Tuesday, March 22, 2016

Er Rational musings #448

Er Rational musings #448



~ होळी आली. धुळवड रंगपंचमी आली. कोरडी होळी खेळा. पाणी वाचवा. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ दही हंडी आली. अमक्या तमक्या(च) उंची पर्यंत परवानगी. वयाचे बंधन. विमा, सुरक्षा इत्यादि जोडीला. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ दिवाळी आली. फटाके फोडू नका. प्रदूषण होतं. दिव्यांनी उजळून टाका. (वीजे ची नासाडी!? चालेल? पण मग वीज निर्मिती साठी अल्टीमेटली कोळसा वा पाणी वा वायू च वापरणार ना!) मान्य, एकदमच बरोब्बर!



~ गणपती बाप्पा आले. सार्वजनिक गणपतींची संख्या कमी करा. मूर्ती च्या उंचीवर, माती वर, विसर्जनावर आक्षेप, रिस्ट्रिक्शन्स्. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ नवरात्र आली. लाऊड स्पिकर चा वापर या त्या वेळेतच, दोनच दिवस अेक्स्टेंशन. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ नाग पंचमी आली. नागांचे प्रदर्शन नको. बंदी. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ बैल गाडी शर्यत नको. (रेस कोर्स मधे घोड्यांच्या शर्यती वर पैसे उडवा ना - सट्टा लावा ना) मान्य, एकदमच बरोब्बर!



~ दसरा आला. आपट्याची पाने तोडू नका. निसर्ग संपत्ती चा ऱ्हास. मान्य, एकदमच बरोब्बर!



~ आणिक कुठला सण राह्यलाय का मेंशन करायला? मान्य, एकदमच बरोब्बर!



आता अजून कुठले पुरावे द्यायचे हिंदूंच्या अपरंपार सहिष्णूतेचे...

---

मिलिंद काळे, 22nd March 2016



Please share, if you agree.

No comments:

Post a Comment