Er Rational musings #391
दोन प्रकारच्या व्यावसायिकांचा मला प्रचंड आदरयुक्त हेवा वाटायचा.
काम करो पैसा लो. अभी के अभी. आज नगद कल उधार. दूकान उघडून बसायचं व गल्ला गोळा करायचा.
एक म्हणजे डाँक्टर लोकांचा, म्हणजे जनरल प्रँक्टिशनर बर का. तपासायचं, रेडीमेड गोळ्या द्यायच्या, गरज असेल तर ट्ट़ूच करायचं व मोबदला घ्यायचा, आपल्या एक्स्पर्टीज चा.
दूसरे म्हणजे वकील लोक्स. ते 'डाँक्यूमेंट' वाले. (डाँक्यूमेंट हा शब्द परवलीचा आहे, कागदपत्रांपेक्षा. अँक्च्यूअली डाँक्यूमेंट इज अ सेट आँफ कागदपत्रं) कट्, काँपी, पेस्ट, एडिट - कस्टमाईज, ड्राफ्ट रेडी! मग फायनल डाँक्यूमेंट व नंतर रजिस्ट्रेशन. फी इमिजिएट, व्हेरी प्रोफेशनल सर्व्हिस - इट्स आँल सेट.
याउप्पर इंजिनियरिंग प्रो बघा.
प्रिलीमिनरी निगोशिएशन टेक्नीकल माणसा बरोबर, त्यात तो नागवणार. मग पर्चेस वाले. डिस्काउंट, पेमेंट टर्मस्, पेनल्टी क्लाँज, रिटेंशन मनी, सिक्यूरिटी डिपाँझीट, अँड व्हाँट नाँट. कामाचा मोबदला, 3 महीने ते 6 महीने ते वर्ष दोन वर्ष, काहीही. नो लाँजिक, नो जस्टीफिकेशन, खरेतर नाँट राईट.
साला प्रोफेशनच चूकलं बहुतेक!!
---
मिलिंद काळे, 19th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment