Saturday, March 12, 2016

Er Rational musings #428

Er Rational musings #428



नवीन व्हाँट्सअँप ग्रूप, पण एका (!) दिवसा करिता!



व्हॉट्सऍप आल्यापासून त्याचा योग्य वापर मी करत आलोय, अगदी पायोनियरिंग उपयोग! एका दिवसाकरिता नवीन ग्रूप (खरं तर मी या आयडियेच पेटंटच घेतलं पाहीजे!) मग ती आँफिशीयल मिटींग असो वा टाईमपास पार्टी!



एकंदरीतच, पार्टी अँनिमल असल्यामुळे, चार लोक्स गोळा करून पार्ट्यांचा घाट घालण्यात, अँरेंज करण्यात मी कायम पूढे. हे काम माझ्याकडेच, मेन को-आँर्डिनेटर मी; त्यामुळे मी हल्ली अक्षरशः एक दोन दिवसांचे ग्रूप बनवतो व लगेच डिलीट करतो.



आता परवाचीच गोष्ट घ्या. चार मित्र आम्ही, वेगवेगळ्या ठिकाणाहून दूपारी जेवायला कुलाब्यात भेटणार, ठरवले. नवीन व्हाँट्सअँप ग्रूप फाँर्म केला. मास कम्युनिकेशन, को-आँर्डिनेशन साठी अत्यंत सोयीचं, उपयुक्त.



तू कुठे पोचलास, मी असा येतोय, त्याची मिटिंग चालू आहे, मी गाडी इथे पार्क केलीये, अरे आज शुक्रवार, नमाजा नंतर अडीचलाच आँलिंपिया उघडणार, मधे तासभर बंद असणार - कित्ती संदेशांची देवाणघेवाण!



मग बरोब्बर अडीच ला हाँटेल आँलिंपिया (रिगल सिनेमाच्या पूढे, बेस्ट इलेक्ट्रिक हाऊस च्या आधी, माझा जुना जाँईंट). चिकन भूना, चिकन लेग मसाला, आँमलेट्स, पाव, चपात्या, चिकन बिर्याणी व नंतर कस्टर्ड! फूल्ल!!



चार साडेचार ला डिस्पर्सल. मग माझा शेवटचा मेसेज त्या ग्रूपवर, थँकयू, मजा आली, पुढची भेट लवकरच ठरवतो...मग 'लिव्ह' ग्रूप...व अखेर 'डिलीट' ग्रूप.



थँक यू सो मेनी मोर मच, व्हाँट्सअँप...

---

मिलिंद काळे, 13th March 2016

No comments:

Post a Comment