Saturday, March 12, 2016

Er Rational musings #429

Er Rational musings #429



रविवार म्हणजे रिलँक्सेशन. तसा आराम. जेवण असं नको, आज काहीतरी सटरफटर. बरं, पिशवी घेऊन, मच्छी मांस मटण, काही आणायचे नाहीये, बुधवार शुक्रवार रविवार म्हणून. (शक्यतो सोमवार गुरूवार व चतुर्थी, संकष्टी एकादशी अशा चांगल्या दिवशी खावं प्यावं; गर्दी कमी असते, शिवाय आवडती कामं चांगल्या दिवशी भक्तीभावनेनी केली की प्रचंड पूण्य मिळतं, अशी माझी ठाम समजूत आहे, अनुभव ही आहे)



कुठे कोणाकडे जायचय, काय आणायचय, काही काम करायचय, काय वाचायचय / बघायचय, चर्चा फायनलायझेशन व इम्प्लिमेंटेशन, ज रा शांताराम घेत (शांतपणे!)



फब, व्हाँअँ, स्कायपे, मेला मेली, फोन काँल्स व असे उद्योग. तसेच, 'प्रोफाईल पिक्चर' व 'स्टेटस्' बदलण्याचा ही हा आजचाच दिवस!



आणि हो, बायको बरोबर (स्वत:च्या!) निवांत (!?!) गप्पा...

---

मिलिंद काळे, 13th March 2016

No comments:

Post a Comment