Wednesday, March 9, 2016

Er Rational musings #419

Er Rational musings #419



A Hawker: A person who travels about selling goods, typically advertising them by shouting.

For example: hawkers and costermongers pushed their little handcarts, crying 'Bread!’, ‘Fish!’ and ‘Meat pies!'



This meaning or definition is as per Oxford English Dictionary.



Now let's try to find out whether this meaning holds true with regards to Mulund's hawker community, for example.



फेरीवाले म्हणजे मार्केट रोड वर, वा इतर वर्दळीच्या रस्त्यांवर, फूटपाथवर, रहदारीच्या रस्त्याच्या मधे, गटाराच्या बाजूला, कचराकुंडी च्या पुढे, एम एस ई बी च्या लाल रंगाच्या फिडर बाँक्सला वा एम टि एन एल च्या करड्या रंगाच्या टेलिफोन टँग ब्लाँकला खेटून, बी ई एस टी च्या बसस्टाँप चा आसरा घेवून, दूकानांच्या, रिक्शा टँक्सी स्टँड च्या आगे पीछे दायने बाहे उपर नीचे, कुठेही, कसेही, बसून वा हातगाडी लावून वा खोपटं बांधून 'धंदा' करणारे लोक्स!



दिवस संपता क्षणी, त्याच जागी, आपापल्या मालाच्या पेट्या पेटारे तिथ्थेच बांधून ठेवले जातात. रात्री फेरफटका मारला की दूतर्फा रस्त्यावर, फूटपाथांवर, या फेरीवाल्यांच्या हक्काच्या मालकीच्या (!) प्राँपर्ट्या दिसतात. दिवस उजाडताच, तिथ्थेच धंदा व्यवसाय सुरू!



झक् मारत गेली ती आँक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी व "भटका विमुक्त व्यावसायिक" हे फेरीवाल्याचं मिनिंग...

---

मिलिंद काळे, 9th March 2016

No comments:

Post a Comment