Er Rational musings #456
बोहनी झाली.
दिवसाची सुरूवात. धंद्याची सुरूवात प्रथम पूर्ण कँशने व पूर्ण किंमतीने (नो डिस्काउंट) झाली की बोहनी झाली अस म्हणायची पध्दत आहे आपल्याकडे.
मग ते पैसे हातात घेवून नमस्कार चमत्कार करण्याची व पूढील, सुरू झालेल्या, व उर्वरीत दिवसात चांगला धंदा व्हावा, म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करण्याची पण पध्दत आहे. हाँटेल वाले, चहा टपरी वाले वगैरे लोक्स पहिला चहाचा ग्लास (अलाँगविथ पाण्याचा ग्लास) दूकानाबाहेर जमिनीवर उपडा करतात! (साँरी, अर्पण करतात). आता यात किती कप चहा व किती लिटर पाणी (वाया) जात असावं, याचा नुसता अंदाज करायलाही मी कचरतोय. असो.
आपापल्या श्रध्दा, दूसरं काय!
तर, बोहनी हा चांगला शुभसंकेत मानला गेलाय. लक्ष्मी चे आगमन. पैशांची आवक.
भंगारवाला वा जूनं सामान विकत घेणाऱ्याची बोहनी पैसे देवून होते. पैशाची जावक!
रोकडा पैसे 'देवून' बोहनी करणारा भंगारवाला हे एकच उदाहरण असावं...
---
मिलिंद काळे, 30th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment