Saturday, March 26, 2016

Er Rational musings #450

Er Rational musings #450



जून्या सोसायट्यांच्या पुनर्विकासात बऱ्याच लोक्स नी, सो काँल्ड बिल्डर्स नी, चांगलेच हात धूवून घेतलेत आतापावेतो.



बिल्डर, प्रमोटर, डेव्हलपर ही एक निराळीच जमात आहे. एखाद्या अस्वला प्रमाणे. कितीही ओळखीचा, चांगला असला तरी तो थोडेतरी खाजवणारच, थोड्यातरी गुदगुल्या करूनच जाणार.



मोडस आँपरेंडी आत्तापर्यंत एकदम सिंपल होती. इधर का माल उधर, उधर का माल इधर. एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट्स घ्यायची, ओव्हर ट्रेडिंग करायच. बूकींग (!) च्या नावाखाली इन्व्हेस्टर्स (!) कडून पैसे घ्यायचे. प्लँन सँक्शन नाही, परमिशन्स नाहीत, नवनवीन पाँलिसीज ना तोंड कस घ्यायचं काही ठरलेलं नाही, कशाचा कशाला पत्ता नाही! बूकींग (!) रेटस् आपोआपच वाढतात. पैसा इकडून तिकडे, कधी तिकडून आणखी तिकडे, गोल गोल, ब्रोकर्स ते बिल्डर्स, फिरत राहतो. पण या फिरवा फिरवीत, या चेन मध्ये काही अडकल तर? व्याज वाढतं. ओव्हर हेड्स आहेतच. देणी वाढतात. देणेकरी पाठी लागतात. एकदम मोठ्ठी अमाऊंट जरी आली तरी ती चुटकीसरशी संपते बँकलाँग क्लियर करता करता. दूष्ट चक्र. चक्रव्यूह च तो. इथे सोसायटीवाले सगळे हवालदील, जीव टांगणीला. काय हे, कशासाठी? कसला हा अट्टाहास, का वेडेपणा, का शुध्द मूर्खपणा?!



नवीन नियमावली येऊ घातलीये, नव्हे आलीये. अशाच चिंधीगिरीला चाप लावण्यासाठी.



अनाहूत सल्ला:



अरे बाबांनो, जमेल तेव्हढेच काम घ्या, ती पूर्ण करा, पूढे चला, नाव कमवा (पैसा ही बनवा), कोणी नाही म्हटलय का? एकात एक तंगड्यात अडकू नका, पटपट मोकळे व्हा. झेपत नसताना कशाला सात नऊ ठिकाणी हात घालताय? भीकेला लागणार आहात का? मरायला टेकणार आहात का? नाही ना? मग? कसली ही नशा, हा चसका? दूसऱ्यांना कशाला त्रास, त्यांची काहीच चूक नसताना?



लग्न पहावं करून, आणि घर पहावं बांधून, हे उगाच (च) नाही म्हणत...

---

मिलिंद काळे, 26th March 2016

No comments:

Post a Comment