Tuesday, March 22, 2016

Er Rational musings #446

Er Rational musings #446



पदपथांवरून चालणं ही मुश्किल, रस्त्यावर फेरावाल्यांचं साम्राज्य, गल्लो गल्ली खाऊ गाड्या फोफावलेल्या, बेशिस्त वाहनांची दादागिरी, भिकारी व तृतीय पंथीयांचा उपद्रव, एक ना पाच!



Problems, difficulties, hurdles, grave n out of control situations are aplenty.



सोल्यूशन आहे ना माझ्याकडे. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप च कठीण. जवळजवळ अशक्य.



या सगळ्या समस्यांचे उत्तर आहे "मी, आम्ही, तू, तुम्ही, आणि आपण".



आश्चर्य वाटतय? अहो सगळ्या च प्रश्नांची उत्तरं त्या प्रश्नांतच दडलेली असतात. खरा 'प्रश्न' आहे ती सोल्यूशन्स शोधण्याचा; डिसायफर, अनलाँक करण्याचा.



"मी, आम्ही, तू, तुम्ही, आणि आपण" जर हे केले तर?



~ महाग पडले तरी अधिकृत हाँटेल मध्येच खाणे पीणे.

~ महाग पडल्या तरी अधिकृत दूकानांमधूनच चीजा, जिन्नसा विकत घेणे.

~ वेळ लागला तरी वाहतूकीचे सगळे नियम तंतोतंत पाळणे.

~ वेळ लागला तरी अकायदेशीररीत्या पैसे बैसे आमिषं देवून सरकारी यंत्रणांकडून स्वत:ची कामे करणे.

~ सर्व तो परीने कायमस्वरूपी सार्वजनिक व वैयक्तिक शिस्त बाळगणे.



आणि



~ लोकसंख्या नियंत्रण; मूल बाळ फक्त एक वा दोन.



हम दो हमारे दो, उसके बाद रहने दो.



थोडा वेळ नक्कीच लागेल ना, थोडा त्रास नक्कीच होईल ना, थोडं कठीण नक्कीच जाईल ना, आणि थोडी खिशाला मोड नक्कीच बसेल ना?! पण परिस्थिति बदलायला हे सर्व बेसिक आहे, आहे का तयारी?



चेंज स्टार्टस् विथ मि अँड यू...

---

मिलिंद काळे, 21st March 2016

No comments:

Post a Comment