Er Rational musings #454
मिसरूड फूटली म्हणजे मुलगा वयात आला असा ढोबळ मानाने (अलाँग विथ बापाची चप्पल मुलाला येऊ लागली की), काही वर्षांपूर्वी पर्यंत, समज होता.
तसेच, मिशी असणं, म्हणजे
अगदी मँस्कूलिन, मँनली, असाही एक (गैर) समज होता. पुरूषार्थाचे लक्षण. म्हणजे चक्क मिशांना पिळ बिळ मारत असत. असेही पहायला गेलं तर मिशी इज इक्वल टू पुरूषाचा इगो असही काहीसं म्हणता येतं.
आदीम कालापासून बायर्फेकशन करून ठेवलय आपल्या पूर्वजांनी, (फक्त) मिशी वाला देव एक पण नाही, परंतु अल्मोस्ट सारे दानव राक्षस मिशीवाले!!
मिश्यांचेही नानाविध प्रकार. हिटलर सारखी छोट्टीशी. किंवा तलवार कट. किंवा टोकं वर उचललेली, किंवा टोकं खाली असलेली. काही कल्यांपर्यंत, या कानापासून त्या कानापर्यंत. किंवा राज कपूर स्टाईल. अनेक.
हिंदी चित्रपटसृष्टीत (बाँलिवूड) मात्र मुछमुंढ्या हिरोंनी राज्य केलं, काही सम्माननीय अपवाद वगळता, जसे राज कपूर इत्यादि. साऊथ कडील चित्रपटसृष्टीत (टाँलिवूड, काँलिवूड) मात्र मूछ वाले हिरो चांगलेच टिकून राहीले.
मी काही देश फिरलोय; जपान, यूएई, थायलंड, बांगला देश, कँनडा...फाँरेन कंट्रीज मध्ये तर फक्त मिशी असलेली माणसं अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्या एवढीच असतील. अतिशयोक्तिचा भाग सोडा, पण तिथे नूसती मिशीवाले फारच कमी, सगळे क्लीन शेव्हन वा फारतर फ्रेंच कट दाढी वा सर्रास दाढी मिशी वाले. (गंम्मतीचा भाग म्हणजे, आपल्या इकडचे लोक्स तिकडे सेटल झाले वा लाँग ड्यूरेशन साठी - आयटी वाले - वगैरे, गेले, की ते पण इथे असलेली मिशी उडवून टाकतात!)
सध्याच्या पिढीत वा आत्ताच्या वीस तेवीस वर्षांच्या तरूणांत, 'फक्त' मिशी वाढवलेला कोणी माझ्या तरी पाहण्यात वा ओळखीत नाही.
खरी ग्यानबाची मेख अशी आहे की, हल्लीच्या मुलांची स्किन च मिशीला पोषक नाहीये. त्यांना मिशी येतच नाही, फूटतच नाही!
हं, नाही म्हणायला काही खुंट बिंट (स्टबल!) वा बारीक फ्रेंच कट ठेवतात.
पण मोस्टली सगळे मुछमुंढेच...
---
मिलिंद काळे, 29th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment