Er Rational musings #443
कोणतेही नवीन कर नाहीत. शेतकरी व सामान्य जनतेला दिलासा देणारा शिलकीचा अर्थसंकल्प! अमुक तमूक वित्तीय तूट. रूपया असा येणार व रूपया असा खर्च होणार. ब्लाह ब्लाह...
दर वर्षी अर्थसंकल्पात हेच.
त्याच्या खाली भल्यामोठ्या दोन लिस्ट्स.
स्वस्त होणार: खेळणी, सेफटी पिना, पादत्राणं, मध, काजळ, आयुर्वेदिक उत्पादने, सूटकेसेस, पेन्सिल, खडू, चटई, इत्यादि इत्यादि.
महागणार: तंबाखू, मद्य, सिगारेट, परफ्यूम, मोबाईल फोन्स, एअर कंडिशनर, इत्यादि इत्यादि.
उदाहरणार्थ 👆👆
हा हा हाहाहाहा...
मी बापूडा दूसऱ्याच दिवशी वाण्याकडे, इतर वस्तूंच्या दूकानात गेलो; म्हणलं, अरे, आता ह्या ह्या वस्तू, जिन्नस स्वस्त झालेत, कालच्याच अर्थसंकल्पात आहे, आज सगळ्या वृत्तपत्रात छापून आलय. द्या मला, किती कमी झालीये किंमत हे पण सांगा. दूकानदार माझ्याकडे ज्या (वेगळ्याच) नजरेने डोळे किलकिले करून बघायला लागले, ते म्हणजे, मी कुठल्या इस्पितळातून पळून बिळून आलोय असे. असो.
हे अस काही नसतं. अशा काही कुठल्याच गोष्टी स्वस्त बिस्त होत नाहीत. हां, तसं म्हणलं तर काही भाव 'जैसे थे' राहू शकतात, पण किती काळ, हे सांगता येणं थोड कठीण, अगम्य अडचणीचं, व बरचसं अनाकलनीय असतं. तसेच किमती का वाढतात, हेही! नो वे.
काही अस मध्येच स्वस्त झालेल मी तरी नाही बघितलय अजून.
पण अर्थसंकल्पिय महागणाऱ्या गोष्टी लगेचच महागतात...
---
मिलिंद काळे, 21st March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment