Thursday, March 17, 2016

Er Rational musings #437

Er Rational musings #437



~ ठुस को करो फूस, पाठक को करो खूस sss

~ ठुस को करो फूस, पाठक को करो खूस sss



दणाणून घोषणा sss



माझ्या पहिल्या इंजिनियरिंग काँलेज मधल्या स्टूडंटस् असोसिएशन च्या निवडणूका. सन 1982, 83. माझी पहिलीच निवडणूक. काँलेजच्या स्पोर्ट्स क्लब मध्येच कायमच पडिक मी, टेबल टेनिस सतत, दिवसभर लेक्चर्स बंक करून व संध्याकाळी लायन्स क्लबमधे मुलुंडला. काँलेजचा टी टी चँम्पियन. त्यामुळे सहाजिकच इनडोअर गेम्स सेक्रेटरी म्हणून निवडणूकीला उभा. इलेक्ट्रिकलचाच वर्ग मित्र पाठक जीएस (जनरल सेक्रेटरी) साठी. ठुसे हा सिव्हील इंजिनियरिंग चा, जीएस साठी. मग आमचे पाठक पँनल विरूद्ध ठुसे पँनल. कँम्पेनिंग करायला काही सूट दिलेली होती. तीन मजली अवाढव्य इंजिनियरिंग काँलेज, आम्ही सगळे धतींगबाज विद्यार्थी (अभ्यास सोडून इतर सर्वच करायचो); पाठक को करो खूस, ठूस को करो फूस, ही घोषणा देत देत अख्ख काँलेज दणाणून सोडायचो. पाठक पँनल म्हणजे आम्ही सगळे टारगट, टुकार, मुलं तर ठुसे पँनल म्हणजे स्टूडियस सभ्य मुलं.



साला, झालं काय, की, मी आलो निवडून इनडोअर गेम्स सेक्रेटरी म्हणून; पण आमच्या पँनेलचे आम्ही तिघेच आलो; म्हणजे जीएस ठूसे व बाकी स्टूडंटस् असोसिएशन मधे त्याचे पँनल व आम्ही तिघेच. पण पुढे मात्र सगळ्यांनी ईमानदारीने एकदिलाने काम केलं. इंटर काँलेज टी टी टूर्नामेंटमध्ये आम्ही सांघिक विजेतेपद खेचून आणले त्या वर्षी.



तो विजय साजरा केला दारू पार्टीने, पाठक व ठुसे, व सगळ्यांनी एकत्र!



वेगळीच मजा...

---

मिलिंद काळे, 17th March 2016

No comments:

Post a Comment