Er Rational musings #442
स्थळ: मेन एम जी रोड, 302 च्या बस स्टाँप जवळ
गाडी: पावभाजीची
लल्लन: आमचा पावभाजी वाला भैय्या
महेश: लल्लन चा मुलगा
बाजूची सोसायटी: शिवसेना शाखेच्या बाजूचं सोसायटीचं गेट
गाडी आया? गाडी आयी? उठा, उठाले. पाटी उठा रे. जल्दी जल्दी. आप लोग ये साईड आजाव. बाजू बाज्यू. खट्टाखट महेश च्या एकापाठोपाठ एक इन्स्ट्रक्शन्स सूरू. त्याचा पोऱ्या पण नवीनच दिसत होता. भैय्या नव्हता, दिसलाही नाही आजूबाजूला. मग कशीबशी मेक शिफ्ट गाडी बाजूच्याच सोसायचीच्या आवारात नेली. महेश मेन रोडवर उभा राहून करकोच्या सारखी मान उंच करत (न) दिसणाऱ्या म्युनिसिपालटीच्या गाडीच्या प्रतीक्षेत.
मला हसायला आलं. महेश ला मी म्हणलं पण.
26 ते 31 वर्षे असच चाललय.
"मैं, हम दोस्त लोग इतने सालोंसे भैय्या के पास भाजीपाव खा रहे हैं, महेश. वो दिनों में भी हम कभी कभार, ना, बहुत बार यहीं तो करते थे। पुलीस या म्युनिसिपालटीकी गाडी आयी के तब भैय्याजी गाडी साईड वाली, सामने वाली, आगे वाली बिल्डिंग के कंपाऊंड में गाडी घूसेड देते थे। कितनी बार हम ऊधर अंदर खडे होकर पावभाजी खायी हैं। साला, आज, इतने सालोंसे यहीं सिलसिला चालू हैं।"
महेश म्हणजे आमच्या भैय्या चा मुलगा. गाडीवर भैय्याला मदत करता करता, आता मोठा होऊन गाडी, बाहेरच्या आँर्डर्स, वगैरे सांभाळतो. भैय्याची पावभाजीची रेसिपी स्पेशल, पेटंटेड!
पदार्थ तोच, चव तीच, बनवणारा तोच, खाणारा तोच, जागा तीच, पोलिस वा उलटीपालिटी आली की तात्पुरती पळापळ पांगापांग तीच, आणि मला मिळणारी स्पेशल ट्रिटमेंट ही तीच!
लिगसी कंटिन्यूज...
---
मिलिंद काळे, 20th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment