Er Rational musings 441
https://youtu.be/fWJbLGI_Jv8
आज, उगीचच, "पैल तोगे काऊ कोकताहे", आठवतय, जाणवतय. कोणी येणार आहे की काय घरी? कावळा कसं कावकाव करून कुणाच्या तरी आगमनाची वर्दी देत असतो! पाहुणा? शुभशकून. अशा कावळ्याला उद्देशून भक्तीण कायकाय सांगतीये, त्याला घास भरवण्याचं आणि कित्तीतरी गोष्टी कबूल काय करतीये, हे सर्व, ज्ञानेश्वर रूपाने विठ्ठलाच्या प्रतीक्षेत. बोली भाषा.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
रचनाकार : संत ज्ञानेश्वर,
गायक : लता मंगेशकर,
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
संत ज्ञानेश्वरांचा अत्यंत सुंदर अभंग, चालसाज पं हृदयनाथजी आणि कळस;
लतादीदी म्हणजे ल (लय) व ता (ताल) यांचा संगम.
लयताल - (ल) - लयताल - (ल) - लयताल...
---
मिलिंद काळे, 20th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment