Er Rational musings #433
माझी शाळा. My alma mater.
चाळीस वर्षांपूर्वीची शैक्षणिक सहल! मायन्यूट आयटीनररी!
पहाटे साडेपाच सहाला उठणे (!) व दूपारी जेवणानंतर विश्रांती (!) व रात्री भोजना नंतर दहा अकरा वाजता निद्रा!
मागे वळून पहाताना (!), थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल चाळीस वर्षांनंतरही, आठवतायत ती सावंतवाडीला घेतलेली लाकडी खेळणी. आणि फकस्त दररोजचा एस टी प्रवास प्रवास व प्रवास!
शाळेतल्या, अगदी पहिली ते दहावी पर्यंत, खूपशा आठवणी ताज्या झाल्या या सहलीच्या निमित्ताने.
आणिक एक विशेष आहे. ते म्हणजे आजही, चाळीस वर्षांनंतरही मी माझ्या वर्गातल्या चाळीस एक जणांच्या तरी नक्कीच पर्सनल टच मध्ये आहे. गेली नऊ दहा वर्षे आमचे अँन्युअल गेट टूगेदर ही भरवतो. ओव्हरनाईट. वीस तेवीस मित्र मैत्रिणी असतातच
यावर्षी 1976 च्या सहलीच्याच रूट ने गोव्यालाच GT अँरेंज केले पाहीजे.
आयटीनररी मात्र उलटीसुलटी होऊ शकते; म्हणजे खाणं 'पिणं' फिरणं व पहाटे साडेपाच सहाला निद्रा...
---
मिलिंद काळे, 16th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment