Saturday, March 26, 2016

Er Rational musings #451

Er Rational musings #451



या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!



https://youtu.be/ky0osqfJPDE



खरच आहे. उगाच नाही, "आयुष्य खूप सुंदर आहे", ही फ्रेझ काँईन केली गेलीये, सोशल नेटवर्किंगच्या आभासमय दुनियेत.



As fate would have it. Whatever the sphere n spectrum of our destiny, लव्ह "अनकंडिशनली". Fun, frolic, family, friends n full free flowing freedom.



आपण सगळेच फ्री लान्सींग कर्मचारी आहोत या विश्वाच्या कंपनीत हे लक्षात ठेवले पाहीजे.



त्यामुळे इथे प्रश्नच उद्भवत नाही नटसम्राटासारखा, की, 'जगावं की मरावं'; अँब्सोल्यूटली नो क्वेश्चन आँफ 'टू बी आँर नाँट टू बी' !!



Que sera sera, what will be will be.



या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे



चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती

हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती

फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे



रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणीही केली

काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे



बाळाच्या चिमण्या ओठांतून हाक बोबडी येते

वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते

नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे



या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्र्व तरावे



गीतकार : मंगेश पाडगांवकर,

गायक : अरुण दाते,

संगीतकार : यशवंत देव



N'Joy your stay...

---

मिलिंद काळे, 27th March 2016

No comments:

Post a Comment