Saturday, March 5, 2016

Er Rational musings #412

Er Rational musings #412



परवा, म्हणजे आठ मार्च ला आहे जागतिक महिला दिन!



जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. अँडव्हान्स मध्ये, मुद्दामून. कारण त्या दिवशी शुभ संदेश, फोटो, व्हिडियो, सुविचार, बोधवचनं, कविता, गाणी, (गाव)गप्पा, कार्यक्रम, मँरेथाँन, उपक्रम, रँलीज, पारितोषिक समारंभ, यंव व त्यंव यांचा अक्षरशः पाऊस पडणारे!



होईल काय, की मूळ प्रश्न राहतो बाजूला व चर्वीचर्वण च जाम.



कितवा? कधी सुरू झाला? का सुरू झाला? कुठे सुरू झाला? कोणी सुरू केला? हे असले प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे म्हणा. कळीचा मुद्दा हा आहे की स्त्रीयांच्या बाबतीत काही सकारात्मक बदल घडलाय का? पडतोय का? मुळात आपण केव्हढे सकारात्मक आहोत??



होय, बदलतीये समाज मानसता. हळूहळू, पण नक्कीच. परंतु आपल्याकडे एवढ्या वर्षांपासूनची मानसिकता बदलायला ही आपली पिढी जाईल असं वाटतय.



पुरूषाने स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोण, तिच्या बद्दल चा रास्त आदर, वागण्या बोलण्यांतून स्पष्टपणे लक्षणीय व जाणवणारा असलाच पाहीजे. समानता वगैरे एखादा दिवसभराचा सोहळा राहता कामा नये.



आई, बहिण, पत्नी सहचारिणी, मुलगी, सहकारी, ते अगदी मैत्रिण, अशा नानाविध रुपांत वावरणाऱ्या प्रत्येक महिले करिता, आपल्या भावना सजग असल्याच पाहीजेत.



एकूणच काय की ही सगळीच प्रोसेस फास्ट केली पाहीजे, असे मला वाटते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत देत आपोआपच टार्गेट अँचिव्ह होईल.



काही सूचना, घराघरातून, साध्या पण महत्वाच्या...



~ लहानपणापासून मुलगा मुलगी भेदभाव नको करूयात.

~ जी कामे आपणच उगीचच वाटणी केलेली आहेत, ती कामे मुला मुलीं ना सारखीच शिकवूया लहानपणापासूनच.

उदाहरणार्थ मुलाला किचन काम शिकवूया. भाजी आणायला सांगूया. इत्यादि.

~ दोहोंचे मन खंबीर व शारीर स्ट्राँग, इक्वली करूयात. हळवे पणाची व वात्सल्याची भावना सुध्दा इक्वल हवी हां!

~ स्त्री ने च स्त्री च्या बाबतीतला दृष्टिकोण ड्रास्टिकली आँल्टर करूयात.

उदाहरणार्थ, स्वत:च्या आई व सासूतला भेदभाव; मुलीतला व सुनेतला भेदभाव. बहिण व भावजय, नणंद यांमधला भेदभाव, इत्यादि.

~ फायनान्शियल फ्रिडम खरोखर अनूभवण्या करिता, राहती जागा, बँकेतली व इतरत्र केलेली गुंतवणूक इत्यादि 'घरकर्त्या' स्त्री च्या च (प्रथम) नावाने असूद्यात.

~ बोली भाषेतल्या भें**, माद***, आई***, तुझ्या आई* **, वगैरे शिव्या तर सोडाच, अगदी साध्या बोली भाषेतले वाक्प्रचार ही उच्चारूयाही नकोत; जसे, 'काय बांगड्या भरल्यात का?' वगैरे वगैरे.

~ 'मुलगी झाली हो', 'सातच्या आत घरात', व तत्सम नाटके, सिनेमे, टिव्ही शोज, इत्यादि मुला मुलीं सकट पाहूया; बरोबरीने या विषयी लिखाण वाचायला देवूया. मोकळी चर्चा करूया.



वगैरे इत्यादि.



'थेंबे थेंबे तळे साचे' व 'चँरिटी बिगीन्स अँट होम', हे जर आपण सर्वांनी लक्षात घेतले तर? उगाच च मोठ्या गमजा नकोत.



चला, तरमग!



(आणि हो; आपण ढीग करू हो, पण गावागावांतून काय चालणारे? असले प्रश्न येणारच, असणारच; पण अहो आपण तर करूया ना आपल्या कंट्रोल मधल्या गोष्टी!)



वेल बिगन इज हाफ डन...

---

मिलिंद काळे, 6th March 2016

No comments:

Post a Comment