, या फेरीवाल्यांच्या हक्काच्या मालकीच्या (!) प्राँपर्ट्या दिसतात. दिवस उजाडताच, तिथ्थेच धंदा व्यवसाय सुरू!



झक् मारत गेली ती आँक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी व *"भटका विमुक्त व्यावसायिक"* हे फेरीवाल्याचं मिनिंग.



त्यातनं ते आपले 'फेरीवाला क्षेत्र' वगैरे मार्कड एरियाज म्हणजे मोठा जोक आहे. कुठलाही रस्ता घ्या, तो मोठा केला वा अतिक्रमण मूक्त केला वा नो पार्किंग वगैरे बोर्ड लागले, की समजावं, तेरा सोळा दिवसात, खाऊगाड्या लागणार तिथे.



किमानपक्षी प्रत्येक रस्त्यावर जंक्शन, मग ते छोटमोठ कुठलही, आलं, की त्याच्या चारही बाजूला किमान पंधरा फूट मोकळे केले तरी वाहतूक समस्या सुटू शकायला हातभार लागेल. आत्ता बरेच ठिकाणी, हे कोपरे न कोपरे व्यापलेत, वर्तमानपत्रांचे स्टाँल, दूधाचे स्टाँल, चांभार, शहाळंवाले, वडाभजीपाव वाले, केळीविके, गायचारावाले, चहावाले, सिगारेटपानवाले, भाजीवाले, हारफूलेवाले, असे असंख्य छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांनी. बळकावलेत!



म्युनिसिपालटी, पोलिस खातं, रस्ते 'मालक', आणि निरनिराळ्या संघटना/संघ/संस्थांची 'रितसर' 'परवानगी' घेऊन व व्यवसाय'शुल्क' भरून, अक्षरशः समांतर अर्थव्यवस्था निर्माण करून हे 'धंदे' होत नसावेतच असे नाही.



शोधा म्हणजे सापडेल; उत्तरऊतारा ओ...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

16th August 2016

Friday, August 12, 2016

Er Rational musings #664

Er Rational musings #664



मला वाटतं की आपण बरेच लोक्स 'काल'मध्ये व 'उद्या'मध्ये सतत पालटूनआलटून जगत असतो. ('आज' पेक्षा). तीचतीच गोष्ट उगाळायला, चर्वीचर्वण करायला आपल्याला जास्त भावतं, व आपण ते एन्जाँय पण करत असतो. तसेच, भविष्याचा सतत विचार करत आपण बरेचदा चिंताग्रस्त मूद्रेने वावरत असतो. नवल याचं, की आपण हे ही, नकळत का हुईना, एन्जाँय करत असतो. परंतु, आपल्याला 'आज'मध्ये जास्त जगायला पाहीजे असेही सारखं वाटतं मला.



कल आज और कल की धडकन, चलती जा़ये घडीं sss

टिकटिक टिकटिक टिगीडीगी डिकटीक sss



पृथ्वीराज, राज व रणधीर कपूर, सिनेमा: "कल आज और कल."

या 'कलकल' ला 'आज' पेक्षा अति महत्व. असे न होता, याच चित्रपटातल्या बबीता (रणधीर कपूरची सिनेमातली हिरॉईनप्रेयसी व रिअल लाईफ मधली प्रेयसीपत्नी) वर आपण जास्त 'लक्ष' (अर्थाअर्थी नव्हे!) केंद्रित करायला पाहीजे!! बबीता म्हणजे व्यक्तरेखा वा नटी म्हणून नाही, तर ती पिक्चर मधल्या 'आज' ची संकल्पना आहे, प्रतीक आहे, म्हणून!



या कलकलीचे, (कल और कल, काल व उद्या) सोशल सिक्युरिटी, पाश्चात्य देशांइतकी पाँवरफुल नसणे, हे एक महत्वाचे कारण असावे. प्रत्येक सजीवनिर्जिव गोष्टींची, त्यामुळेच की काय, कायम काळजी करण्याचं वा अवास्तव स्वप्नं बघण्याच व्यसनच जडलय म्हणा ना, आपल्याला!



याला अनेक जूनी व्हिंटेज, काँन्ट्रँडिक्टरी विधानं पूरक आहेत, व हातभार लावताहेत; ती एव्हढी बिंबली गेलीयेत आपल्या सब काँन्शस मनात, की काही बोलायची सोय नाही. मग आपसूक आपली वर्तणूक, दूहेरी दुभंगलेली सर्रास राजरोसपणे दिसून येते.



~ समय से पहले, और भाग्य से अधिक  कुछ नहीं मिलता।

हे म्हणजे फर्स्ट व फोरमोस्ट! कहर.

कारण आपण पामर; "हा" समय नक्की केव्हा? हे गौडबंगालच. गुपित. ते कोण सांगत नाही. म्हणजे "जे" मिळेल, "ते" व "तेव्हढच," व "तेव्हाच" "तसच" मिळणार होतं, मिळतं, ही एक मनाची भाबडी समजूत. पळवाट.



~ आले देवाजीच्या मना.



~ जे विधिलिखित आहे तेच होणार.

असच जर असेल, तर, काहीही हालचाल न करता स्तब्ध बसावे की नाही? पण नाही, कारण

~ प्रयत्न करत राहणे, फळाची अपेक्षा करू नये.

म्हणजेच किती क्षूद्रता असावी मानवाची!



मग, या 'कालच व उद्याच' रहाण्या शिवाय नापर्याय असतो. भूतवेळेला कवटाळून, व आशाळभूत असहाय्यतेने भविष्याची आच लाऊन, 'आज'च अगतिकतेने आचरण, असही आपल्या अंतर्मनात प्रोग्राम केलं गेलय. ऑटो ग्रूमींग केलय आपल्याला. ब्रेन वॉशिंगच म्हणा ना!



असो; मुद्दा साधा सरळ सिंपल आहे.



कल करेसो आज, आज करेसो अब।

अर्थातच, आज, आत्ता, ताबडतोब.



कारण, ज़िंदगी ना मिले दोबारा; सो एन्जॉय एव्हरी टिटबीट...

---

Milind Kale, 13th August 2016

Thursday, August 11, 2016

Er Rational musings #662

Er Rational musings #662



~ प्रत्येक खोलीत फडताळं, फळी, खुंटी, कोनाडा वगैरे.

~ पँसेज मध्ये कपडे वाळत घालायला दांडी, काठी वगैरे.

~ स्वयंपाकघरात ताकाचा कावळा, पाणी प्यायचा चंब्या, विळी, पाटा वरवंटा, ताटाळं, माठ, पाट, सूप, मुसळ, रवी, जातं वगैरे.

~ न्हाणीघरात (बाथरूम) गरम पाण्याचा बंब, राखुंडी, पाण्याची तपेली वगैरे.

~ दिवाणखान्यात फोल्डींग टेबल, जाजम, ठोक्याचं घड्याळ वगैरे.

~ बेडरूम मध्ये रजई, दूलई, तक्क्या वगैरे.

~ इतरत्र तेलाचा बुत्या, वाळाचे पडदे वगैरे.



आणि खायला कढण, उकड, फदफदं, मेतकूट भात वगैरे.



मला माहितीये. मी अनुभवलच. मला खूप आवडायचं. परंतु, आता, ह्यातलं कितीस माहितीये यंन्गीस्तानला, पता नहीं।



~ चिमणी तर बेकरीलाच बघीतलीवती.



प्लँटफाँर्म म्हणलं की रेल्वे स्टेशनच माहीत होतं.

आता किचन 'प्लँटफाँर्म' व शेगडीवर चिमणी!

~ 'ड्राय' बाल्कनीत 'ओले' कपडे टांगणीवर.

~ एकावर एक डोक्यावर कंटेनर रचलेले बघीतलेवते यार्डात; इथे स्टँक पार्किंग नामे गाड्या एकदूसऱ्याच्या ऊरावर चढून बसलेल्या.



हाँ, हे मात्र माहितीये. इति बरेचसे माझे तरूण (!) मित्र.



मला पण माहितीये. मी अनुभवतोय. मला पण आवडलय!



..."सहीं या गलत, पता नहीं...लेकिन, पर्सनली स्पिकींग, जो भी था, अच्छा था!" इति अनुपम खेर. (सिनेमा: अ वेनस्डे)



... पहिला पुराना सही ~या गलत, पता नहीं~...पर, पर्सनली स्पिकींग, जो भी था, अच्छा था!! इति, अर्थातच, अस्मादीक



यूवर्स ट्रूली...

---

Milind Kale, 12th August 2016

Wednesday, August 10, 2016

Er Rational musings #661

Er Rational musings #661



~ हे बघ xxx, सरळ घरी यायचं हं. कोणी काहीही सांगूदे. हरकत नाही; सगळ ऐकून घ्यायचं, व म्हणायचं पहिल्या प्रथम मला बाबाशी, आईशी वा दादाशी ताईशी बोलायचय, फोन लावून द्या.

समजा कोणी ओळखीचा माणूस, नेहमीचे वायरमन काका, वा सुतार काका, वा वाँचमन काका वा झाडूपोछा वाल्या मावशी, वा ओळखीची आणिक कोणी(ही) व्यक्ति आली तुला घ्यायला भेटायला परस्पर, व काहीही सांगू लागली, तरी, प्रत्यक्ष आमच्या पैकी कोणाशीही, बोलल्याशिवाय, विश्वास ठेवायचा नाही. अगदी काहीही सांगूदे; की तुझ्या आईने बोलावलय तिकडे, ती पूढे गेलीये; वा, तुझ्या बाबांना एक्सीडेंट झालाय, हाँस्पीटलला ताबडतोब जाऊया; वा असलतसलं काहीही. अगदीच रस्त्यात कोणी गाठलं, जबरदस्ती केली, तर, जोरजोरात बोंबाबोंब ठोकायची. पोलिस काका दिसला तर उत्तमच.

वगैरे वगैरे वगैरे.



~ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको हं yyy. समुद्रात तर बिलकूल जायचं नाही, कुठल्याही परिस्थितित. काय जे स्विमिंग करायचय ते स्विमिंग पूलात करा. ड्रिंक्स घेवून गाडी चालवायची नाही. दूसऱ्या कोणा प्यायलेल्या मित्राला पण चालवू द्यायची नाही. एव्हढीशीच प्यायलोय; जवळच तर जायचय; पोलिस नसतात त्या रस्त्यावर; काही होत नाही; असल्या तत्सम कुठल्याही सबबी चालणार नाहीत. मुली बरोबर असतील, तर, न पिता सुध्दा, रात्री बारा नंतर, बाहेर पडायच नाही, फिरायबिरायला.

वगैरे वगैरे वगैरे.



बरोब्बर ओळखलत.



पहिली सूचनावजा आज्ञा, आपापल्या शाळकरी 'xxx' नामक मुला/मुली साठी. एकटे दुकटे घरी जातायेता.



दूसरा, आज्ञा वजा डोस, हा आपापल्या 21 वर्षावरील 'yyy' नावांच्या मुलाकरता. कुठे पिकनिक ट्रिपला जाताना.



#आपल्याक (!) काळजी...

---

Milind Kale, 10th August 2016

Er Rational musings #660

Er Rational musings #660



One of my school batch mate, Nitin Mundhe, (Dhumya), expired on this day, a year back.



All of a sudden. Without any symptoms or warning. Night before, he was enjoying chatting, jokes n all, in our Whatsapp group, consisting of about 25 class mstes. Till almost 11.30 pm. Next morning, a morning of the fateful day, he got up as usual, got the milk bags from the door, which milkman had left, as usual. He complained to his wife @ some headache. Neha, his wife, was about to apply balm to his forehead. But he went to deep sleep, on her lap, never to get up again in this world! Immediately shifted to ICU. Was in Coma. Brain dead. Life support system removed on 10th August 2015.



-----------------------------------------------------



Why?



Nobody has the answer except the likes of 'destiny', 'काळ वेळ सांगून येत नाही', 'त्याच्या (!) मर्जी पूढे कोणाचे काहीच चालत नाही', etc. And so true, remarkably proved, one more time.



A singular moment can change EVERYTHING, within a fraction of a second. That's the irony of it.



Medical Science has grown leaps n bounds over the years. We are past the stage of a dose of 'home made' red liquid medicine in small bottle with dosage proportion marked with pasted paper (zig zag cut by scissors!) and 2 days medicine; that was all and enough. That's it. Those were the days of a 'family doctor'!



Now, we are into the stage of VSAI (doctor's use to diagnose everything with either 'V' for Viral, or 'S' for Seasonal, or 'A' for Allergy or 'I' for Infection!) and if nothing suits the decease (!), diagnosis would invariably be "Nausea!" Or, the classic master reason, "Food poisoning!!"



And never ending (hand in glove) story of laboratory tests n Xrays n scans n all begins.



Now, we have modern technology. We have new treatments (n tests!) for all ailments. Life is getting easier, thanks to great efforts of doctors fraternity; who are still, our demi-Gods! It's because of them that average life of person has increased. They are the healing touch, a hope! We @ll must thank them for unselfish yeoman's service provided by them to the society.



But, but, still a long way to go.



Can we 'produce' blood? No.

Can we 'manufacture' artificial human part? No.

Can we 'GUARANTEE' life? Unfortunately, NO.



Hence the enigmatic question remains; WHY?

---

मिलिंद काळे, 10th August 2016

Tuesday, August 9, 2016

Er Rational musings #658

Er Rational musings #658



मुलुंड मध्ये दोन तीन स्पाँट आहेत, वाहतूक पोलिसांचे फेवरीट! याइथे कधीमाधी पोलिसपहारा असतो. हेल्मेटविना कोण दूचाकी सवार आला, की यांना बहुतेक लग्न न होत असलेल्या मुलीसाठी जावई मिळाला, की कसा होईल ना, सेम तस्साच आनंद होतो. यांच्या अंगात स्फूल्लींग शिरतं, व अस्सली झडप घालतात, जशी डिस्कव्हरी चँनेल मधला हिंस्त्र पशू, मुक्या सावजावर. मग रितसर 100 (हो, अजूनपावेतो शंभरच, पाचशे व्हायला वेळ आहे!) रूपयांची, (शंभर म्हणजे कौरव), पावती फाडल्यावर सूटका. (ह्ये पोलिसमामा, हायवेला नाय बघीतले म्या कधी दूचाक्याच्या पाठी; तिथं ट्रकटेंम्पोकार वर "लक्ष्य" ठेवाव लागत भौ!!)



आर्यनची शाळा माझ्या घराजवळच. त्या इनमिन तीन मिनिटांच्या प्रवासासाठी आपण हेल्मेट चढवतो बाबा; उगी दहावास च्या स्पीड मंदी अपघात झाला तर? कायदापण आहेच की! आम्ही सुजाण कायदेपालक सार्वभौम नागरिक आहो. आत्ता एव्हढ्या सक्काळी हमखास दोन तरी दूचाक्या दृष्टीस पडतातच ओ, विना हेल्मेट वाले लेक्स असतात त्यावर. पण ते असतात पोलिस! आता त्यांना कसकाय बोलणार म्या बापुडा. गपगुमान समजाव की ते असणार गस्तीवर; व गस्तीवर असताना त्यांना त्रासबिस होत असावा, ना?! बरं आणि फुका सरकारी कामात हस्तक्षेप वगैरे कलमं लागायची. आपण तर लईच भित्रे बघा. असो.



कायदे लई कडक असत्याती. व सगळ्यास्नी शेम.



मिनरल पाणी बाँटल वाला, सोस्योकोला वाला दूकानदार दोन तीन रूपडे जास्त आकारतो म्हणता, एमआरपी पेक्षा?

अहो ठंड करायचे पैसे लावतो तो; उगाच आपलं काहीतरी बोलायचं!



मुंबई पूणे एक्सप्रेस वे वर माल, साँरी माँल, फूड माँल, हाईत. तिथले रेट बघून चक्कर यायचीच बाकी असते.

अहो, कायदेशीर टेंन्डर बिंडर काढून जागा अँलाँट केल्याती. वडापावची, पावभाजीची, भूर्जीमटणाची, चहाटपरीची गाडी लावायला लागले तिथं, तर कसं चालायचं? उगाच आपलं काहीबाही बरळायचं!



मी साधामाणूस. कार चालू केली, की सीट बेल्ट करकचून घेतो. कायदा आहेच, आपल्या सेफ्टी साठी उपयुक्त. लालपिवळी टँक्सी, व इतर हलक्या वाहनांना, तसेच अवजड वाहनचालकांसाठी हा नियम नाहीये.

हे वाहनचालक आपापलं बघून घेतील, नव्हे बघतातच रे बाबा. उगाचच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला!



चालत्या उपनगरी रेल्वे गाडीच्या फूटबोर्ड वर उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. (किड्यामुंगीला आत शिरायला, घुसायला पण जागा नसते, हे सत्य आहे) कायदा म्हणजे कायदा, म्हणजे नियम!

आता बो(ब)ला!



वजनकाट्याला खाली जास्त वजन लोहचुंबकाने चिकटवतात, असं म्हणतात. एका बाजूचं (वस्तू तोलण्याची बाजू) पारडं थोडं स नगण्य लांब असतं, असं म्हणतात. ज्यायोगे रास्त वजनाची वस्तू मिळत नाही, फसगत होते, असं म्हणतात.

कँलिब्रेशन का कायते असकाही नसत ओ. उगाचच नको त्या (कु)शंका.



चारचाकी शिकाऊ वाहनापाठी तीस (30) फूट अंतर सोडा, असा नियम आहे; अशा वेळी कोणी हा नियम पाळला, तर, ट्रँफीक ची काय अवस्था होईल; असले खुळचट प्रश्न न विचारलेले बरे.



भर मार्केट मध्ये, अनधिकृत भाजी विकणारे, इतर फेरीवाले, अन्न शिजवायला वगैरे बंदी आहे की नाही. मग आमची कार्यतत्पर म्युनिसिपालटी अतिक्रमण विरोधी गाड्या बिड्या उभ्या करते भर गुन्हा ठिकाणी! सगळं चिडीचाप बंद, सामान उचलाउचली इत्यादि नियमानुसार कारवाही. पन ह्योसमदं दिवसा (च) का? संध्याकाळी का नाही, प्रत्यक्ष मेन टाईमाला? सेकंड शिफ्ट ठेवा की उलटीपालटी वालो. पण नाही, सगळं सोयी(!)नुसार. बरं, अहो, फकस्त समदे कोपरे मोकळे करा - ठेवा ओ, टर्निंग्ज, जंक्शन वगैरे; दूवा मिळेल ओ.

कसल्या अव्वाच्यासव्वा अपेक्षामागण्या? रोटीरोजी वर पाय, टाच? निषेध.



अशले अनेक किस्सेप्रसंग घटनादृष्ये आहेत, दाखवता येतील. आपले बर्रेचषे कायदे ब्रिटीशकालीन पूलांप्रमाणे आहेत. [ब्रिटीशांचे पत्र यायची वाट बघावी लागणार बहुतेक, की ह्ये पूल (नियम) आऊटडेटेड झालेती]; रिव्हू करा, नवीन करा, काळानुरूप बदलसुसंगत करा!



जवळपास एकशे पंचवीस वर्षांपूर्वी, 1890 सालीच, म्हणजे ब्रिटीशकालातच, बरं का; हरि नारायण आपटे म्हणाले होते,



पण लक्षात कोण घेतो...

---

Milind Kale, 9th August 2016

Monday, August 8, 2016

Er Rational musings #657

Er Rational musings #657



Introspect with retrospect

over

Stagnant n dormant

of

Matter over mind



Standstill a puddle

via

Tops n turve

with

Verve n serve



Ponder beyond yonder

about

Pride not prejudice

and

Sense with sensibility



Think n wink

before

Sway n give way

after

Plan a near future



Alas or alias

do

Jump n hop

by

Skipping an alibi

---

Milind Kale, 8th August 2016

Saturday, August 6, 2016

Er Rational musings #656

Er rational musings #656



ऑलिंपिक गेम्सना फ्रेंन्डशिप गेम्सपण म्हणतात.



"एक्सलन्स, फ्रेंन्डशिप व रिस्पेक्ट" या तीन कोअर व्हँल्यूज आहेत ऑलिंपिक च्या.



~ ऑलिंपिक सिम्बॉल, म्हणजे ऑलिंपिक रींग्ज. पाच खंड, आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप व ओशियानिया, आणि यांतील एकता, अखंडता.

~ ही कडी पाच निराळ्या रंगाची, निळा, पिवळा, काळी, हिरवा, व लाल, (कारण जगातील प्रत्येक देशाच्या ध्वजाच्या रंगात यापैकी एखादातरी रंग असतेा आहे, म्हणून!)

~ ऑलिंपिक चं बोधवाक्य आहे, "फास्टर, हायर, स्ट्रॉन्गर."

~ ऑलिंपिक यजमानाची संस्कृती दर्शक म्हणजे ऑलिंपिक मँस्कॉट.



आज मैत्र दिवस, तोही जागतिक!



मैत्री म्हणजेच समजूतदारपणा व आदर व समानता. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वय, भाषा, धर्म, प्रांत, जात, वंश, लिंग, इत्यांदितील विषमता इसमें मा़यने नहीं रखती! As Is Where Is basis. एकदाका यार जूळली, की झांल!



माझे पिताश्री चेष्टेने मला माझ्या मित्र परिवारावरनं चिडवायचे, मधनंमधनं. म्हणायचे, की ऑलिंपिक रिंगेप्रमाणे तुझं मित्रप्रकरण आहे. म्हणजे फ्रेंन्ड सर्कल ओ. शाळेचा ग्रूप, कॉलेजचा ग्रूप, ऑफिसचा ग्रूप, वगैरे वगैरे. एकाततिसरा, पाचव्यात दूसरा इंटरवाईन्ड; सगळे एकमेकांना ओळखतात; मग एकत्र घाट, बरेचदा; असो.



 अनेक ठिकाणी, अनेक वेळा, अनेक प्रकारचे, जोडले गेलेले माझे नाते, तुम्हा सर्वांशी. परंतु, किती जणांशी बाह्यविषमता असावी, दोघांत; उदाहरणार्थ, माझा व अक्कलहुशारीचा काहीही अर्थार्थी काहीही दूरान्वयेही, संबंध नसताना देखील, अँकँडेमिकली हुशारस्ट्रॉंग लोक्स, माझे जिवाभावाचे मित्र झालेत! त्यामूळे, या आपल्या मैत्रीला ना काहीही परिमाण, ना उकार, ना आकार. ऐसपैस आहे एकदम. परंतु, हे वेल्डींन्ग तरी किती मजबूत असावं? आपण प्रत्यक्ष वा इव्हन सोशल नेटवर्क वर देखील नाही भेटलो, बोललो, थोबाड नाही बघीतल, तरी काहीच फरक पडत नाही.



(कालच मी माझ्या एका जून्या मित्राशी बोललो फोनवर, जवळपास सहासात वर्षंनी. माझ्या दूसऱ्याच एका मित्राच्या मुलाच्या नोकरी बद्दल. सुध्या? मिल्या बोलतोय - मिलिंद काळे, इथनं सुरूवात, ते अगदी कालतेरवाच भेटल्याच्या आविर्भावात गोष्टी टप्पागप्पा सुरूवात, ते तमुकअमुक ची खुशाली, ते माझ्या मित्राच्या मुलाची नोकरी - पक्की झाली, इथपावेतो, बोललो.)



कामाशिवाय, कामाकरता, कायमचं 'टच' मध्ये असणं ही भावनाच पूरेशी!! हिच ती मैत्री.



"व्हर्च्यूअल ऑलिंपिक्स"



दोस्तांनो, तुम्हा सर्वांना या जागतिक फ्रेंन्डशिप डे निमित्ताने शुभेच्छा. अशीच ही दोस्ती बहरत फूलत जावो. गडद गहरी होती जावो.



हँप्पी फ्रेंन्डशिप डे...

---

Milind Kale, 7th August 2016

Er Rational musings #655

Er Rational musings #655



वडा पाव पेक्षा मी भजीचा भोक्ता आहे. मग ती कुठलीही का असेना. याउलट आमच्या अहो, म्हणजे मायाबाई; गिव्हन अ चाँईस, वडापावाच्या जास्त चाहत्या.



कांदा (खेकडा) भजी, बटाटा भजी, मूंन्ग भजी, मेथी भजी, पालक भजी, मिरची भजी, ही नावं - आठवणच तोंडाला पाणी सुटवणारी आहे. दादर, रानडे रोडवर आमचा एक फेवरीट भजीवाला होता. सगळ्या प्रकारची भजी कायम तयार, गरम गरम, व लगेचच संपायची पण. लगेचच दूसरा घाणा त्याच्या कढईत चालू.



भजीपाव खायचं एक स्कील आहे, विशिष्ट. कारण पाच, आठनऊ भजी अक्षरशः कोंबलेली असते पावात. ती न सांडता खाणं हे आवडीने येतं. बरं, प्रत्येक घासात पावाचा पोर्शन, भजीचा तुकडा, चटण्यांचा स्पर्श, हे सगळ झाल, जमलं, तर मजा. चक्क दोन हातात भजी पाव पकडून, मोठ्ठा आs करून, गालफडात कोंबणं; वर हा बकाणा, चावून चुराडा करत चघळणं, व फस्त करणं, ही एक कला आहे.



ओली गोड व तिखट चटणी, लसणाची लाल चटणी, हिरवी मिरची, यांच्या जोडीने अवीट गोडी प्राप्त होते या भजीला. नारळाची पांढरी वा हिरवी ओली चटणी म्हणजेपण चवीष्टगोडी.



माझ्या मित्राची आई (राजूच्या आई) अत्तिशय सुरेख भजी करायच्या. आमच्याकडे वा राजूच्या घरी, मधनंअधनं हा भजी पुराणाचा कार्यक्रम व्हायचा. राजूच्या आई, ताट भरभरून भजी आणताहेत आतून, तीनचार प्रकारच्या, व आम्ही बाहेर, हाँल मध्ये मांडा ठोकून, हापसतोय; हे चित्र वारंवार दिसायचं असायचं.



आमच्या अहो अत्यंत चवाळ रसाळ भजी करतात, विदीन नो टाईम. तीच परंपरा पूढे चालू. एखादरात्र फक्त व फक्त भजी (च भजी!) हापसा, ताटं (!) भरभरून.



खमंग, कुरकुरीत, चटपटीत...लाळ...

---

Milind Kale, 6th August 2016

Er Rational musings #654

Er Rational musings #654



~ रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?

~ काय गार्डन मध्ये फिरतोय / फिरतीये का?



चडफडत (मनातल्या मनात, वा फारतर ओठातल्या गालात पुटपुटत) तीन शेलक्या शिव्या हासडायच्या, हे आता नित्याचेच. वाहनधारक - वाहनचालकांचे. मोस्टली आपापल्या सिटीतल्या सिटीत - आतल्या रस्त्यांवर गाड्या - मग ती दूचाकी असो वा चारचाकी, हाकताना!



हल्ली हे फारच वाढलय. बेदरकारपणा. चालणाऱ्यांचा, आय मीन! यात वृध्दआबाल, सू(!)शिक्षित नशिक्षित, थोरगरीब, पुरूष स्त्री, सग्गळे आले. पूर्वी व आताही, वयोवृध्द रस्ता क्राँस करताना आपल्या छाती समोरसरळ काटकोनात हात वा काठी पाँईंट करून, चक्क तिकडेइकडे ढूंकूनही न बघता सरळसमोर चालू पडायचे, गाडीवाहक व इतर बघून घेतील, या आविर्भावात; हे कितीही फनी वाटलंदिसलं तरी समजू शकतो आपण, यामागील भावना, पण आता..!?



निर्वकार चेहरा, बेफिकीर हावभाव, कानांत मूझिकबिझीक ऐकायला दोन गुंड (हँन्डस् फ्री!!), व गारेगार शून्यात नजर, आपल्याच भावतंद्रीविश्वात, आणि प्रचंड गूर्मी, ह्यातली एक वा अधिक मूद्रालोप, अशी ही यांची ओळख, मी केलीये व्याख्या!



शिवाय आता हे असले पादचारी, वाहनांसमोर "थांबा!!" असा हात दाखवून, कूर्मगतीने क्राँस करायला लागलेत. व्वा, छ्छान! गाडीसमोरून जाताना, जरा पटापट पाय उचलून गती वाढवावी की नाही? पण नाही! माठ.



रहदारी प्रचंड वाढलीये, मान्य. पदपथांवर आक्रमण, मान्य. अनधिकृत फेरीवाले, खाऊवाले, दूकान एक्स्टेंन्शन वाले, गर्दूल्ले, भिकारी, चहाटपरी वाले इ चा विळखा, मान्य. अनधिकृत पार्कींग, मान्य. रस्तेच खड्यात, शिल्लकच नाहीत, तर तर तर, सगळ मान्य! पण म्हणून ही बेफिकीरी, मस्तवाल वृत्ती, व माज, कसकाय समर्थनीय आहे? वाहनचालकांची काय चूक आहे बाबा, त्यांनी काय पाप केलय?



एक त्रस्त सूजाण व 1984 मधलं ड्रायव्हींग लायसन्स असलेला, now irritated वाहन स्वार...

---

Milind Kale, 6th August 2016

Friday, August 5, 2016

Er Rational musings #654

Er Rational musings #654



~ रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?

~ काय गार्डन मध्ये फिरतोय / फिरतीये का?



चडफडत (मनातल्या मनात, वा फारतर ओठातल्या गालात पुटपुटत) तीन शेलक्या शिव्या हासडायच्या, हे आता नित्याचेच. वाहनधारक - वाहनचालकांचे. मोस्टली आपापल्या सिटीतल्या सिटीत - आतल्या रस्त्यांवर गाड्या - मग ती दूचाकी असो वा चारचाकी, हाकताना!



हल्ली हे फारच वाढलय. बेदरकारपणा. चालणाऱ्यांचा, आय मीन! यात वृध्दआबाल, सू(!)शिक्षित नशिक्षित, थोरगरीब, पुरूष स्त्री, सग्गळे आले. पूर्वी व आताही, वयोवृध्द रस्ता क्राँस करताना आपल्या छाती समोरसरळ काटकोनात हात वा काठी पाँईंट करून, चक्क तिकडेइकडे ढूंकूनही न बघता सरळसमोर चालू पडायचे, गाडीवाहक व इतर बघून घेतील, या आविर्भावात; हे कितीही फनी वाटलंदिसलं तरी समजू शकतो आपण, यामागील भावना, पण आता..!?



निर्वकार चेहरा, बेफिकीर हावभाव, कानांत मूझिकबिझीक ऐकायला दोन गुंड (हँन्डस् फ्री!!), व गारेगार शून्यात नजर, आपल्याच भावतंद्रीविश्वात, आणि प्रचंड गूर्मी, ह्यातली एक वा अधिक मूद्रालोप, अशी ही यांची ओळख, मी केलीये व्याख्या!



शिवाय आता हे असले पादचारी, वाहनांसमोर "थांबा!!" असा हात दाखवून, कूर्मगतीने क्राँस करायला लागलेत. व्वा, छ्छान! गाडीसमोरून जाताना, जरा पटापट पाय उचलून गती वाढवावी की नाही? पण नाही! माठ.



रहदारी प्रचंड वाढलीये, मान्य. पदपथांवर आक्रमण, मान्य. अनधिकृत फेरीवाले, खाऊवाले, दूकान एक्स्टेंन्शन वाले, गर्दूल्ले, भिकारी, चहाटपरी वाले इ चा विळखा, मान्य. अनधिकृत पार्कींग, मान्य. रस्तेच खड्यात, शिल्लकच नाहीत, तर तर तर, सगळ मान्य! पण म्हणून ही बेफिकीरी, मस्तवाल वृत्ती, व माज, कसकाय समर्थनीय आहे? वाहनचालकांची काय चूक आहे बाबा, त्यांनी काय पाप केलय?



एक त्रस्त सूजाण व 1984 मधलं ड्रायव्हींग लायसन्स असलेला, now irritated वाहन स्वार...

---

Milind Kale, 6th August 2016

Er Rational musings #653

Er Rational musings #653



Hand holding, grooming, nurturing. Helping, assisting, aiding. Facilitating, encouraging, boosting.



Nobody is a perfect 10. On a scale of 1 to 10, maximum score realistically could be a 9 point something and can't be a Ten, actually. No metal on earth is 100% pure; it can be 99 point 9% pure (sic).



But, to reach n attain the maximum, every living soul, needs someone, something, some entity, all the time, to sail through the frequency flow. Well, most of us! Visible or invisible. Known or unknown. Front end or back end. In some form or other.



It's like a spark plug. An ignition, in most of the situations. And it produces results. A movement. A thrust. A propellant.



If the timing is right, with this friend, philosopher and guide, on your side, you can go places!



Heavy dose.



#Philosophical Saturday...

---

Milind Kale, 6th August 2016

Er Rational musings #652

Er Rational musings #652



शुभास्ते सन्तु पन्थान...



मला या वेळेस प्रचंड उत्सुकतावजा होपस् आहेत. रिओ आँलिंम्पिक्स मधून आपण एक डझनभर पदकं घेऊन येण्याच्या!



आत्तापर्यंतच सर्वात मोठ पथक गेलय, व भाग घेतय; जवळपास 110 खेळाडू निरनिराळ्या खेळांमध्ये जगाशी स्पर्धा करतील.



अपेक्षावान खेळाडू :-



दिपीका कुमारी (तिरंदाजी), विकास गौडा (थाळी फेक), ललिता बाबर (3000 मी स्टीपलचेस), कविता राऊत व खेताराम (मँरेथाँन), सायना नेहवाल - पी व्ही सिंधू - किदंम्बी श्रीकांत - ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा (बँडमिंन्टन एकेरी, दूहेरी व टीम चँम्पियनशिप), दीपा कर्माकर (जिम्नँस्टिक्स), हाँकी टीम चँम्पियनशिप, गगन नारंग व अभिनव बिंद्रा (नेमबाजी), अचांथा शरथ कमाल (टेबल टेनिस), लिएंन्डर पेस - रोहन बोपन्ना - सानिया मिर्झा - प्रार्थना ठोंम्बरे (टेनिस, मेन्स व विमेन्स व मिक्स्ड डबल्स), नरसिंन्ग यादव - योगेश्वर दत्त - संन्दीप तोमर (कुस्ती).



याव्यतिरिक्त जे जे जो कोणी पदक मिळवेल, तो बोनस. पण माझ्या खऱ्या अपेक्षाआशा एकवटल्याहेत त्या वर उल्लेखलेल्या खेळाडूंवर!!



तयारी तर सगळ्यांनीच जोरदार केलीये. जीवतोड मेहनत करताहेतच. खेळप्रतिष्ठा पणाला लावून हे तरबेज जिगरबाज लढतील, वरचढ प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर देतील, आपल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करतील व यश संपादन करतील, याबद्दल अनेकानेक मन:पूर्वक शूभेच्छा.



इंडिया ss इंडिया...



गणपती बाप्पा मोरयाsss

---

Milind Kale, 4th August 2016

Thursday, August 4, 2016

Er Rational musings #650

Er Rational musings #650



ऐश्वर्य, पैसा, संपत्ती, वैभव, यांना नावं ठेवण्याची काही लोकांना सवयआवड असते. तशी फँंशनच झाली आहे.



जगायला पैसा लागतोच ना?



~ "पैसे छापणं"...

हा वाकप्रचार (सुविचार) तसा नवीन आहे. यात कमावणं, खाणं, बनवणं, मिळवणं, हे सर्व समाविष्ट आहे. अँक्च्यूअली बख्खळ संपत्ती हा याचा सरळसोट अर्थ आहे. मिंन्टींग मनी (टांकसाळ) चा हा खरा अर्थ.



~ पैसे झाडावर लागत नाहीत...

हा मात्र तसा जूनाच वाकप्रचार  पैशांच झाड.



~ Money is the root of all evil...

असं वारंवार सागितल जातं. बऱ्याचअंशी खरय.



~ चार पैसे काय कमवायला लागला...

पैसा माणसाची नियत बदलतो. म्हणतात. अहो, माणूसच बदलतो ना?!



~ पैसा म्हणजे सर्वस्व आहे का...

नक्कीच नाही; कोणी दावा ही करत नाही.



~ सुख पैशाने नाही विकत घेता येत, अशी म्हणण्याची फँशन आहे. अरे पण, आता तर सगळ्याच बऱ्याच गोष्टी पैशाने नाही का विकत घेता येतात? इंन्क्ल्यूडिंग मानवी अवयव? आणि हेच तर सुख आहे ना? किंबहुना ही भावनाच महत्वाची नाही का?



~ फार आवडती उद्घोषणा (!); काय करायचाय एव्हढा पैसा, मेल्यानंतर काय वर घेऊन जाणार आहे का? अरे, धीस इज टू मच. इटस् प्लेन अँन्ड सिंम्पल.



मेल्यानंतर बेटर हाफ, बाळंमुलं, असतातच ना? इन्व्हेस्टमेंन्ट, बँन्क बँलन्स, स्थावर मालमत्ता, दागिनेदाग, इत्यादि अनंत 'भौतिक' गोष्टी रहातातच ना? पूढच्या वारसदारांना? आणि त्यांच सूख म्हणजेज आपलच नाहीका?



उगाच च पैशाला नावं ठेवायची. आपापली बुध्दी, ज्ञान, कष्ट, हुशारी, अक्कलशक्ती, चातुर्य आदी गुणांच कन्व्हर्जन इनटू मेहनताना, मोबदला, रास्त किंमत...पैसा!



...इनसोफार अँज द मनी इज अर्नड् लेजीटिमेटली, लीगली व अबोव्हबोर्ड, नथींग राँन्ग. इटस् अ बार्टर, अ ट्रेड, वेल्थ.



Health, Wealth, Happiness and Success...आपण विश करतोच की. Wealth शिवाय Health, Happiness व Success नाही का? असं अजिबात नाहीये. प्रचंड उदाहरणं आहेत, पैशाशिवायही "अचीव्ह" केल्याची. सगळ सापेक्ष व पराकोटीचं व्यक्तिगत आहे हे. सरधोपटपणे सगळ्यांना धोपटणं काही बरोबर नाही.



आणि फुका नाकं मुरडण्यात तर काहीच हशील नाही...

---

Milind Kale, 4th August 2016

Tuesday, August 2, 2016

Er Rational musings #648

Er rational musings #648



पुलं नी अनेक प्रकारचा साहित्यठेवाच आपल्या हातावर सोपवलाय. व्यक्ती आणि वल्ली हे त्यातलच एक अजरामर पुष्प.



नारायण, हरितात्या, नानू परीट, सखाराम गटणे, नंदा प्रधान, जनार्दन (जनू), नारो शिंगणापूरकर (बोलट), भय्या नागपूरकर, नाथा कामत, दोन्ही वस्ताद (टिल्यावस्ताद व ज्योतिबावस्ताद), गजा खोत, अण्णा वडगावकर, परोपकारी गंपू, चितळे मास्तर, लखू रिसबूड, बापू काणे, ते चौकोनी कुटुंब (माधवराव, मालतीबाई, मधू व मंजिरी), तो (एक दृश्य अदृश्य समष्टी!), हंड्रेड परसेंट पेस्तनकाका, बबडू, अंतू बर्वा.



या व्यक्तरेखा म्हणजे सार आहे, भांडार आहे, सम टोटल आहे, विषम वजाबाकी आहे, श्वर नश्वर सृष्टी आहे, इरसाल नमुने आहेत, नोंदी निरीक्षणं स्वभाव वैशिष्ट्य आहेत, भाष्य आहे, चिमटे नर्म विनोद आहेत, ठसठशीत पणा आहे, कोपरखळ्या आहेत, आणि संवाद पण आहे.



पुलं च्या वल्या ह्या थोड्या चांगुलपणाकडे झुकलेल्या आहेत. चमत्कारिक, बालिश, प्रत्येकात वाईट च बघणाऱ्या, तिरसट च वागणाऱ्या, तुसड्या, अहंदर्पी, तोंडावर छान पण अनुउपस्थित माणसांबद्दल कायमच उणे बोलणाऱ्या, मला (च) सग्गळ समजत मला सग्गळ कळत, अशा सर्वद़्यानी व्यक्ती, पुलं ना भेटल्या नसतील का?! अशा विद्वान माणसांबद्दल त्यांनी काय चाबूक लिहीलं असतं ना? परंतु त्यांच्या स्वभावातच 'ते' नव्हतं म्हणाना!



मला तर वाटतं की त्यांनी सत्कारच केला असता!



'या' अतिहुशार, अतीशहाण्या महाभागांचा नव्हे, तर या नतद्रष्टांबरोबर संसार 'करणाऱ्या' यांच्या अर्धांगिनींचा...

---

Milind Kale, 3rd August 2016

Er Rational musings #647

Er rational musings #647



व्वॉव, काय छान साडी कँरी करते ना ती?!



हे ऐकल्या बरोबर मान फिरवली मी! मनात म्हणलं की हे म्हणजे जगातल एक आश्चर्यच म्हणावं लागेल. साडीला कँरी करायचं, म्हणजे उचलायच? वेटलिफ्टर आहे की काय? कँरी करते म्हणे! थोडा लेटच प्रकाश पडला; अर्थ असा, की ग्रेसफूल का कायते, सुंदरसुरेखसुडौल वगैरे दिसणं, शोभणं वगैरे वगैरे. असो. "कँरी करणं!"



लुगडं, पातळ, व चोळी, पोलकं.



अँक्च्यूअली, साडी घालून (सॉरी, नेसून) झाल्यावर, आरशासमोर सरळ समोर नव्हे, तर आडवं (साईडवेज्) उभे राहून, निऱ्या बिऱ्या ठीकठाक करतासरता, बायका जे पाय दुमडत असतात, दोन्ही गुडघ्यांपर्यंत वाकवत बिकवत, साडीचा घोळ नेटकत(!), पदर जो चाचपत असतात, (हा पदर पण असा परफेक्टली गुडघ्यांपर्यंत आला पाहीजे बर का! किंवा हातावर उपरणं घेतल्याबरहुकूम पेशवाई थाटात ठेवला की काठ (!) अस्सला मस्स्त दिसला पाहीजे कीनी!!), ते; आणि ब्लाऊज खालील उघडी पाठ झाकण्याचा पदराच टोक खेचून खेचत अडकवत जो केविलवाणा व असफल प्रयत्न करतात, ते; या सगळ्याची सम टोटल प्रचंड म्हणजे प्रचंडच "ग्रेसफूल" असते यार! हे खरखरं कँरी करणं!!



मँचींग ब्लाऊज हे एक निराळच प्रकरण आहे! एकदम कॉन्ट्रास्ट वा साडीच्या काठाच्या रंगाचा वा साडीवरच्या प्रिंट च्या डिझाईनरंगाचा, व अगदीच काय नाय सापडलं तर सफेद वा काळ्या रंगाचा (जसं काळी पँन्ट कोणत्याही शर्टासोबतीने असते तसा) ब्लाऊज, वगैरे वगैरे, ही एक झलक!



कँरी!



१९७० च्या सुमारास 'Carry On' सिनेमांची सिरीज आली होती; त्यातलच एक, विथ रिस्पेक्ट टू 'कँरी ऑन लव्हींग' सारखं



"कँरी ऑन साडी!"...

---

Milind Kale,2nd August 2016

Er Rational musings #646

Er Rational musings #646



प्रिन्सेस स्ट्रीट, अब्दुल रहमान स्ट्रीट, नागदेवी स्ट्रीट, लोहार चाळ, एडवर्ड सिनेमा, गोकुळदास तेजपालदास हाँस्पीटल, पिकेट रोड, ते एकली (१ ली) भटवाडी (पहिली ला आम्ही एकली म्हणायचो), व्हाया चंदनवाडी चिराबाझार, ठाकुरद्वार झावबा वाडी, धुतपापेश्वर, गाय वाडी (एकदा बीईएसटी बस मधनं इथे उतरताना मी पुढच्या उतरणाऱ्यांना उद्देशून म्हणालोवतो की अहो गायवाडी वाले बैल, उतरा - हल्लके हास्याचे फवारे उडले होते, कंन्डक्टर सहित!), ते एक्स्टेंन्डेड परिसर आँपेरा हाऊस पर्यंत, व हरकिसनदास हाँस्पीटल पर्यंत, व फडके गणपती मंदीर - सी पी टँन्क पर्यंत ते मेट्रोपासनच वर्तुळ, हा सग्गळा एरीया, म्हणजे अद्भूत रसायन.



माँमेडियन्स, मराठी कोंन्कणी, पारशी, मारवाडी, मराठी कायस्थ प्रभू, गुजराती, मराठी पाठारे प्रभू, राजस्थानी, मराठी भटं, बोहरी मुसलमान, ख्रिश्चन, वगैरे निरनिराळ्या धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे अस्सल मुंबईकर एकवटलेली, घट्ट सरमिसळलेली वस्ती. प्रत्येकाचे व्यवसाय, धंदे, प्रार्थनास्थळं, रहात्या जागा, शाळा, इत्यादिं बरोबर माझा वीक पाँईंट मौजूद. हाँटेलं, रेस्तराँ, खानावळी, टपऱ्या, खाऊ गल्ल्या, अहाहाहा.



गुलशनेइराण असो, वा क्षुधा शांती (मागच्याच महिन्यात मालक बदलला, नाव बदललं, आता ॐ शांती झालं, बाकी, झुणका आमटी पोळ्या (!) आहे तसंच श्श्या...), व्हाँईस आँफ एशिया असो, वा ललित, वा प्रिस्सीला, वा ताराबागेतला भेळवाला, वा दरयश बेकरी, वा.... या असंख्य चवींनी व रसास्वादाने माझी जीभ (ते जठर!) तृप्त झालीये, अजूनही होते (वेळ मिळेल तेव्हा)



हा केवळ सहा नऊ स्क्वेअर किलोमीटर चा टापू, पण अठरापगड जातीधर्मांचा ब्लेंन्डेस्ट, टाँपेस्ट, बेस्टेस्ट, व टेस्टेस्ट पण!



आज दूपारीच झुणक्याची राईस प्लेट हापसून आलोय. अर्थातच दोन्ही मोबाईल स्विच आँफ करून, शर्टाच्या बाह्या दुमडून, मौनव्रतात, गोविंद म्हणत...

---

Milind Kale, 2nd August 2016

Monday, August 1, 2016

Er Rational musings #645

Er Rational musings #645



"Write something on the board"



एका मिडल मँनेजमेंटच्या पदासाठी इंटरव्ह्यूज चालू होते. जर्रा बऱ्यापैकी सिनियर, पण, लोअर मँनेजमेंटची लोकं, रूमच्या बाहेर, एका काचेच्या मिटींग रूम मध्ये बसली होती. चहा/काँफी, बिस्कीटे सर्व्हिस चालूच होती. एकेकजण इंटरव्ह्यू रूम मध्ये जायचा, सात नऊ मिनिटांनी बाहेर.

आतमध्ये एक काँन्फरन्स लंबगोलाकार टेबल, सभोवती खूर्च्या, एक व्हाईट बोर्ड, मार्कर पेन, मिनरल पाण्याच्या छोट्या बाटल्या इत्यादि हजर जागच्याजागी, पण मुलाखतकार एकच.

आल्याआल्या हास्तांदोलन, ग्रिटींग्ज, एक्सचेंज आँफ प्लेजंट्रीज इत्यादि. मग कँन्डिडेट स्थानापन्न झाल्यावर, पहिले जुजबी नाव गाव पत्ता वगैरे. मग पुढची रिक्वेस्ट वजा आज्ञा "Write something on the board"!



एकापाठोपाठ एकजणं काहीतरी लिहायचे फळ्यावर, मार्कर नी. काहीबाही, म्हणजे अगदी हँलो, हाऊ आर यू, ते गूड माँर्निंग सर, ते अगदी काहीही.



एकानेच लिहीलं: "SOMETHING"



हम्मम्मम्म. तो (च) सिलेक्ट झाला, असलं फिल्मी काही झालं नाही, पण त्याला वेटेज मात्र मिळालं, थोडसं ऊजवेपण.

सिलेक्शन अर्थातच सर्व अंगांनी प्रावीण्य व अँप्रोच, व इतर बरेच स्किल सेटस् बघून होतं, इथेही झालं असेल.



"Write something on the board" अशी सूचना जेव्हा बाँस करतो, तेव्हा 'समथिंग' म्हणजे काहीही व्हेग नव्हे, हे कळलेच पाहीजे, असा याचा अर्थ! (मिडल मँनेजमेंटच्या लोक्स ना)



मला वाटते, की, विधाता जेव्हा आपल्याला असा ढकलतो या होरायझनलेस इंटरव्ह्यू रूम मध्ये, तेव्हा "त्या"ला अभिप्रेत असलेलं 'समथिंग' आपण रेखाटतो, का कायपण रँन्डमली उपद्व्याप करतो? सिलेक्शन अवघड आहे!



विधीलिखित...

---

Milind Kale, 1st August 2016