Er Rational musings #408
~ सतराशे साठ!
ही फिगर (च) कुठनं आली? काहीतरी सिग्नीफिकन्स असणार. नाहीतर, उदाहरणार्थ, सोळाशे दहा वा एकोणीसशे साठ किंवा काही ही का नाही बरं प्रचलित?
~ एक गाव, बारा भानगडी!
ही फिगर (च) कुठनं आली? काहीतरी सिग्नीफिकन्स असणार. नाहीतर
बाराच का? पंधरा किंवा आठ वगैरे का नाही?
~ नाकी नऊ आले!
अरे आठ, अकरा वा नऊशे वा तत्सम का नाही? ही फिगर (च) कुठनं आली? काहीतरी सिग्नीफिकन्स असणार.
~ चांडाळ चौकडी च का प्रचलित आहे?
(च्या धर्तीवर पांचट पाच वा त्रस्त त्रिकूट वगैरे का नाही?
~ कोटी कोटी प्रणाम च का लिहीतात / म्हणतात?
(शेकडो प्रणाम ते लक्ष लक्ष प्रणाम चे आता कोटी कोटी झालेत! असे असावे)
~ नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
आता इथे सतराशे च का म्हणून? सोळाशे वा चौदाशे वा अठराशे का नाही? ही फिगर (च) कुठनं आली? काहीतरी सिग्नीफिकन्स असणार.
~ एक सेकंद वा एकच सेकंद वा दोन मिनिट (थांब) असेच का म्हणून?
तीन सेकंद वा तीनच मिनिटं वा दोन सेकंद का नाही? ह्या एक किंवा दोन अश्या फिगर (च) कुठनं आल्या? काहीतरी सिग्नीफिकन्स असणार.
अजब पण मजेशीर आकडेमोड...
---
मिलिंद काळे, 4th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment