Er Rational musings #402
शहाणपण
इथे वाटतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे
वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे
जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे
- कवीवर्य कुसुमाग्रज
( विष्णू वामन शिरवाडकर )
जन्म- २७ फेब्रुवारी १९१२
मृत्यू- १० मार्च १९९९
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस ’मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
निर्धार, निश्चय
~ मराठी वाग्म़य वाचूया.
~ मराठी चित्रपट, नाटकांना प्रोत्साहन देऊया.
~ मराठीतच बोलूया, लिहूया, ऐकूया.
~ जिथे व जसे आवश्यक तेथेच मराठीतर भाषांचा (अपरिहार्य) वापर करूया.
मी मराठी, माय मराठी, जय मराठी...
---
मिलिंद काळे, २७ फेब्रुवारी २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment