Saturday, March 26, 2016

Er Rational musings #449

Er Rational musings #449



छत्रपती शिवाजी महाराज !!



नुसते नाव घेतले, ऐकले, वाचले, जस्ट फोटो जरी बघितला, तरी सर्वांगावर रोमांच उठतात. नव्हे, अशा विलक्षण भावना जागृत आपसूकच न होणारा माणूस विरळाच.



धारदार भेदक तीक्ष्ण आरपार नजर, दूर्दम्य इच्छाशक्ती, अपरंपार भक्ती (माता जिजाऊ व भवानी माता), पराकोटीचा आदर व श्रध्दा (दादोजी कोंडदेव व श्री रामदास स्वामी), लढाऊ बाणा, भविष्याचा अचूक अंदाज - वेध, प्रचंड साहस, तल्लख बूध्दी,  चातुर्य, गनिमी कावा, गोरगरीब व रयते साठी न्याय्य भूमिका प्रसंगी कठोरसुध्दा, सुराज्य स्थापक...किती विशेषणं लावावीत? जाणता राजा!



छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो; मानाचा मुजरा.



शिवजयंती च्या सगळ्यांना हार्दिक शूभेच्छा.



परंतु नेहमीच जाणवते की आपली लायकी तरी आहे का, या विषयावर बोलायची, लिहायची? असो...

---

मिलिंद काळे, 26th March 2016

No comments:

Post a Comment