Wednesday, February 3, 2016

Er Rational musings #359

Er Rational musings #359



पूण्यात दूचाकी चालवण्यासारखं सूख नाही.



हेल्मेट नाही.



जिकडे पोलिस मामा उभे असतात असे सिग्नल्स, खोपश्यातल्या, आडोश्यातल्या, सिग्नल्स पूढच्या, झाडांमागच्या, त्यांच्या उभं राहण्याच्या जागा, जनरली माहित असतात. वन वे असो वा नो एंन्ट्री, मामा लोक्स कोणत्या दिवशी, दिवसाच्या कोणत्या प्रहरी (!) म्हणजे कोणत्या वेळी, (ह्या वेळा साधारणपणे सकाळी साडे नऊ पावणे दहा ते फारचतर दूपारी एक सव्वा दीड पर्यंत आणि संध्याकाळी चार सव्वा चार ते रात्री फारफारतर आठ सव्वा आठ पर्यंत अशा आहेत - डोक्यावरून पाणी), कुठे कुठे सापडणार, ते पक्क डोक्यात बसलेले असते.



सार्कँस्टिकली,

ग्रीन सिग्नल म्हणजे जा.

लाल सिग्नल म्हणजे थांबा (व जा?).

व अँबर सिग्नल म्हणजे, आणखीन(च) जोरात जा!!!



पावती फाडण्याचे दिवस म्हणजे बहुतेक वेळा मंथ एंड (महिन्याचे टार्गेट - दंड - महसूल, पूरं करायचं असतं) व सणासुदीच्या आधी दोनसहा दिवस ते नंतरचे दोन दिवस.



सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, तूम्ही दूचाकी कशी(श्शी) चालवा, सगळेच अशी(श्शी) च चालवणारे असतात. त्यामूळे होतं काय, सब गधे घोडे बारा टक्का!! कोण कोणाकडे बघणार व काय करणार! आपणही तसेच व तोही तसाचं. नो प्राँब्लेम अँट आँल.



म्हणूनच दूचाकी पूण्यात चालवणं एकदम सोप्प व सुखावह...

---

मिलिंद काळे, 3rd February 2016

No comments:

Post a Comment