Thursday, March 3, 2016

Er Rational musings #407

Er Rational musings #407



जनरली स्पिकींग, मोस्टली, गंमतीने घ्या (नो हार्ड फिलींग्ज)



~ उंच माणसं तशी नाँर्मल, ओपन, भोळी, साधी, सिम्पल असतात

~ त्यामानाने बुटकी माणसं, हातचं राखून, थोडी चालू, खाली मुंडी व पाताळ धूंडी अशी आणि बऱ्यापैकी अति शहाणी असतात.

~ समोरच्या दोन दातांमध्ये बऱ्यापैकी फट असलेली माणसं धूर्त, कावेबाज व डेंजरस असतात.

~ कल्याणला रहाणारे लोक्स बऱ्यापैकी चक्रम, जगावेगळे व तिरसट असतात.

~ कपाळावरून डोक्याला टक्कल पडणारे वा पडलेले लोक्स स्टूडियस, वाचनाची आवड असलेले वा तसे हँप्पी गो लकी असतात.

~ तर, डोक्याच्या पाठच्या बाजूला टक्कल पडलेले वा पडत असलेले लोक्स सधन, पैसेवाले वा एकंदरीतच ददात नसलेले, असले असतात.

~ जळगाव साईड चे लोक्स प्रचंड मेहनती, कामसू व प्रामाणिक असतात.

~ कुलकर्णी वा कुळकर्णी लोक्स थोडेसे विक्षिप्त, बरेचसे वेल एज्युकेटेड व वेल आँफ असतात.

~ डावखूरी माणसं जरा हटकेच वेगळीच असतात.

~ व उजवीखूरी असूनही, डाव्या मनगटा ऐवजी उजव्या मनगटात घड्याळ घालणारे लोक्स पण सेम - जरा हटकेच वेगळीच असतात!

~ फ्रेंच कट (मिशी दाढी) ठेवणारी लोकं ब्लाह ब्लाह बडबडी असतात.

~ टू व्हीलर चालवताना सिग्नल ला किंवा कुठेही थांबत असताना वा थांबलेले असताना, डाव्या पाया ऐवजी उजवा पाय टेकवणारे वा टेकवून उभे असलेले दूचाकीस्वार नवशिके असतात.

~ सहकारी बँकां मधला कर्मचारी वर्ग नँशनलाईज्ड बँकां मधे काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कार्यतत्पर, हसतमुख व हेल्पफूल असतो.



बघा अनुभव आहे का? जस्ट अशी ओळखीची माणसं आठवून.



लाँ आँफ अँव्हरेजेस...

---

मिलिंद काळे, 4th March 2016

No comments:

Post a Comment